जळगाव सारख्या भारताच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या नकाशावर जास्त महत्त्वाचे स्थान नसलेल्या शहरातून एका तनय मलारा नामक 14 वर्षाच्या मुलाला StarPlus Dance Plus 2 चा विजयी किताब मिळाला. 10 पैकी 9 प्रेक्षकांना नावामुळे जळगाव खेडे वाटले असावे. कित्येकांनी तर google सर्च पण केला असेल. या यशाचे श्रेय जाते ते महेंद्र सिंग धोनीला !
धोनीदेखील रांची सारख्या प्रत्येकचक्षेत्रात न नावाजलेल्या शहराचा. साधारण कुटुंबातला. असा सर्व साधारण धोनी जर ध्यासाने यश संपादन करू शकतो तर मी का नाही? असा विश्वास या गड्याने नकळत सर्वाना दिला. या अगोदरही अनेक उदाहणे होती, पहिला करोडपती, पहिला Indian Idol पण साधारण शहरातून येणारा आणि इतिहास घडवणारा धोनी पहिलाच . खेळपट्टीवर साम्राज्य करण्यासाठी मुंबई, दिल्ली ची कुबडे आवश्यक नाही हे यानेच शिकवले. तनयच्या पालकांनी देखील धोनीकडून स्फूर्ती मिळवली असेल तर नवल वाटू नये. आज तनय, दीपा या सारखी तथाकथित दुर्लक्षिलेल्या भागातली मुले निव्वळ त्यांच्या ध्यासामुळे प्रयत्नामुळे चमकत आहेत त्यामागे या लांब केसावाल्याच्या हेलिकॉप्टर शॉटचा मोठा हातमाग आहे.