Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात. एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत. कारण Pluribus आणि हमारे राम दोन्ही कलाविष्कारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खास छाप पडली आहे, हे निश्चित!!

मी काही समीक्षक अथवा स्तंभ लेखक नाही. मात्र जेव्हा आतून हलून जातो तेव्हा लेखणी उचलतो. Vince Gilligan च्या “प्लुरिबस” ने आणि राहुल भूचर च्या हमारे राम ने असंच काहीसं केलंय. Pluribus या इंग्रजी वेबमालिकेमध्ये पोस्टआपोकलेप्टिक म्हणजे प्रलय्योत्तर साचा आहे. तर हमारे राम मध्ये रामायणच रंगमंचावर जिवंत केलं गेलं आहे. आशयाबद्दल सांगायचे तर “प्लुरिबस” मध्ये जगावर संकट आले असून परग्रह सदृश शक्तीने सर्व जनतेचा मनाचा ताबा घेतला आहे आणि त्यातून निर्माण झाले आहे- एक सामूहिक मन.  वाचली आहे ती यातील नायिका. तिच्या मनावर काहीही फरक पडलेला नाही आणि ती अडकत जाते विचित्र प्रसंगात. दुसरीकडे हमारे राम” 
मध्ये आधी म्हटल्याप्रमाणे रामायण सादर केले गेले आहे. सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या “स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती” प्रमाणे या नाट्य सादरीकरणाची देखील सुरुवात लवकुशांच्या गीताने होते आणि आपण प्रेक्षक स्वतःला रामायणाच्या मधोमध पाहतो. त्यातच जर लवकुश थेट प्रेक्षकांच्या मधूनच- अगदी सभागृहाच्या मागील दरवाजातून - प्रवेश करत असतील तर तो प्रभाव अधिकच परिणामकारी वाटतो. मग सुरू होते रंगमंचावर दृश्यकाव्य मेजवानी!

मंचावर नाट्यसादरीकरणामध्ये अनेक सुखद धक्के दिग्दर्शक गौरव भारद्वाज देतात. रंगमंचाच्या बॅक ड्रॉप साठी तंत्रज्ञानाचा वापर करत एक स्क्रीनच सज्ज केले आहे. त्यावर प्रवेश प्रसंगांन्वये चित्रे बदलत जातात. जसे सुरुवातीलाच पडदा उठल्यावर राजाराम उच्चस्थ सोनेरी सिंहासनावर बसून लवकुशांचे गीत ऐकून मंत्रमुग्ध होत असताना स्क्रीन राजसभेचे चित्र दाखवते आणि आपण थेट पोहोचतो रामसभेत! नंतर सीतेचे वसुंधरामातेत विलीन होणे ही देखील उत्कृष्ठ पद्धतीने दाखवण्यात आहे आले. अशा योग्य तांत्रिक गोष्टी वापरून हे नाट्य छान सजले आहे. सादरीकरणाच्या बाबतीत “प्लुरिबस” अगदी साधे आहे. खरं तर हे साधेपणच त्याचे वेगळेपण ठरते. परग्रह आक्रमण, प्रलय अशा बोजड संकल्पनांना अतिशय टोन डाऊन करत मांडल्यामुळे “प्लुरिबस” प्रभाव ठरते.  

मानव जात संपत आली आहे आणि नायिका-Carol- एकट्यानेच मानव म्हणून वावरते आहे. अशा प्रसंगांना दाखवताना उगाचचा आकांड तांडव विन्स गिलीगन टाळतात. याचे कारण कदाचित हे असावे की सर्व विनाशी प्रलय कोणीच पाहिलेला नाही आणि एक दिग्दर्शक किंवा रचिता म्हणून सिरीज मधून जो इम्पॅक्ट त्यांना दाखवायचा आहे तो अशा सर्वसामान्य संकल्पनांना छेद देणारा असल्यानेच प्रभावी ठरतो. त्यामुळेच कदाचित या सिरीजच्या निर्मितीसाठी खूप जास्त कॅमेऱ्याची गरज पडली नसावी. कमी संसाधनात अधिक प्रभाव याच्या सर्व 9 एपिसोड मध्ये वाटतो.

नायिकेचे घर आणि तिचे Zosia नामक सामूहिक मला मनाशी संभाषण हेच याचे मुख्य सूत्र ठरते. यादरम्यान नायिकेने केलेल्या छोट्या मोठ्या sorties आकर्षक आणि उत्कंठावर्धक वाटतात. ज्यामध्ये Carol ला सामूहिक मनाचे नानाविध पैलू कळतात आणि ती अचूकपणे ते सर्व नोंद करत राहते.

"प्ल्युरिबस" या वेबमालिकेतील संवादशैली आधुनिक, वेगवान आणि डिजिटल युगातील वास्तव प्रतिबिंबित करणारी आहे. पात्रांमधील बोलणं थेट, तर्कशुद्ध आणि प्रसंगानुसार ताण‑तणाव निर्माण करणारं आहे. त्याच्या उलट, "हमारे राम" या नाटकातील संवाद अधिक सांस्कृतिक, भावनात्मक आणि परंपरागत कथनशैलीवर आधारित आहेत. या नाटकात शब्दांना आध्यात्मिक वजन आहे, तर "प्ल्युरिबस" मध्ये शब्द परिस्थितीचं विश्लेषण करतात. त्यामुळे दोन्ही कलाकृती संवादाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जगांची निर्मिती करतात—एक आधुनिक वास्तवाचं, तर दुसरी सांस्कृतिक मूल्यांचं. जसं “प्लुरिबस” मधले नायिका Carol  आणि सामूहिक मनाची प्रतिनिधी Zosia यामधील हे संभाषण:

Carol: You people make no goddamn sense, do you know that? "We wanna make you happy", you say. "Your life is your own", you say. And agency, I've got all this agency! But, I mean, I guess I have agency just until I don't?

Zosia: Carol, if you were walking by a lake and you saw somebody drowning, would you throw them a life preserver? Of course you would. You wouldn't think, you wouldn't wait, you wouldn't try to get consensus on it. You'd just throw it.

Carol: So now I'm drowning?

Zosia: You just don't know it.

या  उलट रावणाचे “हमारे  राम” मधील तत्त्वज्ञान:

“ध्येय अनेक नहीं एक होंना चाहिये  और उसे पाने के रास्ते एक नही अनेक होने चाहिये। ”



पात्र निवड व अभिनय हे दोन्ही कलाकृतींमध्ये त्यांचे बलस्थान ठरले आहे. “हमारे राम” बद्दल बोलायच तर तब्बल तीन दशकांनंतर (एन एस डी सुटल्यावर) आशुतोष राणा रंगमंचावर पुनरागमन करत आहे. रावणाच्या भूमिकेसाठी त्याची निवड म्हणजे दिग्दर्शक गौरव भारद्वाज ला सलामच! रावण केवळ एक असुरश्रेष्ठ नसून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे नाना डंगी पैलू- शिवभक्त, विद्वान, लंका नरेश- हे आशुतोष ने लीलया पेलले आहेत. रामेश्वरचा शिवलिंग स्थापनेचा प्रसंग म्हणजे मला रावणाच्या व्यक्तिमत्त्वातील द्वंद्वाचा परमोच्यबिंदू वाटला. पण आशुतोष राणा ने त्याचा बाऊ न होऊ देता इतक्या सहजपणे साकारला आहे की जर एखाद्या नाट्यप्रवेशासाठी ऑस्कर असते तर यानेच ते पटकावले असते. एकीकडे आपण परस्त्रीला-सीतेला-बळजबरीने बंदी बनवली आहे आणि दुसरीकडे एक शिवभक्ताचार्य म्हणून रामेश्वरला रामाचाच पुरोहित म्हणून आपल्याला काम करावे लागणार आहे या सामान्यांसाठी अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला असामान्य सामर्थ्य असणाऱ्या रावणाने कसे सामोरे गेले असणार याचा प्रत्यय या प्रवेशाद्वारा येतो.खरंतर रामायणातला हा प्रसंग मला ठाऊकच नव्हता. पण दिग्दर्शकाने अनेक रामायणी आख्यायिका चपखल पणे नाटकात पेरल्या आहेत. राहुल भूचर यांनी सादर केलेला राम देखील मनात घर करतो. रामाला साजेचा आवाज, लकब, उंची, सौन्दर्यपूर्ण शालीनता यांची देणगीच जणू त्याला लाभली आहे. अभिनयाबद्दल बोलताना दीप्ती कुमारने सादर केलेली शूर्पणका आठवली नाही तरच नवल! संपूर्ण रामायण इवलेसे योगदान असणारी शूर्पणका
इथे मात्र नाटकानंतर पात्रपरिचयाच्या वेळी टाळ्यांचा उत्साहद्वारा काही औरच सांगते. दीप्ती कुमारने केलेली शूर्पणखा तिच्या कपटी बाण्यासह नेमकी टिपली आहे.

या नाटकाचा संपूर्ण लवाजमा 148 लोकांचा आहे असं पात्र परिचयाच्या वेळी सांगण्यात येते. नक्कीच यापेक्षा कमी जनता पलूरी बस मालिकेच्या नऊ एपिसोड मध्ये दिसते. अभिनयाच्या मोर्चावर “प्लुरिबस” मागे नाही. Carol निभवणारी Rhea Seehorn एक दर्जेदार अभिनेत्री आहे. आपल्या भोवतीचे कोसळणारे विश्व तिने आपल्या नानाविध भावाविष्कारातून घट्ट पकडून ठेवले आहे. मालिकेच्या शेवटी ज्यावेळी तिला एका गुपिताचा उकल होतो तेव्हा कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर स्थिर असतो. आणि चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि जोडीला श्वासातील अंतर- केवळ याच्या जोरावर ती प्रेक्षकाला स्तंभित करते. म्हणूनच कदाचित नुकताच तिला 83rd Golden Globe Award मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (टीव्ही सिरीज) चा अवॉर्ड मिळाला आहे.

एकूणच दोन्ही कलाकृती उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. एक जगाच्या अंताची गोष्ट सांगते तर दुसरी जगाच्या आरंभाची, एक आधुनिक - दुसरी पौराणिक, एक ओटीटीवर- दुसरी लाईव्ह परफॉर्मन्स असे असले तरीही प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घ्यायला कमी पडत नाही. दोन टोकांना उभ्या असणाऱ्या या दोन्ही ज्योती मन उजळणाऱ्या ठरतात.

-अमित भोळे, नवी दिल्ली

__________________________________________

English Translation: 


Pluribus हमारे राम

 

Last week, I experienced two extraordinary works of art—one on Apple TV and the other on stage. And now both are fighting for space in my mind, because  Pluribus  and  Humare Ram  have each left a distinct mark in their respective realms.

 

I am neither a critic nor a columnist. But whenever something shakes me from within, I feel compelled to write. Vince Gilligan’s  Pluribus  and Rahul Bhuchar’s  Humare Ram  did exactly that.  Pluribus , an English web series, is set in a postapocalyptic world, while  Humare Ram  brings the Ramayana alive on stage. In terms of content,  Pluribus  depicts a world under threat, where an alien-like force has taken control of the minds of all people, creating a collective consciousness. The protagonist is the only one unaffected, and she finds herself caught in bizarre situations. On the other hand,  Humare Ram  presents the Ramayana on stage. Just like Sudhir Phadke’s  Geet Ramayan  begins with the song “Svaye Shriram Prabhu Aikati Kushalav Ramayan Gati,” this play too opens with the song of Luv and Kush, instantly transporting the audience into the heart of the Ramayana. And when Luv and Kush enter not from backstage but from the auditorium’s rear door, the impact becomes even more powerful. What follows is a visual poetic feast on stage.

 

Director Gaurav Bhardwaj delivers many pleasant surprises in the stage production. A screen is used as a technological backdrop, changing visuals according to the scenes. For instance, when the curtain rises and King Rama sits on a golden throne listening to Luv and Kush’s song in awe, the screen displays the royal court, making us feel as though we’ve stepped right into it. Later, Sita merging into Mother Earth is also portrayed beautifully. These thoughtful technical elements enhance the play. In contrast,  Pluribus  is extremely simple in its presentation. In fact, this simplicity becomes its strength. Heavy concepts like alien invasion and apocalypse are toned down so effectively that the series becomes even more impactful.

 

Humanity is on the verge of extinction, and the protagonist—Carol—is the only human left. While depicting such scenes, Vince Gilligan avoids unnecessary chaos or melodrama. Perhaps because no one has actually witnessed a real apocalypse, the impact he aims for comes from breaking away from conventional portrayals. This may also be why the series doesn’t rely on excessive camera work. Across all nine episodes, the theme of “greater impact with fewer resources” is evident.

 

The story revolves around Carol’s home and her conversations with Zosia, the representative of the collective mind. Carol’s small and large sorties during this time are gripping and suspenseful. Through them, she discovers various facets of the collective consciousness and records them meticulously.

 

The dialogue style in  Pluribus  is modern, fast-paced, and reflective of the digital age. The conversations are direct, logical, and tensionbuilding. In contrast,  Humare Ram  features dialogues rooted in culture, emotion, and traditional storytelling. The words carry spiritual weight, whereas in  Pluribus , words analyze situations. Thus, both works create entirely different worlds through their dialogues—one modern and realistic, the other cultural and valuedriven. For example, the conversation between Carol and Zosia in  Pluribus :

 

Carol:  You people make no goddamn sense, do you know that? “We wanna make you happy,” you say. “Your life is your own,” you say. And agency, I’ve got all this agency! But, I mean, I guess I have agency just until I don’t?   

Zosia:  Carol, if you were walking by a lake and you saw somebody drowning, would you throw them a life preserver? Of course you would. You wouldn’t think, you wouldn’t wait, you wouldn’t try to get consensus on it. You’d just throw it.   

Carol:  So now I’m drowning?   

Zosia:  You just don’t know it.

 

And in contrast, Ravana’s philosophy in  Humare Ram :

 

 “One must have not many goals, but only one. And the paths to achieve it may be many.”

 

Casting and performances are strengths of both works. Speaking of  Humare Ram , Ashutosh Rana returns to the stage after nearly three decades (since leaving NSD). Choosing him for the role of Ravana deserves a salute to director Gaurav Bhardwaj. Ravana is not just a demon king; he is a devotee of Shiva, a scholar, and the ruler of Lanka—Ashutosh portrays all these layers effortlessly. The scene depicting the installation of the Shiva Linga at Rameshwaram felt like the pinnacle of Ravana’s inner conflict. Yet Ashutosh Rana performs it with such ease that if there were an Oscar for a stage entry, he would have won it. On one hand, he has forcibly imprisoned Sita, another man’s wife; on the other, as a devout priest of Shiva, he must perform rituals for Rama himself. This uncomfortable situation for ordinary people becomes a moment of extraordinary strength for Ravana, and the audience experiences this through the scene. I wasn’t even aware of this episode from the Ramayana, but the director has woven many such lesserknown stories seamlessly into the play.

 

Rahul Bhuchar’s portrayal of Rama also leaves a lasting impression. His voice, demeanour, height, and graceful composure seem tailormade for the role. And speaking of performances, how can one forget Deepti Kumar’s Shurpanakha? Though Shurpanakha has a small role in the Ramayana, the thunderous applause she receives during the cast introduction says everything. Deepti Kumar captures Shurpanakha’s cunning nature perfectly.

 

The entire production involves 148 people, as announced during the cast introduction. In contrast, far fewer people appear across the nine episodes of  Pluribus . Yet  Pluribus  is no less impressive in terms of acting. Rhea Seehorn, who plays Carol, is a remarkable actress. She holds together the collapsing world around her through her nuanced expressions. In the final episode, when she uncovers a secret, the camera stays fixed on her face. The shifting expressions and the rhythm of her breath alone leave the audience stunned. Perhaps that’s why she recently won the Golden Globe Award for Best Actress (TV Series).

 

In conclusion, both works are of exceptional quality. One tells the story of the end of the world, the other of its beginning. One is modern, the other mythological. One is on OTT, the other a live performance. Yet both succeed in capturing the audience’s mind. These two flames, standing at opposite ends, illuminate the heart equally.

 

-          Amit Bhole, New Delhi

33 comments:

  1. फारच छान शब्दात दोन्ही कलाकृती विषयी उत्कंठा निर्माण केलीस👌 You can actually become a critic of high calibre!

    ReplyDelete
  2. Hi Amit, I haven't watched either of these yet, but you have created enough excitement towards both of these productions for me. I look forward to watching them. Well written!

    ReplyDelete
  3. Dear Amit फारच सुंदर ,कलाकृती विषयी आतुरता वाढविली . वेळात वेळ काढून तुझं सर्व विषयांकडे लक्ष्य असते, खरच तुझं कौतक करावं तेवढ कमीच ....

    ReplyDelete
  4. छान लिहील आहे, दोन्ही कलाकृती बघण्याचा उत्सुकता निर्माण झाली मनात, लेखन दृश्यमय आहे, सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे उभ्या राहतात

    ReplyDelete
  5. Respected Shri Amit sir, Greetings!!! You are a true art lover. You take out time to enjoy art. Besides your busy routine, you take out time to write criticism or your opinion about it or how the art impacted on it. Enjoy reading your posts. More power to your pen!!!!

    ReplyDelete
  6. Nicely written ! U got that knack 👏👏

    ReplyDelete
  7. अमित, खूपच अप्रतिम लेख! 'Pluribus' आणि 'हमारे राम' या दोन पूर्णपणे वेगळ्या विश्वातील कलाकृतींची तू ज्या प्रकारे सांगड घातली आहेस, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. तुझी निरीक्षण शक्ती आणि मांडणीची शैली (विशेषतः रावण आणि कॅरोलच्या पात्रांचे विश्लेषण) खूप आवडली. तांत्रिक बाजू आणि अभिनयाचे पदर तू अगदी नेमके उलगडले आहेत. वाचताना असे वाटते की आपणही त्या अनुभवाचा भाग आहोत. लिहित राहा!

    ReplyDelete
  8. फारच छान शब्दात दोनी कलाकृतीचे महिमा मांडला आहे. वाचताना असे वाटत आहे की आपण स्वतः प्रत्यक्ष पाहत आहोत. शब्द मांडणी अप्रीतम. खूप खूप शुभेच्छा असेच लेख वाचायला मिळतील हीच आशा

    ReplyDelete
  9. वा ! छान शब्दात मांडले आहे.

    ReplyDelete
  10. दोन्ही कलाकृती पहावयाचे ठरवले आहे. अप्रतिम रसग्रहण केले आहे

    ReplyDelete
  11. विषयाची मांडणी, आणि भाषेचा ओघ खूप छान आहे. ब्लॉग वाचताना वेळ कसा गेला कळलाच नाही. पुढील लेखांची उत्सुकतेने वाट पाहतो. अभिनंदन

    ReplyDelete
  12. सर, दोन्ही कलाकृतींचे उत्तम रसग्रहण केले आहे, त्यासाठी आपले अभिनंदन. दोन्ही कलाकृती या त्यात्या विषयांमधील मास्टर पीस आहेतच आपण ते सोप्या पद्धतीने आणि विशिष्ट शैलीद्वारे आम्हा वाचकांपुढे आणून ठेवले आहे, त्यासाठी आभार. आपल्यातील एका चांगल्या समीक्षकाची ठळकपणे ओळखही यानिमित्ताने आम्हाला झाली.

    ReplyDelete
  13. खूपच सुरेख लेखन .. 👌🏼

    ReplyDelete
  14. मस्त दोन्ही कलाकृती पहावयाचे ठरवले आहे.

    ReplyDelete
  15. Ashwini Chopde BholeJanuary 22, 2026 at 8:30 AM

    Yes, some really good high quality content on OTT today. Tumhi natak-ahi pahile, that’s very good experience.. chan review dila aahe doghancha!!

    ReplyDelete
  16. Nicely articulated views Amit, excellent review. Readers could almost visualise both the experiences through your naration.

    ReplyDelete
  17. खूपच सुरेख लेखन .. 👌🏼

    ReplyDelete
  18. Amazing विवेचन 👍

    ReplyDelete
  19. Nicely written.I have started watching pluribus recently and after reading your blog now curious to find what else is in store.

    ReplyDelete
  20. Good work and well articulated thoughts on the creative arts. Keep it up Amit Dada

    ReplyDelete
  21. अमित जी , खूप छान सहज सोप्या भाषेत ,निरीक्षण पूर्ण समीक्षा नोंदवली आहे आपण ,वाचतांना तुमच्यातली सूक्ष्मातले सूक्ष्म बारकावे टिपण्याची चुणूक जाणवते , मला तर ती तुमच्या लहानपणापासून च जाणवत होती.
    छान असेच लिखाण आपल्या हातून होत राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हाला शुभेछ्या .

    ReplyDelete
  22. प्रिया मित्र अमित

    तुझ्या लिखाणाला असेही तोड नाही. आणि ह्या वेळी जणू तुझ्या सोबत त्रेता युगात जाऊन "श्री रामचंद्रांना" भेटून आल्यासारखा वाटतं. तुझे प्रत्येक वाक्य जणू समोरील प्रसंग माझ्या समोर घडतंय कि काय आसा भास घडवतात. हे सगळे प्रसंग तू कदाचित नाट्य रूपात पहिले असतील पण वाचतांना एक वाचक म्हणून आम्ही ते प्रत्यक्ष जगलो आसा वाटत.

    “स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती” ह्या वाक्यावरून लहान पानाच्या स्मृती जाग्या होतात. कारण हीच गाणी अडकून आपण मोठे झालोत.तसेच रामसभेतील दृश्य अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेस जणू श्री रामचंद्राचे दर्शन झाले असे वाटते ते वाखान्या जोगे आहेत.

    प्लुरिबूस ची नायिका तसेच तिचे घर आणि तिचे साम्भासहन जणू आपण तिच्या परिवाराचा अविभाज्य अंग असल्या प्रमाणे भासले. ठसेल कॅरल आणि झोसिया मधील सौवाद जणू माझ्या समोर होतंय आसा वाटलं. आणि रावणाचे “हमारे राम” मधील तत्त्वज्ञान:जणू रोजच्या जीवनातील प्रसंगांना कसा तोंड द्यायचा हे सांगुळ गेले.

    पारिवारिक, सामाजिक, आणि कर्तव्य दाखतेतून वेळ काढून तू हे इतका अप्रतिम सुंदर लिहितोस हेच मुळी कौतुकास्पद आहे. तुझ्या पुढील लिखाणाची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही. तू लिहीत राहा जेणे करून काही चांगल्या गोष्टी आणि तुझंही स्वानुभव वचनी येत राहतील. आणि तुला खूप खूप शुभेछया पुढील लिखाण साठी.

    एक अनामिक श्रोता

    ReplyDelete
  23. अमित सर,
    लेख वाचताना केवळ दोन कलाकृतींची समीक्षा नव्हे, तर दोन भिन्न काळ, विचारधारा आणि संवेदनविश्व यांचा सखोल संवाद अनुभवायला मिळतो.

    Pluribus आणि “हमारे राम” यांची तुलना करताना आशय, मांडणी, संवादशैली व अभिनय यांचा अतिशय समतोल आणि परिपक्व विचार मांडला आहे.

    लेख वाचताना अशी अनुभूती आली की, माध्यम वेगवेगळे असले तरी आशय जर प्रामाणिक असेल तर तो मन हलवून सोडतो—कधी शांतपणे विचारात बुडवतो, तर कधी नकळत अंतर्मुख करतो.

    लेखनातील हा भावनिक ओलावा, सूक्ष्म निरीक्षण आणि सांस्कृतिक जाण स्वतःचे अनुभव आठवायला लावतात.

    अशा संवेदनशील व आशयसमृद्ध लेखनाबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  24. Amazing writing 👍

    ReplyDelete
  25. प्रिय अमित सर,

    अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत आपण दोन्ही कलाकृती वाचकांसमोर ठेवल्या.
    दोन्ही कलाकृती मी आवर्जून बघेन.दररोजच्या बिझी शेड्युलमधून देखील आपण लिखाणासाठी वेळ काढतात हे नक्कीच स्पृहणीय आहे..

    आपले हार्दिक अभिनंदन !!

    ReplyDelete
  26. Sir aprtim marathi, aani khup sundar mandani kathechi.

    ReplyDelete
  27. सर, प्लुरिबस आणि राहुल भुचर यांचे 'हमारे राम' - खूप चांगले लिहिले आहे आणि दोन्हीमध्ये परस्पर संबंध/तुलना निर्माण करून शब्दांत व्यक्त केले आहे.

    ReplyDelete

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...