ती आणि तो
लग्नानंतर तिची पहिलीच दिवाळी होती आठ दिवस माहेरी राहून ती नुकतीच परतलेली . चार भावांनी दिलेली भाऊबीज दररोज न चूकता सर्वांच्या नजरेला चुकवून टी मोजत असे. ह्या स्वतःच्या हक्काच्या पैशाचं काय काय याचे स्वप्न रंगवण्यात घालवला वेळ दिवसाचा सारा शीण घालावी. आजही सायंकाळचा स्वयंपाक उरकल्यावर ती आपल्या खोलीत ५००/१०००च्या नोटा मोजत होती. दैवाला मात्र हे तिचं सुख पाहावलं नाही. दिवाणखान्यात सुरु असलेला TV काही औरच सांगत होता .
-------------*------------
तो खूप भ्रष्ट contractor आहे हे सगळ्या जगाला ठावुक आहे पण त्याला याच्याशी काही घेणेदेणे नाही निदान आज तरी नाही त्याचे लक्ष त्याच्या खीशात आणलेल्या 1000 च्या नोटा कड़े होत त्याने स्वतः ला दर महीन्याला एक लाख अस टारगेट दिल होत. आणि पहील्याच महीन्यात हा घात झाला असो सध्या त्याची चिंता वेगळी होती आणि तीच्या समाधानापर्यंत पोहोचन्यासाठी ११ व्यक्ति त्याच्या पुढे उभ्या होत्या अखेर तासाभराने का होईना त्याचा नंबर आला. सर्वात लांब पल्ल्याची गाडी त्याने आधीच पाहून ठेवली होती. १st class ची सहा रिटर्न तिकिटे काढून तो आपल्या काळ्या पैशाला white करण्यात तो यशस्वी झाला. परत जाताना मात्र आता पुढे काय त्याला उमजत नव्हतं .
-------------*------------
divorce नंतर आपल्या मुलीला दिलेल्या वचनाप्रमाणे जगातली सातही आश्चर्ये दाखवावी हेच तीच ध्येय होतं . पैशाची कशीबशी जमवाजमव करून प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ती तिच्या मुलीला आग्र्याचा ताजमहाल दाखवायला आली होती. त्यांनी हॉटेलमधून checkout केलं. दिवसभर ताजमहाल पाहायचा आणि भल्यापहाटे परतीची flight दिल्लीहून गाठायची हा प्लॅन होता. तिचे पैसे पण संपले होते. नेमके मोजके तेवढे अखेच्या पल्ल्यासाठी काढून ठेवले होते. Indian Currency च्या ५०० च्या नोटा तेवढ्या आता शिल्लक होत्या . आणि ताजमहाल ला पोहोचताच ह्या नोटा आता कामाच्या नाही असं कळलं. परदेशी असल्याने ती कमालीच्या कोंडीत सापडली.
-------------*------------
त्याला ऑफिसमध्ये कुणी विचारात नसे. जी चौकशी व्हायची ती फोनवरच आणि केवळ आपल्या बिलाचे काही पैसे आले आहेत का हे जाणून घ्यायला. Cash section मधे कोण आहे त्याचे नाव काय वरच्या मजल्यावर बसलेल्या दिगज्जांना जाणून घ्यायची कधी गरज नाही वाटली. आज अचानक सकाळी सकाळी boss चा कॉल आला आणि बोलावून घेतले. मग दुसऱ्या सिनिअर चा कॉल , मग तिसरा ...सगळ्यांना आज कॅश खपवायला मदत हवी होती . त्यानेपण मग ठाम नकार द्यायला सुरुवात केली. अचानक boss चा boss झाल्याची भावना त्याच्यापण मनात डोकावली .
-------------*------------
दिवसभर इकडची तिकडची काम करून ती पैसे कमावत असे. शिकायला मुंबई;ला पाठवलेल्या मुलीशी बोलण्यासाठी मॅडम कडून मिळालेला मोबाइलला अजून निष्क्रिय होता. काय तर म्हणे recharge करायचा होता. म्हणजे नक्की काय ते पण माहिती नसताना आपल्याला मिळालेल्या उधारीचची १०००ची नोट घेऊन ती दुकानात पोहोचली. दुकानदाराने विचारला कितीचं recharge करायचं ? तिने १०० सांगितले आणि विचारलं की इतक्यात मुलीशी मुंबईला बोलता येईल न? दुकान दराने सर्वांसमोर हस उडवलं. १००च्या ९ नोटा परत करत म्हणाला, "ये पुढच्या महिन्यात यातलीच नोट घेऊन परत". दुकानदाराच्या उद्धटपणा तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही कारण तिच्या मनात मुलीशी बोलायची उत्सुकता होती. दुकानदाराचेपण त्याच्या whatsapp कडे कुठे लक्ष होते. तो १००० ची नोट प्रेमाने न्याहाळत होता.
-------------*------------
तो म्हणे आधी चहा विकायचा . नक्कीच सुट्टे पैसे नसल्याने कित्येकदा त्याने स्वतःच्या पदराला मुरड घातली असेल. अर्थतज्ञ त्या position वर जे नाही करू शकले हे त्याने करून दाखवले. पैशाला MODIfy करून काय काय होऊ शकतं आणि किती दूर याचा परिणाम होतो हा नक्कीच interesting मुद्दा ठरतोय.
तीनात चार, सातात आठ !
गेल्या खेपेला मुंबई लोकल मध्ये मला जबर धक्का बसला. म्हणजे धक्के बसल्याशिवाय लोकलचा प्रवास होऊच शकत नाही हे खरंच ! पण एके काळच्या ९:००ची fast पाकडणाऱ्या मला आता मध्येही शिरता नाही आले आणि मी स्टेशनवर बॅगेतल्या पाण्यासकट सांडलो . कसाबसा क्षणार्धात सावरून चढल्यावर मग विचार आला हे झालं कसं ? यापेक्षा लई गर्दी झेललीये मी. लगेच उमगलं मेट्रोची सवय भोवली.
महानगरांची तुलना हा माझा आवडता विषय. मुंबई-दिल्ली अधिकच . कारण दोन्ही ठिकाणचा दीर्घ आणि पाहिल्याहाती अनुभव. त्यातल्यात्यात Public Transport म्हटलं म्हणजे तुलनेत साम्यभेद अगदी प्रकर्षाने जाणवतात .
मुंबई लोकल म्हणजे वेळापत्रक ! ७:१२ ची सुटली तर पुढची fast ७:२६ ला हे अगदी अबालवृद्धांना पाठ ! त्यानुसार दिनचर्या ठरलेली . इतकेच काय तर जागाही ठरलेल्याच .दिल्ली मेट्रोचं मात्र तसं नाही. एक गेली तर पुढली ००:०२ मिनिटांनी हेच तेवढं कळतं . वेळापत्रक असलं तरी ते कुणी पाहिलेलं नसतं . मुंबई-दिल्ली चा मूलभूत फरक हा इथे दिसतो . घड्याळाच्या काट्यावर नाचणारा माणूस दिल्लीत आला की आळशी बनतो आणि दिल्लीकराला मुंबईचा वेग सहन न झाल्याने तो परत उत्तरेकडे धूम ठोकतो .
दिल्ली-मुंबईचा फरक फलाटावर पण ओळखता येतो. कुठलेही चिन्ह / arrow नसताना डब्ब्यात शिरण्यासाठीची मुंबईसारखी शिस्त दिल्लीत नाही. पिवळे निळे निरनिराळे चिन्ह असली तरीही त्यांना पायाखाली तुडवत सज्जन लोक मेट्रोत चढण्याचा हक्क बजावतात. तुडूंब भरलेल्या लोकलमध्ये लटकणाऱ्या कवायतखोरांमागे अजून किती जागा आहे हे उमगायला एक-दोन आठवड्याचा प्रवास पुरेसा असतो. मग कळतं ही जागा डब्यात नसून मुंबईकरांच्या हृदयात आहे. कितीही गर्दी असू देत लोकल प्रत्येकाला सामावून घेतेच. दिल्लीच्या मेट्रोमध्ये पारदर्शी दरवाज्या खिडक्यांमागे किती जागा आहे याचा अंदाज लगेच बांधता येतो. फलाटावर येणारी मेट्रो पाहताच जर रिकामी seat दिसलीच तर मग निळ्या पिवळ्या चिन्हाची जी पायमल्ली होते तिचा हिशोब नाही. मेट्रोत लोकलप्रमाणे कवायतखोरांना संधी नसली तरी दरवाजा उघडताच वेगवान दबंग बाहेर पडतात. आतल्या डोळ्यांना बाहेरच्या आणि बाहेरच्या डोळ्यांना आतल्या जागेचा शोध असतो. ही सळमिसळ दरवाजा बंद होईस्तोवर चालते. कित्येकदा तर मला प्रश्न पडतो तो driver काय ठरवून हे दरवाजे बंद करत असेल? म्हणजे लोकलप्रमाणे घड्याळातला सेकंद काटा पाहून की लोकांना सामावण्याची क्षमता पाहून?
एकदा प्रवास सुरु झाला की मुंबईकरांच्या घामेजलेल्या अंगाला धावत्या लोकलमधील हवेची झूळुक गार करून सोडते. दिल्लीकरांना हे सुख मेट्रोतले AC देते. किंबहुना हेच AC या प्रवासातले मुख्य आकर्षण बनते. कळत वा नकळत ! मग सुरु होतात अबोल विनंत्यांचे अर्ज! समजा कुणी lucky असेलच तर त्याला लोकलमध्ये तीन सीटवर चौथ्या जागेसाठी उमेदवारी मांडता येते. आणि जागा मिळते पण! मग अर्धा पार्श्वभाग टांगता ठेवत डुलकी घ्यायला मोकळा ! मेट्रोत मात्र सातची सीट असते. टी पण दोन्ही बाजूंनी बंदिस्त . म्हणजे सातवर आठवा यायचा झालाच तर सीटवर नाही त्याला हृदयात जागा द्यावी लागते आणि आश्चर्य म्हणजे दिल्लीकराला हे मेट्रोने यशस्वीपणे शिकवले. स्त्रियांसाठी /वृद्धांसाठी जागा देणे हा शिष्टचार दिल्लीकराला आत्मसाद करणे भाग पाडले या मेट्रोने.
Public Transport मध्ये आत कसं वांगायचं हे मुंबईकर बाहेर शिकतो आणि बाहेर कसं वागायचं हे दिल्लीकर आत शिकतो!
क्रेडिट गोज टू धोनी !
जळगाव सारख्या भारताच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या नकाशावर जास्त महत्त्वाचे स्थान नसलेल्या शहरातून एका तनय मलारा नामक 14 वर्षाच्या मुलाला StarPlus Dance Plus 2 चा विजयी किताब मिळाला. 10 पैकी 9 प्रेक्षकांना नावामुळे जळगाव खेडे वाटले असावे. कित्येकांनी तर google सर्च पण केला असेल. या यशाचे श्रेय जाते ते महेंद्र सिंग धोनीला !
धोनीदेखील रांची सारख्या प्रत्येकचक्षेत्रात न नावाजलेल्या शहराचा. साधारण कुटुंबातला. असा सर्व साधारण धोनी जर ध्यासाने यश संपादन करू शकतो तर मी का नाही? असा विश्वास या गड्याने नकळत सर्वाना दिला. या अगोदरही अनेक उदाहणे होती, पहिला करोडपती, पहिला Indian Idol पण साधारण शहरातून येणारा आणि इतिहास घडवणारा धोनी पहिलाच . खेळपट्टीवर साम्राज्य करण्यासाठी मुंबई, दिल्ली ची कुबडे आवश्यक नाही हे यानेच शिकवले. तनयच्या पालकांनी देखील धोनीकडून स्फूर्ती मिळवली असेल तर नवल वाटू नये. आज तनय, दीपा या सारखी तथाकथित दुर्लक्षिलेल्या भागातली मुले निव्वळ त्यांच्या ध्यासामुळे प्रयत्नामुळे चमकत आहेत त्यामागे या लांब केसावाल्याच्या हेलिकॉप्टर शॉटचा मोठा हातमाग आहे.
सावळ्या
सावळ्या ,
ह्या वर्षीदेखील तुझ्या भेटीचा योग हुकला. तसे मी काही याकरीता नियोजन वैगेरे केले होते अशातला भाग नाही. तुझ्याशी खोटं बोलून काय करणार ? पण दररोजच्या "घर ते ऑफीस व परत" अशा वारी करणाऱ्या मला तुझ्या वारीसाठी वेळ मिळेल तर शपथ ! महानगराचा शाप आणखी काय? पण तुझे रूप मात्र मनापासून दूर नसते. तू या ना त्या रूपात तुझी आठवण मनात सदैव ताजी ठेवतो. कसं जमतं रे पंढरीनाथा तुला?
पोटोबावर लक्ष देता देता आम्ही विठोबालाच विसरतोय का काय अशी भीती वाटताच तुझ्या नामघोषांत टाळाचा गजर कानांवर पडतो आणि मनाला पंढरीची आस लागते. पण हल्ली हा गजर mobile ringtone च्या स्वरूपात असतो. आज असाच एका मित्राच्या WhatsApp profile वर तुझा फोटो पाहिला. तुझी महिमा अगाध आहे देवा. भक्त आपल्यापासून दूर गेला तर आपणच त्याच्याजवळ जायचं. कसारे भोळा तू? आणि आम्ही अप्पलपोटे काही हवं असेल तेव्हाच तुझी धाव घेतो. वारीला आलो नाही म्हणून तूच माझ्या लेखणीतून स्वतःला चितारत आहेस नं ?
Social media वरची माझी ही post जर कुणी वारीत वाचली, किंवा या post ची आठवण करत जर कुणी तुझ्या चरणी माथा टेकला, नाहीच काही झालं तर ही post वाचली आहे तो mobile तुझ्या गाभाऱ्यात पोचला तर ज्याप्रमाणे कित्येक वारकऱ्याना तुकोबाचे बोल ओठी आणि पंढरीचा कळस नजरी असताना जे समाधान आणि पुण्य लाभते तेच पुण्य का नव्हे पण समाधान तरी मला लाभो अशी प्रार्थना तुझिया चरणी करतो!
-वाट चुकलेल्या तुझ्या अनेक वारकऱ्यापैकी एक
सोहळा प्रेमाचा
"हम लबों से कह ना पाये , उनसे हाले-ए-दिल कभी,
और वो समझे नहिं, ये खामोशी क्या चीज है"
नुकतेच निदा फाझली यांचे निधन झाले आणि ज्या लेखणीने कित्येक सुप्त मना मनात प्रेमाचा परागकण पुन्हा एकदा रसभरा केला होता ती कोमळली. प्रेमाला एक सातत्य मुल्य आहे. पिढ्यान पिढ्या नी युगे युगेच काय तर species to species याची व्याख्या समान नसली तरी स्वभाव धर्म म्हणून प्रेमाने आपली स्थिती उत्तरेच्या ध्रुव सारखी अढळ ठेवली आहे. मग या प्रेमाला साजरे करायला आपल्याला दिवस शोधावा लागतो? बर शोधला तर शोधला सगळ्यांचं या बाबत एक मत पण नाही की अमुक केल्यानेच तो साजरा होतो तमुक केल्याने अधिक भव्य होतो असे लिखित नियम पण नाहीत. गेल्या रविवारी आम्ही आमच्या engagement ची ६ वर्षे पूर्ण केलीत (तसा दिवस मी विसरलो होतो कारण प्रेमाला साजरे करायला दिवसाचे बंधन नसावे हे मी आधीच कबूल केलेय तरी) बायकोला ६ वर्षाची ६ रंगाची गुलाबाची फुले द्यावी म्हणून एक गुच्छ बनवून घेतला. तर तो जाम महाग! मी म्हटलं का रे बुवा? तर फुलवाला म्हणतो;"सर आज rose day है आज से सब गुलाब 14th feb तक महेंगे मिलेंगे." म्हटलं घ्या सोहळ्याला पण व्यावसायिकतेचा शाप लागला. मला गेल्या आठवड्यात काही coupons मिळाली जे वापरून मी online खरेदीत discount वैगेरे मिळवू शकत होतो. ओळखीची नसली तरी मी त्या website ला भेट दिली तर पाहतो तर काय सगळी कडे लाल बदाम आणि प्रेमाच्या सोहळ्यात खरेदीला उत यावा म्हणून इथे discount वर discount दिला जात होता . कशा वर तर महागडे किचेन्स भले मोठे कार्ड्स ढेरी वाले teddy या सर्वांवर.
कोणत्याही सणासुदीच्या वेळी बाजारात गर्दी व्हावी आणि खूप उलाढाल व्हावी हे साहजिक आहे. पण ज्या सोहळ्याला काही नियम नाही ज्याला त्याची गरजाही नाही तिथे अनेक Iinnovative गोष्टींना वाव मिळतो. अलीकडे वाचण्यात आले की म्हणे 14th feb साठी कुण्या महागड्या company ने (नावही लक्षात नाही ) limited editon अंगठ्या घड्याळ वैगेरे goodies काढले आहेत आणि early bird discounts पण आहेत. माणूस खरच creative प्रजातीमध्ये मोडतो . कुठेही स्वार्थ शोधतो आणि तो साधतोही प्रेम म्हणजे किती निस्सीम भावना आणि तिला साजरी करायला बाजारी करणाची साथ नाही सोडवली गेली त्याच्याने. साजरा करण्यासाठी निरनिराळ्या मध्यामाना बळी पडून दर वर्षी कित्येक निष्पापांचे खिसे कापले जातात.
आपल्या जवळच्या व्यक्तीला साथीची उब द्यावी यातून प्रेम दिसते, महागड्या गाडीतून नाही तर सोबत पायी फेरफटका मारताना गप्पांना उत यावा यातून प्रेम दिसते, गिफ्ट ऐवजी surprise म्हणून एखादं चित्र चितारावं यात प्रेम दिसत, अचानक काहीतरी त्याच्या वा तिच्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालावा त्यात प्रेम दिसत, नाहीच झाला काही तर अगदी सहज मला तू आवडतेस वा आवडतो असं म्हणून / लिहून/ message करून सांगाव यात प्रेम दिसत. आणि हे सार करायला मुहूर्त लागतो असं नाही. प्रेमाचा सोहळा प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी मानावावा त्याला ठराविक दिवसाची वाट पाहू नये.
Subscribe to:
Comments (Atom)
Latest Post
Pluribus हमारे राम
गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...


