ती आणि तो

लग्नानंतर तिची पहिलीच दिवाळी होती आठ दिवस माहेरी राहून ती नुकतीच परतलेली . चार भावांनी दिलेली भाऊबीज दररोज न चूकता  सर्वांच्या नजरेला चुकवून टी मोजत असे. ह्या स्वतःच्या हक्काच्या पैशाचं  काय काय याचे स्वप्न  रंगवण्यात घालवला वेळ दिवसाचा सारा शीण घालावी. आजही सायंकाळचा स्वयंपाक उरकल्यावर ती  आपल्या खोलीत ५००/१०००च्या नोटा मोजत होती. दैवाला मात्र हे तिचं सुख पाहावलं नाही. दिवाणखान्यात सुरु असलेला TV काही औरच सांगत होता .  

-------------*------------

तो खूप भ्रष्ट contractor आहे हे  सगळ्या जगाला ठावुक आहे पण त्याला याच्याशी काही  घेणेदेणे नाही निदान आज तरी नाही  त्याचे लक्ष त्याच्या खीशात आणलेल्या 1000 च्या नोटा कड़े होत त्याने स्वतः ला दर महीन्याला एक लाख अस टारगेट दिल होत. आणि पहील्याच महीन्यात हा घात झाला असो सध्या त्याची चिंता वेगळी होती आणि तीच्या समाधानापर्यंत पोहोचन्यासाठी ११ व्यक्ति त्याच्या पुढे उभ्या होत्या अखेर तासाभराने का होईना त्याचा नंबर आला. सर्वात लांब पल्ल्याची गाडी त्याने आधीच पाहून ठेवली होती. १st class ची सहा  रिटर्न तिकिटे काढून तो  आपल्या काळ्या पैशाला white करण्यात तो यशस्वी झाला. परत  जाताना मात्र आता पुढे काय त्याला उमजत नव्हतं . 

-------------*------------

divorce नंतर आपल्या मुलीला दिलेल्या वचनाप्रमाणे जगातली सातही आश्चर्ये दाखवावी हेच तीच ध्येय होतं . पैशाची कशीबशी जमवाजमव करून प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ती तिच्या मुलीला आग्र्याचा ताजमहाल दाखवायला आली होती. त्यांनी हॉटेलमधून checkout केलं. दिवसभर ताजमहाल पाहायचा आणि भल्यापहाटे परतीची flight दिल्लीहून गाठायची हा प्लॅन होता. तिचे पैसे पण संपले होते. नेमके मोजके तेवढे अखेच्या पल्ल्यासाठी काढून ठेवले होते. Indian Currency  च्या ५०० च्या नोटा तेवढ्या आता शिल्लक होत्या . आणि ताजमहाल ला पोहोचताच ह्या नोटा आता कामाच्या नाही  असं कळलं. परदेशी असल्याने ती कमालीच्या कोंडीत सापडली. 

-------------*------------

त्याला ऑफिसमध्ये कुणी विचारात नसे. जी चौकशी व्हायची ती फोनवरच आणि केवळ आपल्या बिलाचे काही पैसे आले आहेत का हे जाणून घ्यायला. Cash section मधे कोण आहे त्याचे नाव काय वरच्या मजल्यावर बसलेल्या दिगज्जांना जाणून घ्यायची कधी गरज नाही वाटली. आज अचानक सकाळी सकाळी  boss  चा कॉल आला आणि बोलावून घेतले. मग दुसऱ्या  सिनिअर चा कॉल , मग तिसरा ...सगळ्यांना आज कॅश खपवायला मदत हवी होती . त्यानेपण मग ठाम नकार द्यायला सुरुवात केली. अचानक boss  चा boss  झाल्याची भावना त्याच्यापण मनात डोकावली . 

-------------*------------

दिवसभर इकडची तिकडची काम करून ती पैसे कमावत असे. शिकायला मुंबई;ला पाठवलेल्या मुलीशी बोलण्यासाठी मॅडम कडून मिळालेला मोबाइलला अजून निष्क्रिय होता. काय तर म्हणे recharge करायचा होता. म्हणजे नक्की काय ते पण माहिती  नसताना आपल्याला मिळालेल्या उधारीचची १०००ची नोट घेऊन ती दुकानात पोहोचली. दुकानदाराने विचारला कितीचं recharge करायचं ? तिने  १०० सांगितले आणि विचारलं की इतक्यात मुलीशी मुंबईला बोलता येईल न? दुकान दराने सर्वांसमोर हस उडवलं. १००च्या  ९ नोटा परत करत म्हणाला, "ये पुढच्या महिन्यात यातलीच  नोट  घेऊन परत". दुकानदाराच्या उद्धटपणा तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही  कारण  तिच्या मनात मुलीशी बोलायची उत्सुकता होती. दुकानदाराचेपण त्याच्या  whatsapp कडे कुठे लक्ष होते. तो १०० ची नोट  प्रेमाने न्याहाळत होता. 

-------------*------------

तो म्हणे आधी चहा विकायचा . नक्कीच सुट्टे पैसे नसल्याने  कित्येकदा त्याने स्वतःच्या पदराला मुरड घातली असेल. अर्थतज्ञ त्या position वर जे नाही करू शकले हे त्याने करून दाखवले. पैशाला MODIfy करून काय काय होऊ शकतं  आणि किती दूर याचा परिणाम होतो हा नक्कीच interesting मुद्दा ठरतोय. 

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...