गेल्या खेपेला मुंबई लोकल मध्ये मला जबर धक्का बसला. म्हणजे धक्के बसल्याशिवाय लोकलचा प्रवास होऊच शकत नाही हे खरंच ! पण एके काळच्या ९:००ची fast पाकडणाऱ्या मला आता मध्येही शिरता नाही आले आणि मी स्टेशनवर बॅगेतल्या पाण्यासकट सांडलो . कसाबसा क्षणार्धात सावरून चढल्यावर मग विचार आला हे झालं कसं ? यापेक्षा लई गर्दी झेललीये मी. लगेच उमगलं मेट्रोची सवय भोवली.
महानगरांची तुलना हा माझा आवडता विषय. मुंबई-दिल्ली अधिकच . कारण दोन्ही ठिकाणचा दीर्घ आणि पाहिल्याहाती अनुभव. त्यातल्यात्यात Public Transport म्हटलं म्हणजे तुलनेत साम्यभेद अगदी प्रकर्षाने जाणवतात .
मुंबई लोकल म्हणजे वेळापत्रक ! ७:१२ ची सुटली तर पुढची fast ७:२६ ला हे अगदी अबालवृद्धांना पाठ ! त्यानुसार दिनचर्या ठरलेली . इतकेच काय तर जागाही ठरलेल्याच .दिल्ली मेट्रोचं मात्र तसं नाही. एक गेली तर पुढली ००:०२ मिनिटांनी हेच तेवढं कळतं . वेळापत्रक असलं तरी ते कुणी पाहिलेलं नसतं . मुंबई-दिल्ली चा मूलभूत फरक हा इथे दिसतो . घड्याळाच्या काट्यावर नाचणारा माणूस दिल्लीत आला की आळशी बनतो आणि दिल्लीकराला मुंबईचा वेग सहन न झाल्याने तो परत उत्तरेकडे धूम ठोकतो .
दिल्ली-मुंबईचा फरक फलाटावर पण ओळखता येतो. कुठलेही चिन्ह / arrow नसताना डब्ब्यात शिरण्यासाठीची मुंबईसारखी शिस्त दिल्लीत नाही. पिवळे निळे निरनिराळे चिन्ह असली तरीही त्यांना पायाखाली तुडवत सज्जन लोक मेट्रोत चढण्याचा हक्क बजावतात. तुडूंब भरलेल्या लोकलमध्ये लटकणाऱ्या कवायतखोरांमागे अजून किती जागा आहे हे उमगायला एक-दोन आठवड्याचा प्रवास पुरेसा असतो. मग कळतं ही जागा डब्यात नसून मुंबईकरांच्या हृदयात आहे. कितीही गर्दी असू देत लोकल प्रत्येकाला सामावून घेतेच. दिल्लीच्या मेट्रोमध्ये पारदर्शी दरवाज्या खिडक्यांमागे किती जागा आहे याचा अंदाज लगेच बांधता येतो. फलाटावर येणारी मेट्रो पाहताच जर रिकामी seat दिसलीच तर मग निळ्या पिवळ्या चिन्हाची जी पायमल्ली होते तिचा हिशोब नाही. मेट्रोत लोकलप्रमाणे कवायतखोरांना संधी नसली तरी दरवाजा उघडताच वेगवान दबंग बाहेर पडतात. आतल्या डोळ्यांना बाहेरच्या आणि बाहेरच्या डोळ्यांना आतल्या जागेचा शोध असतो. ही सळमिसळ दरवाजा बंद होईस्तोवर चालते. कित्येकदा तर मला प्रश्न पडतो तो driver काय ठरवून हे दरवाजे बंद करत असेल? म्हणजे लोकलप्रमाणे घड्याळातला सेकंद काटा पाहून की लोकांना सामावण्याची क्षमता पाहून?
एकदा प्रवास सुरु झाला की मुंबईकरांच्या घामेजलेल्या अंगाला धावत्या लोकलमधील हवेची झूळुक गार करून सोडते. दिल्लीकरांना हे सुख मेट्रोतले AC देते. किंबहुना हेच AC या प्रवासातले मुख्य आकर्षण बनते. कळत वा नकळत ! मग सुरु होतात अबोल विनंत्यांचे अर्ज! समजा कुणी lucky असेलच तर त्याला लोकलमध्ये तीन सीटवर चौथ्या जागेसाठी उमेदवारी मांडता येते. आणि जागा मिळते पण! मग अर्धा पार्श्वभाग टांगता ठेवत डुलकी घ्यायला मोकळा ! मेट्रोत मात्र सातची सीट असते. टी पण दोन्ही बाजूंनी बंदिस्त . म्हणजे सातवर आठवा यायचा झालाच तर सीटवर नाही त्याला हृदयात जागा द्यावी लागते आणि आश्चर्य म्हणजे दिल्लीकराला हे मेट्रोने यशस्वीपणे शिकवले. स्त्रियांसाठी /वृद्धांसाठी जागा देणे हा शिष्टचार दिल्लीकराला आत्मसाद करणे भाग पाडले या मेट्रोने.
Public Transport मध्ये आत कसं वांगायचं हे मुंबईकर बाहेर शिकतो आणि बाहेर कसं वागायचं हे दिल्लीकर आत शिकतो!
Great article. A good take on the classic Delhi Mumbai comparison :)
ReplyDeleteWow! Lokho, Ek naveen lekhak udayala alela ahe. Layee bhari :).
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि आशयघन चित्र रंगवलेस. दिल्ली मुंबईतील ट्रेनप्रवासातील 'अंतर' असो वा माणसांच्या औदार्यातल्या छटा.. जमून आलंय सारं अगदीच.
ReplyDeleteमुंबई लोकलच्या फर्स्ट व सेकंड क्लास मध्ये सुद्धा जरी फक्त स्टीलचे बार दिसत असले तरी दोन्हींत जमीन अस्मानाचा फरक असतो.
मेट्रोचा प्रवास खूपदा अनुभवला नसला तरी तुझ्या ब्लॉगवरून ते लक्षात येतंय.
कॅपिटॉल! ! !
फारच छान!समर्पक शीर्षक आणि शेवट.... अजून वाचावं असं वाटत राहिलं!
ReplyDeleteNice, fluent and honest...
ReplyDeleteKeep writing regularly bro..
मध्ये आत कसं वांगायचं हे मुंबईकर बाहेर शिकतो आणि बाहेर कसं वागायचं हे दिल्लीकर आत शिकतो!
ReplyDelete---मिताक्षरी चपखलपणा....
������
Antariche dhave swabhave baheri... Mumbai ani Delhit rahilelya anekanna don shaharantla farak tochla. Pan to abhivyakt karnyasathi Bholepana lagto....
ReplyDeleteNice......
ReplyDeleteवा फारच छान
ReplyDeleteअमितजी
ReplyDeleteआपल्या सिद्धहस्त लेखनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लेखाजोखा अतिशय ऊत्कृष्ट पणे मांडलाय. दोन महानगरात राहणाऱ्या समाजाचे स्वभाव विषेश मनःचक्षुसमोर ऊभा राहतो.
आपल्या लेखनातून समाज मनाचा आरसा असाच पुन्हा एकदा नविन BLOG मधुन दिसावा ही अपेक्षा.
आपले लेखन कौतुकास्पद आहे. अभिनंदन
अतिशय सुदर लेख। व्य।क्तीप भौतिक-सुख सुविधा मिळाल्याे कि लगेचच त्यावचा आदि होता आणि पूर्वी स्वरत: केलेली कार्य त्यास पुन्हाह करताना अवघड वाटतात। दिल्ली मध्ये् मुंबईपेक्षा खुप उत्तहम सार्वजनिक वाहतुक सेवा आहे पण एका व्य्क्तिहमध्येा हवी असलेली शिस्ति आणि नियम पाळायची सवय दिल्लीहकरामध्येज मुंबईकराच्याय दिसुन येत नाही। दिल्लीलकर नियमाची आणि शिस्तचची पायदळी करत आहेत म्ह णूण मेट्रोला त्यायच्यादमध्येा सवयी शिकविण्या ची आवश्यपकता भासत आहे। लोकलमध्येी तीन सीटवर मुंबईकर चौथा सामावुन घेवु शकतात पण दिल्लीलकर मेट्रोमध्ये् सात सीटवर आठवा सामावुन घेवु शकत नाहीत हे ‘‘मग कळत ही जागा डब्यात नसून मुंबईकरांच्या हृदयात आहे’’ या टोल्यानवुन दिसुन येते। समाजामध्ये /सार्वजनिक वाहनामध्येह कसे वागावे हे मुंबईकराना शिकविण्या्साठी कोणत्यााही निशानाची गरज भासली नाही मात्र दिल्लीनकरासाठी हे कार्य मेंट्रो सातत्यााने करत आहे। सार्वजनिक विष्यावर आपण केलेला टोला खुपच मार्मिक आहे आणि आपण अशाच विष्यावर वारवार लेखन करित राहवेत हीच अपेक्षा।
ReplyDeletekhup sunder lekh aahe. delhi la na jata imagin karta aale .. :)
ReplyDeleteस्त्रियांसाठी /वृद्धांसाठी जागा देणे हा शिष्टचार दिल्लीकराला आत्मसाद करणे भाग पाडले या मेट्रोने.
ReplyDeleteफारच अचूक व अप्रतिम निरीक्षण ....
Wow... Such a nice comparison. Great observation of difference of psychology of people from different cities and explained with such a nice example. You write very vell.
ReplyDelete