गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात. एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत. कारण Pluribus आणि “हमारे राम” दोन्ही कलाविष्कारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खास छाप पडली आहे, हे निश्चित!!
मी काही समीक्षक
अथवा स्तंभ लेखक नाही. मात्र जेव्हा आतून हलून जातो तेव्हा लेखणी उचलतो. Vince Gilligan च्या “प्लुरिबस” ने आणि राहुल भूचर च्या “हमारे राम” ने असंच काहीसं केलंय.
Pluribus या इंग्रजी वेबमालिकेमध्ये
पोस्टआपोकलेप्टिक म्हणजे प्रलय्योत्तर साचा आहे. तर “हमारे राम” मध्ये रामायणच रंगमंचावर जिवंत केलं गेलं आहे.
आशयाबद्दल सांगायचे तर “प्लुरिबस” मध्ये जगावर संकट आले असून परग्रह सदृश शक्तीने
सर्व जनतेचा मनाचा ताबा घेतला आहे आणि त्यातून निर्माण झाले आहे- एक सामूहिक मन. वाचली आहे ती यातील नायिका. तिच्या मनावर काहीही
फरक पडलेला नाही आणि ती अडकत जाते विचित्र प्रसंगात. दुसरीकडे “हमारे राम”
मध्ये आधी म्हटल्याप्रमाणे रामायण सादर केले
गेले आहे. सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या “स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशलव
रामायण गाती” प्रमाणे या नाट्य सादरीकरणाची देखील सुरुवात लवकुशांच्या गीताने होते
आणि आपण प्रेक्षक स्वतःला रामायणाच्या मधोमध पाहतो. त्यातच जर लवकुश थेट
प्रेक्षकांच्या मधूनच- अगदी सभागृहाच्या मागील दरवाजातून - प्रवेश करत असतील तर तो
प्रभाव अधिकच परिणामकारी वाटतो. मग सुरू होते रंगमंचावर दृश्यकाव्य मेजवानी!
मंचावर नाट्यसादरीकरणामध्ये
अनेक सुखद धक्के दिग्दर्शक गौरव भारद्वाज देतात. रंगमंचाच्या बॅक ड्रॉप साठी
तंत्रज्ञानाचा वापर करत एक स्क्रीनच सज्ज केले आहे. त्यावर प्रवेश प्रसंगांन्वये चित्रे
बदलत जातात. जसे सुरुवातीलाच पडदा उठल्यावर राजाराम उच्चस्थ सोनेरी सिंहासनावर बसून लवकुशांचे गीत ऐकून
मंत्रमुग्ध होत असताना स्क्रीन राजसभेचे चित्र दाखवते आणि आपण थेट पोहोचतो रामसभेत!
नंतर सीतेचे वसुंधरामातेत विलीन होणे ही देखील उत्कृष्ठ पद्धतीने दाखवण्यात आहे आले.
अशा योग्य तांत्रिक गोष्टी वापरून हे नाट्य छान सजले आहे. सादरीकरणाच्या बाबतीत “प्लुरिबस”
अगदी साधे आहे. खरं तर हे साधेपणच त्याचे वेगळेपण ठरते. परग्रह आक्रमण, प्रलय अशा
बोजड संकल्पनांना अतिशय टोन डाऊन करत मांडल्यामुळे “प्लुरिबस” प्रभाव ठरते.
मानव जात संपत आली आहे आणि नायिका-Carol- एकट्यानेच मानव म्हणून वावरते आहे. अशा प्रसंगांना दाखवताना उगाचचा आकांड तांडव विन्स गिलीगन टाळतात. याचे कारण कदाचित हे असावे की सर्व विनाशी प्रलय कोणीच पाहिलेला नाही आणि एक दिग्दर्शक किंवा रचिता म्हणून सिरीज मधून जो इम्पॅक्ट त्यांना दाखवायचा आहे तो अशा सर्वसामान्य संकल्पनांना छेद देणारा असल्यानेच प्रभावी ठरतो. त्यामुळेच कदाचित या सिरीजच्या निर्मितीसाठी खूप जास्त कॅमेऱ्याची गरज पडली नसावी. कमी संसाधनात अधिक प्रभाव याच्या सर्व 9 एपिसोड मध्ये वाटतो.
नायिकेचे घर आणि
तिचे Zosia नामक सामूहिक मला मनाशी संभाषण हेच याचे मुख्य सूत्र ठरते. यादरम्यान
नायिकेने केलेल्या छोट्या मोठ्या sorties आकर्षक आणि उत्कंठावर्धक वाटतात. ज्यामध्ये Carol
ला सामूहिक मनाचे
नानाविध पैलू कळतात आणि ती अचूकपणे ते सर्व नोंद करत राहते.
"प्ल्युरिबस"
या वेबमालिकेतील संवादशैली आधुनिक, वेगवान आणि डिजिटल युगातील वास्तव प्रतिबिंबित
करणारी आहे. पात्रांमधील बोलणं थेट, तर्कशुद्ध आणि प्रसंगानुसार ताण‑तणाव निर्माण
करणारं आहे. त्याच्या उलट, "हमारे राम" या नाटकातील संवाद अधिक सांस्कृतिक, भावनात्मक आणि परंपरागत कथनशैलीवर आधारित आहेत.
या नाटकात शब्दांना आध्यात्मिक वजन आहे, तर "प्ल्युरिबस" मध्ये शब्द
परिस्थितीचं विश्लेषण करतात. त्यामुळे दोन्ही कलाकृती संवादाच्या माध्यमातून
वेगवेगळ्या जगांची निर्मिती करतात—एक आधुनिक वास्तवाचं, तर दुसरी सांस्कृतिक मूल्यांचं. जसं “प्लुरिबस” मधले
नायिका Carol आणि सामूहिक मनाची प्रतिनिधी
Zosia यामधील हे संभाषण:
Carol: You people make no goddamn sense, do you know that? "We wanna make you happy", you say. "Your life is your own", you say. And agency, I've got all this agency! But, I mean, I guess I have agency just until I don't?
Zosia: Carol, if you were walking by a lake and you saw
somebody drowning, would you throw them a life preserver? Of course you would.
You wouldn't think, you wouldn't wait, you wouldn't try to get consensus on it.
You'd just throw it.
Carol: So now I'm drowning?
Zosia: You just don't know it.
या उलट रावणाचे “हमारे
राम” मधील तत्त्वज्ञान:
“ध्येय अनेक नहीं एक होंना चाहिये और उसे पाने के रास्ते एक नही अनेक होने चाहिये। ”
पात्र निवड व अभिनय हे दोन्ही कलाकृतींमध्ये त्यांचे बलस्थान ठरले आहे. “हमारे राम” बद्दल बोलायच तर तब्बल तीन दशकांनंतर (एन एस डी सुटल्यावर) आशुतोष राणा रंगमंचावर पुनरागमन करत आहे. रावणाच्या भूमिकेसाठी त्याची निवड म्हणजे दिग्दर्शक गौरव भारद्वाज ला सलामच! रावण केवळ एक असुरश्रेष्ठ नसून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे नाना डंगी पैलू- शिवभक्त, विद्वान, लंका नरेश- हे आशुतोष ने लीलया पेलले आहेत. रामेश्वरचा शिवलिंग स्थापनेचा प्रसंग म्हणजे मला रावणाच्या व्यक्तिमत्त्वातील द्वंद्वाचा परमोच्यबिंदू वाटला. पण आशुतोष राणा ने त्याचा बाऊ न होऊ देता इतक्या सहजपणे साकारला आहे की जर एखाद्या नाट्यप्रवेशासाठी ऑस्कर असते तर यानेच ते पटकावले असते. एकीकडे आपण परस्त्रीला-सीतेला-बळजबरीने बंदी बनवली आहे आणि दुसरीकडे एक शिवभक्ताचार्य म्हणून रामेश्वरला रामाचाच पुरोहित म्हणून आपल्याला काम करावे लागणार आहे या सामान्यांसाठी अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला असामान्य सामर्थ्य असणाऱ्या रावणाने कसे सामोरे गेले असणार याचा प्रत्यय या प्रवेशाद्वारा येतो.खरंतर रामायणातला हा प्रसंग मला ठाऊकच नव्हता. पण दिग्दर्शकाने अनेक रामायणी आख्यायिका चपखल पणे नाटकात पेरल्या आहेत. राहुल भूचर यांनी सादर केलेला राम देखील मनात घर करतो. रामाला साजेचा आवाज, लकब, उंची, सौन्दर्यपूर्ण शालीनता यांची देणगीच जणू त्याला लाभली आहे. अभिनयाबद्दल बोलताना दीप्ती कुमारने सादर केलेली शूर्पणका आठवली नाही तरच नवल! संपूर्ण रामायण इवलेसे योगदान असणारी शूर्पणका इथे मात्र नाटकानंतर पात्रपरिचयाच्या वेळी टाळ्यांचा उत्साहद्वारा काही औरच सांगते. दीप्ती कुमारने केलेली शूर्पणखा तिच्या कपटी बाण्यासह नेमकी टिपली आहे.
या नाटकाचा संपूर्ण लवाजमा 148 लोकांचा आहे असं पात्र परिचयाच्या
वेळी सांगण्यात येते. नक्कीच यापेक्षा कमी जनता पलूरी बस मालिकेच्या नऊ एपिसोड
मध्ये दिसते. अभिनयाच्या मोर्चावर “प्लुरिबस” मागे नाही. Carol निभवणारी Rhea Seehorn एक दर्जेदार अभिनेत्री आहे. आपल्या
भोवतीचे कोसळणारे विश्व तिने आपल्या नानाविध भावाविष्कारातून घट्ट पकडून ठेवले आहे.
मालिकेच्या शेवटी ज्यावेळी तिला एका गुपिताचा उकल होतो तेव्हा कॅमेरा तिच्या
चेहऱ्यावर स्थिर असतो. आणि चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि जोडीला श्वासातील अंतर-
केवळ याच्या जोरावर ती प्रेक्षकाला स्तंभित करते. म्हणूनच कदाचित नुकताच तिला 83rd Golden Globe Award मध्ये सर्वश्रेष्ठ
अभिनेत्री (टीव्ही सिरीज) चा अवॉर्ड मिळाला आहे.
एकूणच दोन्ही कलाकृती उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. एक जगाच्या अंताची गोष्ट सांगते तर दुसरी जगाच्या
आरंभाची, एक आधुनिक - दुसरी पौराणिक, एक ओटीटीवर- दुसरी लाईव्ह परफॉर्मन्स असे असले
तरीही प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घ्यायला कमी पडत नाही. दोन टोकांना उभ्या असणाऱ्या या दोन्ही ज्योती मन
उजळणाऱ्या ठरतात.
-अमित भोळे, नवी दिल्ली
__________________________________________
English Translation:
Pluribus हमारे राम
Last week, I experienced two extraordinary works of art—one
on Apple TV and the other on stage. And now both are fighting for space in my
mind, because Pluribus and Humare
Ram have each left a distinct mark in
their respective realms.
I am neither a critic nor a columnist. But whenever
something shakes me from within, I feel compelled to write. Vince Gilligan’s Pluribus and Rahul Bhuchar’s Humare Ram did exactly that. Pluribus , an English web series, is set in a
post‑apocalyptic
world, while Humare Ram brings the Ramayana alive on stage. In terms
of content, Pluribus depicts a world under threat, where an
alien-like force has taken control of the minds of all people, creating a
collective consciousness. The protagonist is the only one unaffected, and she
finds herself caught in bizarre situations. On the other hand, Humare Ram presents the Ramayana on stage. Just like
Sudhir Phadke’s Geet Ramayan begins with the song “Svaye
Shriram Prabhu Aikati Kushalav Ramayan Gati,” this play too opens with the song
of Luv and Kush, instantly transporting the audience into the heart of the
Ramayana. And when Luv and Kush enter not from backstage but from the
auditorium’s rear door, the impact becomes even more powerful. What follows is
a visual poetic feast on stage.
Director Gaurav Bhardwaj delivers many pleasant surprises in
the stage production. A screen is used as a technological backdrop, changing
visuals according to the scenes. For instance, when the curtain rises and King
Rama sits on a golden throne listening to Luv and Kush’s song in awe, the
screen displays the royal court, making us feel as though we’ve stepped right
into it. Later, Sita merging into Mother Earth is also portrayed beautifully.
These thoughtful technical elements enhance the play. In contrast, Pluribus is extremely simple in its presentation. In
fact, this simplicity becomes its strength. Heavy concepts like alien invasion
and apocalypse are toned down so effectively that the series becomes even more
impactful.
Humanity is on the verge of extinction, and the
protagonist—Carol—is the only human left. While depicting such scenes, Vince
Gilligan avoids unnecessary chaos or melodrama. Perhaps because no one has
actually witnessed a real apocalypse, the impact he aims for comes from
breaking away from conventional portrayals. This may also be why the series
doesn’t rely on excessive camera work. Across all nine episodes, the theme of
“greater impact with fewer resources” is evident.
The story revolves around Carol’s home and her conversations
with Zosia, the representative of the collective mind. Carol’s small and large
sorties during this time are gripping and suspenseful. Through them, she
discovers various facets of the collective consciousness and records them
meticulously.
The dialogue style in Pluribus is modern, fast-paced, and reflective of the
digital age. The conversations are direct, logical, and tension‑building.
In contrast, Humare Ram features dialogues rooted in culture, emotion,
and traditional storytelling. The words carry spiritual weight, whereas in Pluribus , words analyze situations. Thus,
both works create entirely different worlds through their dialogues—one modern and realistic, the other cultural and value‑driven.
For example, the conversation between Carol and Zosia in Pluribus :
Carol: You people
make no goddamn sense, do you know that? “We wanna make you happy,” you say.
“Your life is your own,” you say. And agency, I’ve got all this agency! But, I
mean, I guess I have agency just until I don’t?
Zosia: Carol, if you
were walking by a lake and you saw somebody drowning, would you throw them a
life preserver? Of course you would. You wouldn’t think, you wouldn’t wait, you
wouldn’t try to get consensus on it. You’d just throw it.
Carol: So now I’m
drowning?
Zosia: You just don’t
know it.
And in contrast, Ravana’s philosophy in Humare Ram :
“One must have not
many goals, but only one. And the paths to achieve it may be many.”
Casting and performances are strengths of both works.
Speaking of Humare Ram , Ashutosh Rana
returns to the stage after nearly three decades (since leaving NSD). Choosing
him for the role of Ravana deserves a salute to director Gaurav Bhardwaj.
Ravana is not just a demon king; he is a devotee of Shiva, a scholar, and the
ruler of Lanka—Ashutosh portrays all these layers effortlessly. The scene
depicting the installation of the Shiva Linga at Rameshwaram felt like the
pinnacle of Ravana’s inner conflict. Yet Ashutosh Rana performs it with such
ease that if there were an Oscar for a stage entry, he would have won it. On
one hand, he has forcibly imprisoned Sita, another man’s wife; on the other, as
a devout priest of Shiva, he must perform rituals for Rama himself. This
uncomfortable situation for ordinary people becomes a moment of extraordinary
strength for Ravana, and the audience experiences this through the scene. I
wasn’t even aware of this episode from the Ramayana, but the director has woven
many such lesser‑known stories seamlessly into the play.
Rahul Bhuchar’s portrayal of Rama also leaves a lasting
impression. His voice, demeanour, height, and graceful composure seem tailor‑made
for the role. And speaking of performances, how can one forget Deepti Kumar’s Shurpanakha? Though Shurpanakha has a small role in the
Ramayana, the thunderous applause she receives during the cast introduction
says everything. Deepti Kumar captures Shurpanakha’s cunning
nature perfectly.
The entire production involves 148 people, as announced
during the cast introduction. In contrast, far fewer people appear across the
nine episodes of Pluribus . Yet Pluribus is no less impressive in terms of acting. Rhea
Seehorn, who plays Carol, is a remarkable actress. She holds together the
collapsing world around her through her nuanced expressions. In the final
episode, when she uncovers a secret, the camera stays fixed on her face. The
shifting expressions and the rhythm of her breath alone leave the audience
stunned. Perhaps that’s why she recently won the Golden Globe Award for Best
Actress (TV Series).
In conclusion, both works are of exceptional quality. One
tells the story of the end of the world, the other of its beginning. One is
modern, the other mythological. One is on OTT, the other a live performance.
Yet both succeed in capturing the audience’s mind. These two flames, standing
at opposite ends, illuminate the heart equally.
-
Amit Bhole, New Delhi




