सावळ्या ,
ह्या वर्षीदेखील तुझ्या भेटीचा योग हुकला. तसे मी काही याकरीता नियोजन वैगेरे केले होते अशातला भाग नाही. तुझ्याशी खोटं बोलून काय करणार ? पण दररोजच्या "घर ते ऑफीस व परत" अशा वारी करणाऱ्या मला तुझ्या वारीसाठी वेळ मिळेल तर शपथ ! महानगराचा शाप आणखी काय? पण तुझे रूप मात्र मनापासून दूर नसते. तू या ना त्या रूपात तुझी आठवण मनात सदैव ताजी ठेवतो. कसं जमतं रे पंढरीनाथा तुला?
पोटोबावर लक्ष देता देता आम्ही विठोबालाच विसरतोय का काय अशी भीती वाटताच तुझ्या नामघोषांत टाळाचा गजर कानांवर पडतो आणि मनाला पंढरीची आस लागते. पण हल्ली हा गजर mobile ringtone च्या स्वरूपात असतो. आज असाच एका मित्राच्या WhatsApp profile वर तुझा फोटो पाहिला. तुझी महिमा अगाध आहे देवा. भक्त आपल्यापासून दूर गेला तर आपणच त्याच्याजवळ जायचं. कसारे भोळा तू? आणि आम्ही अप्पलपोटे काही हवं असेल तेव्हाच तुझी धाव घेतो. वारीला आलो नाही म्हणून तूच माझ्या लेखणीतून स्वतःला चितारत आहेस नं ?
Social media वरची माझी ही post जर कुणी वारीत वाचली, किंवा या post ची आठवण करत जर कुणी तुझ्या चरणी माथा टेकला, नाहीच काही झालं तर ही post वाचली आहे तो mobile तुझ्या गाभाऱ्यात पोचला तर ज्याप्रमाणे कित्येक वारकऱ्याना तुकोबाचे बोल ओठी आणि पंढरीचा कळस नजरी असताना जे समाधान आणि पुण्य लाभते तेच पुण्य का नव्हे पण समाधान तरी मला लाभो अशी प्रार्थना तुझिया चरणी करतो!
-वाट चुकलेल्या तुझ्या अनेक वारकऱ्यापैकी एक
भारी लिहिलंय.
ReplyDeleteवाह साहेब खुपच छान लिहिता
ReplyDelete👌🏼👍 अम्या, सावळ्या सुंदर लिहीलयस... महानगराचा शाप आणि रोजची वारी संकल्पना भारी आहेत. तुझी व्यथा सावळ्या नक्की समजून घेईल...
ReplyDeleteवारी वारी जन्म मरणाते वारी, आरी पडलो आता... हे खरेच आहे. या दुष्ट चक्राचा अर्थ पायी वारी सोहळ्यात समजतो. बाकी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे व समोरच्यावर अन्याय न करणे हीच खरी भक्ती !
So true and sweet amit. At some point each one of us should be able to prioritise properly. But this positive perspective of technology is quite heartening. Praying that you are able to participate in the waari next year. If you plan in advance it's not difficult
ReplyDeleteAwesome lihilay jiju !
ReplyDeleteLayee bhari
ReplyDeleteAmit bhai, awesomely written...
ReplyDeleteReally grate writing from you dear Amit.
ReplyDeleteas always expected from you
...Milind
खूपच छान..! मस्त..!
ReplyDeleteसावळ्या सारखंच सहज सुंदर!
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteAmya bhannat lihiles...patharichi aas nakkich vadhate hya divasat...pan himmat hot nahi...ani vel pan kadhata yet nahi...
ReplyDeleteMahangaricha shaap, khishat paisa, dokyala taap...
Aajkal samajik jeevanacha dushkal...facebook, whatsapp chya mitranni matr malamal...
Ithe saglyachich ghaai, todi pan usant nahi...
Varekaryacha mag mala watato heva...whatsapp var DP lavun mag mhanato Vithoba laksh theva..
Awesome lihilay jiju!
ReplyDeleteKhoop chhan ���� kharach aapan devapasun dur jatoy
ReplyDelete
ReplyDelete(Although English would do little justice to this beautiful write-up that is full of piercing truth, here is my bit)
The article brings up the following line: “Kahi hava asel tevhach tujhi dhaav ghetto”. A hidden implication of this line brings out a philosophical truth attached to our belief in the superpower. In times of adversity, most of us tend to latch our hopes onto this miraculous ‘pandurang’ of our own. When things work out, we are nothing less than a gaga in the colony! And ironically, if things do not work out, the entire resentment is against the same ‘pandurang’, whom once we worshipped head on heels! Why have we become believers or non-believers basis convenience? Probably, He indeed knows it all, the flaws of His children, and yet He forgives us all, by manifesting Himself when we forget to reach out to Him!, for his love is not bound by needs or greeds!
Somewhere herein, lies a great learning for mankind. Just think, can’t be we of help to the less privileged by being their ‘Pandurang’? :)
लय भारी। खूपच छान। पोटोबासाठी माणूस घर आणि ऑफिस यातच सध्या गुंतलेला आहे। पण तो कुठेही असला तरी हृदयापासून विठू रायासी जुडलेला आहे। फेसबुक, whatapp, टीव्ही या माध्यमावर विठू राया बदल काहिही वाचायला, बघायला मिळाले कि मनामध्ये एक वेगळाच आनंद होतो आणि विठोबा हमेशा आपल्या पाठीशी उभा आहे याची खात्री होते। तुमच्या लेख नी मला पण वाटतंय कि मी पण एक वारी चुकलेला वारकरी आहे। खूपच मार्मिक लेखन प्रत्येकाचा मनात घरटे करणारे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल।
ReplyDeleteBhari, vel kadhun tipane, lai bhari malco
ReplyDeleteKhup chan lihilay. kharch dhavpalichya ya jagat , aapan devala fakt garjechya veli athavato , anandathi athavato, pan devajaval jayala velch milat nahi. Pan ek sangu tumhala hey vatatay yach Pratik ahe ki tumhi devachya dur gelatch nahi.Dev aaplya manatach ahe.
ReplyDeleteJiju Keep writing, Waiting for ur next article
प्रिय अमितजी.
ReplyDeleteआपला भावस्पर्शी BLOG वाचुन एक वेगळीच अनुभुती मनात दाटून आली. आस्तिक सुशिक्षितांचे मनोगतच आपण अतीशय सुंदर शब्दात व्यक्त केले आहे. मी Computer Science चा प्राध्यापक म्हणून 25 वर्ष काम करतो. विठ्ठलावर माझी श्रध्दा आहे. आपण blog मध्ये व्यक्त केलेल्या भावना माझ्या सारख्या अनेकांच्या मनात निच्चित ऊचंबळुण आल्या असतील याची मला खात्री आहे. आपणासारख्या ऊच्च विद्याशिभुषित विदुषी समाजामध्ये परमेश्वरा प्रती सकारात्मक विचार करतात म्हणूनच सामाजिक एकतेची भावणा टिकून आहे. विठुराया आपणास ऊदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो.
आपला कृषिभिलाषी
प्रा अरूण गांगर्डे
अहमदनगर
Nice and so true jiju
ReplyDeleteखूपच छान..! मस्त..!
ReplyDeleteHeart Touching.
Jai Hari Vitthal
ReplyDeleteIt's True
Now a days this kinds of positive thinking required
Your following sentence
तुझे रूप मात्र मनापासून दूर नसते. तू या ना त्या रूपात तुझी आठवण मनात सदैव ताजी ठेवतो.
भक्त आपल्यापासून दूर गेला तर आपणच त्याच्याजवळ जायचं. कसारे भोळा तू?
This is a universal truth
As per our Chatur Veda Our God Is every where but only our view like that
Jai Hari Vitthal
Waiting your next blog
भाई तुझ्या "घर ते ऑफीस व परत" ह्या चक्राने तुकोबांच्या"शुकें नळिकेशीं गोवियेले पाय। विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥ची आठवण करून दिली .
ReplyDeleteनेहमीप्रमाणे-
"अप्रतिम अमित"
Mast yar. Lai bhari pan manapasun aahe he samjale.
ReplyDeleteKhup chan blog lihilat amit sir...!! Apratim..!!
ReplyDeleteमस्त लिहलंय सर.... पंढरपूर ला राहिल्या मुळे जे काही लिहलंय त्याला अजूनच relate करतो..
ReplyDelete~अभिजित शिंदे
खूपच छान,.. मस्त..!
ReplyDeleteKhup chan lihilay... Pls contact me if any one of you are interested in writing something good positive or even some good write-up. We will try and if it is appropriate and fits in the storyline, its original we will publish it in our newsletter.
ReplyDeletePlease email details to amitbhole@gmail.com
DeleteThanks.
Khup chaan lihilay sir.. Jay Hari..🙏🙏🙏
Delete