"हम लबों से कह ना पाये , उनसे हाले-ए-दिल कभी,
और वो समझे नहिं, ये खामोशी क्या चीज है"
नुकतेच निदा फाझली यांचे निधन झाले आणि ज्या लेखणीने कित्येक सुप्त मना मनात प्रेमाचा परागकण पुन्हा एकदा रसभरा केला होता ती कोमळली. प्रेमाला एक सातत्य मुल्य आहे. पिढ्यान पिढ्या नी युगे युगेच काय तर species to species याची व्याख्या समान नसली तरी स्वभाव धर्म म्हणून प्रेमाने आपली स्थिती उत्तरेच्या ध्रुव सारखी अढळ ठेवली आहे. मग या प्रेमाला साजरे करायला आपल्याला दिवस शोधावा लागतो? बर शोधला तर शोधला सगळ्यांचं या बाबत एक मत पण नाही की अमुक केल्यानेच तो साजरा होतो तमुक केल्याने अधिक भव्य होतो असे लिखित नियम पण नाहीत. गेल्या रविवारी आम्ही आमच्या engagement ची ६ वर्षे पूर्ण केलीत (तसा दिवस मी विसरलो होतो कारण प्रेमाला साजरे करायला दिवसाचे बंधन नसावे हे मी आधीच कबूल केलेय तरी) बायकोला ६ वर्षाची ६ रंगाची गुलाबाची फुले द्यावी म्हणून एक गुच्छ बनवून घेतला. तर तो जाम महाग! मी म्हटलं का रे बुवा? तर फुलवाला म्हणतो;"सर आज rose day है आज से सब गुलाब 14th feb तक महेंगे मिलेंगे." म्हटलं घ्या सोहळ्याला पण व्यावसायिकतेचा शाप लागला. मला गेल्या आठवड्यात काही coupons मिळाली जे वापरून मी online खरेदीत discount वैगेरे मिळवू शकत होतो. ओळखीची नसली तरी मी त्या website ला भेट दिली तर पाहतो तर काय सगळी कडे लाल बदाम आणि प्रेमाच्या सोहळ्यात खरेदीला उत यावा म्हणून इथे discount वर discount दिला जात होता . कशा वर तर महागडे किचेन्स भले मोठे कार्ड्स ढेरी वाले teddy या सर्वांवर.
कोणत्याही सणासुदीच्या वेळी बाजारात गर्दी व्हावी आणि खूप उलाढाल व्हावी हे साहजिक आहे. पण ज्या सोहळ्याला काही नियम नाही ज्याला त्याची गरजाही नाही तिथे अनेक Iinnovative गोष्टींना वाव मिळतो. अलीकडे वाचण्यात आले की म्हणे 14th feb साठी कुण्या महागड्या company ने (नावही लक्षात नाही ) limited editon अंगठ्या घड्याळ वैगेरे goodies काढले आहेत आणि early bird discounts पण आहेत. माणूस खरच creative प्रजातीमध्ये मोडतो . कुठेही स्वार्थ शोधतो आणि तो साधतोही प्रेम म्हणजे किती निस्सीम भावना आणि तिला साजरी करायला बाजारी करणाची साथ नाही सोडवली गेली त्याच्याने. साजरा करण्यासाठी निरनिराळ्या मध्यामाना बळी पडून दर वर्षी कित्येक निष्पापांचे खिसे कापले जातात.
आपल्या जवळच्या व्यक्तीला साथीची उब द्यावी यातून प्रेम दिसते, महागड्या गाडीतून नाही तर सोबत पायी फेरफटका मारताना गप्पांना उत यावा यातून प्रेम दिसते, गिफ्ट ऐवजी surprise म्हणून एखादं चित्र चितारावं यात प्रेम दिसत, अचानक काहीतरी त्याच्या वा तिच्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालावा त्यात प्रेम दिसत, नाहीच झाला काही तर अगदी सहज मला तू आवडतेस वा आवडतो असं म्हणून / लिहून/ message करून सांगाव यात प्रेम दिसत. आणि हे सार करायला मुहूर्त लागतो असं नाही. प्रेमाचा सोहळा प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी मानावावा त्याला ठराविक दिवसाची वाट पाहू नये.