बाप्पा पहिला!




सदर लेख दि.३१ ऑगस्ट,२०१९ महाराष्ट्र टाइम्स पुणे शहर आवृत्तीत प्रकाशित झाला.


स्व: शी केलेला संवाद / In conversation with self!

स्व: शी केलेला संवाद / In conversation with self !


असं म्हणतात की लॉ ऑफ एव्हरेज सर्वांना लागू पडतो. पण हा नियम एका ठिकाणी फोल ठरतो. या नियमानुसार कोणतीही गोष्ट सातत्याने घडत नाही. या ना त्या कारणाने त्यात खंड पडतो. माझ्या मते या नियमाला डावलून जर एखादी गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात घडत असेल तर ती म्हणजे "स्वतःशी केलेला संवाद"! लहानपणी नवनवीन गोष्टींना अभ्यासूवृत्तीने पाहतांना, शब्दाचा आकार म्हणजे काय हे देखील माहिती नसताना असू देत नाहीतर मीटिंगमध्ये बॉस ने दिलेल्या नवीन टारगेट मुळे त्याला वाहिलेली सणसणीत शिव्यांची की लाखोलि असू देत स्वतःशी केलेल्या संवादाचा पट प्रचंड मोठा आहे.

एकदा माझ्या एका मित्राने मला विचारले 'असे कोणते वाक्य आहे जे तू स्वतःशी वारंवार बोलतोस?' मी बुचकळ्यात पडलो म्हटले हे असं कसं सांगू शकेन मी? तो म्हणाला, 'विचार कर घाई नाही. दोनेक दिवस स्वतःचे निरीक्षण कर'. मी केलेदेखील. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेलो आणि म्हटलो मला उत्तर सापडले. तो म्हणाला "काय करतोयस काय" हेच ना? मी अवाक झालो त्याला कसं कळलं? "क्या कर रहा है तू?"/ "व्हॉट आर यु डुइंग अमित?"/" हे काय करतोयस ?" असं एखादी (काय प्रत्येक)गोष्ट नीट करायच्या प्रयत्नात मी स्वतःशी बोलत असतो. माझ्या मित्राचे ही तेच.

आपण स्वतःशी सदैव संवाद  करत असतो. त्याला शब्द, वाक्य, त्यांची रचना, व्याकरण यांचा लगाम नसतो. कधी उद्गारवाचक, कधी प्रश्नार्थक, कधी भयवाचक अशा अनेक वाक्यांचा समावेश भावनांमुळे त्यांत होत असतो. या संवादाची सुरुवात नेमकी कोठे आणि कधी होते हे सांगता येणे कठीण. पण एक मात्र नक्की बाह्यवातावरण (external environment) कसे असो आतल्या आत अगदी प्रत्येकाचा हा स्वतःशी केलेला संवाद अगदी अखंड सुरू असतो. मुळात हे काहीतरी अंतर्गत आहे म्हणा किंवा अंतर्मनाशी संबंधित आहे असं मला वाटते.

मायर्स ब्रिक्स टाईप इंडिकेटर (MyersBriggs Type Indicator (MBTI) या एका व्यवस्थापकीय साधनांवर मानवी व्यक्तिमत्त्वाच्या सोळा स्वरूपाचा अभ्यास होतो. त्यानुसार प्रत्येक व्यक्ती यापैकी एका व्यक्तिमत्व स्वरूपाचे गुणधर्म जोपासतो. ते व्यक्तिमत्त्व कोणते व कसे हे तपासायला या इंडिकेटर्स ने प्रश्नावली दिली आहे. तिचे उत्तर प्रामाणिकपणे देऊन आपले व्यक्तिमत्व गुणधर्म ओळखण्यास मदत होते. या प्रश्नावलीला पाहिले तर मला जाणवले त्याच्या कर्त्यांनी आपण स्वतःशीच संवाद साधतो यालाच मूलभूत आधारस्तंभ मानले आहे. मी पण स्वतःला एक बहिर्मुख व्यक्तिमत्व (?) समजतो पण अलीकडे इतरांशी करण्यापेक्षा स्वतःची अधिक संवाद सुरू होता. म्हणजे निदान मला तरी तसे वाटत होते आणि म्हणूनच कदाचित हा लेख लिहावासा वाटला. या तथाकथित वाढीव संवादाचे कारण अर्थातच बाह्य जगाशी संबंधित आणि स्वनियंत्रणापलीकडचे होते. पण आधी सांगितल्याप्रमाणे जर स्वतःशी संवाद हा बाह्यवातावरण कसेही असो होतच असतो तर त्याच्या प्रमाणात बदल होण्याचे काहीच कारण नाही.

उत्तर सापडायला फार वेळ लागला नाही. जेव्हा आपण आपल्या आपल्या संवादाला वाट मोकळी करून देत बाह्य जगाशी संपर्क साधतो (बहुतांश कृतीने) तेव्हा स्वतःशी केलेला संवाद पूर्ण होते. म्हणजे काय तर रस्त्यावर एखादा अपघात पाहिला तर प्रत्येक जण मनाशी वेगवेगळी प्रतिक्रिया देतो. कुणी "अरेरे!" म्हणतो, कुणी देवाची प्रार्थना करतो, कुणी सेल्फी काढतो, तर कोणी त्या अपघाताची वेदना सहन करतो. "अरेरे" म्हणणारा तिथून निघून जातो, प्रार्थना करणारा मंदिरात जातो, सेल्फी वाला मोबाइल वर forward करण्यात वेळ घालवतो  तर वेदना सहन करणारा अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतो. मनाच्या संवादाला पूर्णविराम देण्याचे प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे मार्ग असतात.

आर्मी मध्ये अधिकारी म्हणून भरती होताना केवळ शारीरिक सामर्थ्य न तपासता त्या चाचणीच्या शेवटी एक चित्र दाखवून चाचणी घेण्यात येते. यात एक समान चित्र सर्वांना दाखवण्यात येते आणि त्यावर लिहायला सांगितले जाते. प्रत्येकाच्या लिखाणातून तो स्वतःची काय संवाद साधतो याचे आकलन करण्यात येते. मुख्य म्हणजे शारीरिक चाचणी पेक्षा या सायकॉमेत्रीक चाचणीला निवडीसाठी अधिक प्राधान्य दिले जाते.

संवादातून योग्य कृती निवडायची असेल तर काय करावे हा प्रश्न आपसूकच अंतर्मनाला भेडसावतो. माझ्या मते मूलभूत गोष्टींचा विसर न पडू देणे याचे भान असेल तर प्रश्न आतले (तसेच बाहेरचे) आपोआप सुटतील. मूलभूत गोष्टी म्हणजे स्वतःशी केलेले मूलभूत प्रश्न. काय चांगले काय वाईट याचे भान तेथूनच येते आणि कृतीमध्ये त्याचे प्रकटीकरण होते.

या सर्व जंजाळा पलीकडे एक व्यक्तीमत्व प्रकार आहे, ज्यांना आपल्या स्व संवादावर नियंत्रण ठेवता येते. आणि अशा अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे करतो त्याला मेडिटेशन म्हणतात. हे करण्याचे योग, व्यायाम, असे अनेक मार्ग आहेत. आणि इथे देखील यामुळेच लॉ ऑफ एव्हरेज  नापास होत नाही. 
______________________________________________________

In Conversation with self!


It is believed that the Law of Averages is pervasive. However, there exists one place where this law is inapplicable. According to this law, nothing happens consistently, everything is interrupted due to one reason or another. I feel if one thing that evades this law, it is conversation with self! From a little child curiously looking at toys with no knowledge of words to an irritated employee cursing his boss for new targets during the meeting, the conversation with self happens all along. The span is vast.

One of my friends once asked me, "Which is that one sentence which you speak to yourself most often?" I was bowled, 'how do I know?', I said. He said, take a day or two, observe yourself and come back. I followed and next day went o him. Before I could reveal myself, he said, "what are you doing?  - Isn't it?" I was further shocked, how did he know. "क्या कर रहा है तू " / "What are you doing,Amit?" I say to myself almost all the time trying to do things in proper manner. Surprisingly, same was the case with him. 

We every moment indulge in conversation with self. This conversation does not have restriction of language, words, sentence, their arrangement as per grammar etc. Sometimes exclamation, sometimes questions, few  imperative all sorts of sentences/words are used in conversation with self. This is accompanied by the emotions that they carry. It is difficult to ascertain since when one has this conversation and how it starts within oneself is also equally inapprehensible. However, one thing is for sure, irrespective of external environment and capacity, internally these talks with self continue relentlessly.  This is probably because, this phenomenon is to do with internality and not externality.

One management tool Myers-Briggs Type indicator (MBTI) studies 16 types of human personalities. According to it, every individual identifies oneself with one of these. To identify which personality type one falls in, this technique uses method of questionnaire. One has to answer honestly to get best of the results. It is simple to deduce that the questionnaire relies on the fundamental of the conversation with self concept. I consider myself as an extrovert (?) , yet these days I am more in conversation with self than with others. (at least am feeling so) and that precisely the reason probably that I decided to pen this down.  The reason for this increased quantum has been obviously external factors beyond my control. Thoughtfully though, as discussed earlier if the conversation with self is independent of external environment, hence quantum should also be immune of this.

The answer was not far away. When we try to get connected to external world through our acts, the conversation gets completed. What does this mean? Let's take an example of a road accident. One says "Ohh!", another prays, another takes selfie and someone feels the same pain. The one saying "Ohh!" runs away, the praying soul finds way to temple, the selfie guy forwards the accident scene and the one sharing the pains goes and helps the victims. The different way everyone chooses to put full stop to the conversation with self.

While selecting an officer, Army does not only check the physical fitness. The candidates have to appear psychometric test wherein they are shown a picture and asked to describe it. What every candidate describes indicates what conversation he has with self. Amazingly, this test is given more weightage than the physical one.

What action should this conversation lead to is a natural question that come to a sensitive mind. According to me, one should never forget fundamentals. Fundamentals can be identified by asking basic questions to self. This should show an answer to all questions (internal and external). The realisations of good and bad also comes from the same source which then takes manifestation in actions.

Beyond all this lies one personality type who can control this conversation with self more like on/off switch. To reach to such a state, what we do is called as meditation. There are many ways to do it, Yoga, exercise to name a few. And well, here too law of average doesn't fail it seems!

'हे असंही असतं?'

हे असंही असतं?'

  केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा नुकतीच पार पडली. देशाच्या कानाकोपºयाातून  अनेक उमेदवारांनी मुख्य परीक्षेच्या तयारी साठी अथवा पुढल्या वर्षीच्या परीक्षेसाठी दिल्लीकडे कूच केली.  यूपीएससीची पंढरी मानल्या जाणाºया दिल्लीते असे अनेक डेरे आहेत जेथे हे उमेदवार वास्तव्य करण्यात धन्यता मानतात. या ठराविक परिसरांत यूपीएससीे अनेक क्लासेस चालतात. अशाच राजेंद्र नगरात परवा जाण्याचा योग आला. महाराष्ट्रातल्या एका नातेवाईकास घेऊन मी तेथे गेलो.    हा नातेवाईक बायकोचा भाऊ असल्याने मी अधिक जिज्ञासूवृत्तीने त्याच्यासाठी विचारपूस करू लागलो. 

पंधरा वर्षांपूर्वी मी देखील असाच दिल्लीत धडकलो होतो. आज राजेंद्र नगर वेगळेच वाटत होते. जेथे पाहतो तेथे क्लासेसच्या जाहिरातीच जाहिराती. ( असं म्हणण्याची पद्धत खास दिल्लीचीच) गल्ली बोळाचा आणि प्रत्येक स्केअर फूट जागेचा सुयोग्य उपयोग येथे केलेला आढळतो. जाहिरातींचे नानाविध प्रकार सापडतात. भिंतीवरील, फलकावरील, इमारतीच्या माळ्यावरून लटकलेली सुरकुत्या पडलेले पोस्टर, पॉम्फलेट वरील रंगबेरिंगी, यशस्वी उमेदवारांचे नीटनेटके फोटो असलेल्या अनेक जाहिराती.  यात एलईडीवरील जाहिरात लक्ष वेधते. सहजच मनात आले, कागदावरच्या जाहिरातींचा प्रवास आता प्रगल्भ झाला आहे. सनदी सेवेकडे कल असलेला कोणीही इथे आला तर तो तावडीतून निसटता नये- याची खबरदारी चहावाल्यापासून मोठ्या दुकानापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण घेत असतो. असाच अनुभव आला. 
आम्ही एका चहा वाल्याकडे गेलो. पंधरा वर्षांपूवीचा ५ रुपये स्पेशल आता १० रुपये 'चालू' चहा झाला होता. त्याला सहजच विचारले कि अमूक-तमूक विषयासाठी असणारा क्लास कुठे आहे? त्याने केवळ पत्ताच नाही सांगितला तर त्यासाठी नोट्स कुठे मिळतील, कुठे राहावे, असे सगळे ताळेबंदच सांगायला सुरुवात केली. आम्ही लगेच पळ काढला.
राजेंद्र नगर आणि तत्सम परिसराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी छायाचित्रणाची (फोटोकॉपी) दुकाने. मला वाटते फोटोकॉपीपेक्षा अधिक संक्रमण कोणत्याही नवीन संकल्पनेने शिक्षणक्षेत्रात केले नसावे. इथे त्याचा जास्तच प्रसार आहे. राजेंद्र नगरात एखाद्या मध्यम आकाराच्या पुस्तकांच्या दुकानाला लाजवेल अशी मोठ्ठाली फोटोकॉपीची दुकाने आहेत. विदेशी न परवडणाºया पुस्तकापासून क्लासेसच्या लिखित नोटसपर्यंत  सर्व काही येथे मिळते. एखादे मासिक खर्चिक वाटले तर या 'छापखान्या'त हवे त्या मासिकातल्या हव्या त्या लेखांची छायाचित्रित प्रत उपलब्ध होऊ शकते. हे म्हणजे अचाटच! आमचा मोर्चा मग क्लास कडे वळला. 
एका प्रसिध्द क्लासचे आॅफिस गाठले. पाहतो तर काय तिथे तोबा गर्दी! मोठ्ठी रांग! विचारल्यावर कळले की नवीन बॅचसाठी टोकन मिळत आहेत. बँंकेनंतर टोकनचा (आणि ते घेऊनही रांगेचाही) होणारा इतका कार्यक्षम वापर इथलाच. क्लासेसची फी चौपट वाढलेली. लाख दीड लाखांमध्ये क्लासवाले एक बॅच दहा महिन्यात उरकावातात. आणि एका वर्गात पाचशे विद्यार्थी ! 'हे असंही असतं?', माझ्या शालकाला भोवळच आली. सनदी सेवेत प्रवेशुच्छुकांचा जणू हा विकतचा कारखानाच वाटावा!



अशा कोण्या एका कारखान्यात प्रवेश मिळाला की मग उमेदवारासाठी पुढचे आव्हान म्हणजे राहण्याच्या जागेचे! ये-जा करण्याचा वेळ वाचावा, अभ्यासाचे वातावरण मिळावे म्हणून इथे हे राहतात. पण काय किंमत मोजावी लागते? इथे बºयाचदा खोलीनुसार नाही तर बेड नुसार पैसे आकारले जातात आणि ते देखील अव्वाच्या सव्वा! स्केअर फूटचा विचार केला तर याची तुलना नरीमन पॉईन्टशी व्हावी. बरं, इतके असूनही खोलीत सोयींच्या नावाने शंख! खेळती हवा आणि सूर्यप्रकाश दुर्मिळ. इतर सोयी विचारायलाच नकोत. बिनचूक निरीक्षण केल्यावर कळले की घर भाड्याने देणे हेच मुख्य उपजिवीकेचे साधन झाले आहे.  त्या अनुषंगाने, येथील अर्थकारण विनाकारण महागडे झाले आहे.  त्याची झळ कित्येक होतकरु विद्यार्थ्यांना बसते आहे याची जाणीव नाही त्यांना.   तरी उमेदवारांची उमेद काही कमी होत नाही. आधीही उमेद होतीच पुढेही राहिल.

'आउटलायर्स' या पुस्तकात '१०,००० अवर रूल'   सांगितला आहे, त्यानुसार प्रत्येक कामात यशस्वी होण्यास १०००० तास देणे , मेहनत करणे गरजेचे असते. राजेंद्र नगर मध्ये आले आणि इथल्या परीक्षार्थींकडे पहिले कि कळते त्याना हे दहा हजार तास वर्षभरातच पूर्ण करण्याची घाई असते . त्यासाठी ते काहीही किंमत मोजायला मागे पुढे पाहत नाहीत.  आणि गम्मत म्हणजे पूर्व परीक्षेच्या अधिसूचने पासून मुलाखती पर्यंत साधारण १४ महिने लोटतात- म्हणजे १०००० तास!
-अमित भोळे 
(लेखक केंद्र शासनात सनदी अधिकारी आहेत)

आरा..रा..रा...

          "आरा..रा..रा..." फेम प्रवीण तरडे ने ज्या "पुरुषार्थ" साठी पुरुषोत्तम जिंकला होता तो प्रयोग पाहिला होता. चमक्दर नवीन कथानक, दमदार एक्टिंग आणि संवाद याच्या जोरावर तो प्रयोग खूप रंगला. आज मात्र मी या प्रयोगाला गेलो त्याचे कथानक सर्वज्ञात होते पण सादरीकरण एक्टिंग आणि उर्दू संवादाने मन जिंकले. 

        'मुघल-ए-आझम' त्याच्या चौदाव्या सीजनमध्ये राजधानीत दाखल झाला. तथाकथित निश ऑडियन्सला लुभवत त्याच्या नेमक्या जाहिरातींनी माझ्यासारख्या कित्येकांना गुगलकडे धाव घेण्यास प्रवृत्त केले असणार यात शंका नाही. नेटवरचे वाचन आणि प्रत्यक्ष अनुभव यात मात्र जमीन-अस्मानाचा फरक! ज.ला.ने.स्टे. च्या ऑडिटोरियममध्ये पोहोचताच प्रेक्षक क्लास वेगळा आहे हे जाणवले. माझ्यासारखे मोजके रसिक वगळता उच्चमध्यमवर्गीय पन्नाशीतली किंवा अगदी जरजर झालेले अगदि व्हीलचेअरवर आलेले अतीव रसिक यांनी प्रशस्त हॉल हाउसफुल केला होता. 
        
नाटकातील उर्दू लहजा अगदी अशर्स च्या अभिवादना पासून जाणवत होता. "आदब" ने प्रेक्षकांचे स्वागत मी तरी पहिल्यांदा अनुभवत होतो. प्रयोग सुरू होण्याआधी एक प्रोजेक्टर स्टेजवरच्या पडद्यावर महालाचे चित्र दाखवत होता, मला एक शंका आली  त्याबद्दल नंतर सविस्तर.

         प्रयोग सुरू होण्याअगोदर नेहमी करतो तसे आकाशवाणी सदृश आवाजाने मोबाईल वीमानी मोडवर टाकण्याचे आवाहन केले. त्याने दिलेले कारण मात्र याखेपेला वेगळे होते एक तर म्हणे येथे प्रेक्षकांचा रसभंग होऊ नये आणि दुसरे असे की सर्व कलाकार लाईव्ह सिंगिंग करतात त्यामुळे फोनच्या फ्रिक्वेन्सी ने डिस्टर्बन्स निर्माण होतो. त्या आवाजाने असे देखील सांगितले की हा परफॉर्मन्स आय पी आर च्या कायद्यांतर्गत संरक्षित आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे चित्रण किंवा छायाचित्रण त्याला मज्जाव आहे. काही वर्षांपूर्वी एनएसडीमध्ये बघितल्याप्रमाणे या प्रयोगासाठी देखील इंग्लिश ट्रान्सलेशन ची (सबटायटल हा शब्दप्रयोग नाटककर्त्यानी टाळला) व्यवस्था पण स्टेज शेजारच्या भिंतीवर करण्यात आली होती.
          प्रयोगाला सुरुवात होते आणि सुरू होतो - एक युनिक दृकश्राव्य अनुभव. इथे स्टेज केवळ सपाट प्रतल नसून त्याला पुढे (म्हणजे प्रेक्षकांकडे) आणि मागे (स्टेजच्या दुसऱ्या टोकाला) स्क्रीन्स बसवल्या आहेत. यांचा सुयोग्य वापर करत नजरेला चकवा देणाऱ्या प्रतिमा दिग्दर्शक- फ़िरोझ अब्बास खान याने वापरले आहेत. स्टेज वर अशा स्क्रीनचा वापर Zangoora मध्ये पाहता येतो. अकबर ची ओळख करून देत narrator टोन सेट करतो आणि प्रेक्षकांच्या अनुभव गाठीत काय मेजवानीची भर पडणार आहे याचा प्रत्यय येतो. टेक्नॉलॉजीचा वापर करत मुघल-ए-आझम ब्लॅक अँड व्हाईट चा कलर मूवी काही वर्षांपूर्वी करण्यात आला होता तसाच टेक्नॉलॉजीचा वापर या नाटकात पाहता येतो. स्टेजवर ब्लॅकआऊट आणि Screen speaking (ही मी शोधलेली संज्ञा) यांचा सजीव संमिश्र वापर फ़ीरोझने नेमका केला आहे. वरून येणारे राजमहलाचे स्तंभ, सरकता जिना, शीश महल मधली काचांची चकाकी यामुळे त्या त्या अंकात जीव ओतला जातो.
      "अक्ल अन्धी हो गई और इश्क नगमों की धून पर इश्क़ बेपनाह हो गया" यासारखे उर्दूमध्ये विणलेले शब्द कानाला सुमधुर आणि मनावर नेमक्या ठिकाणी ठसा पाडतात. एका अंकात अनारकली ने  म्हतलेले "काटो को मुरझाने का खोउफ़ नहि होता" हे वाक्य नाटकाच्या जुन्या असूनही सदाबहार कथानकासाठी म्हणलं आहे असं वाटतं. सर्वांना माहीत असलेली कहाणी सादर करण्यासाठी आणि यशस्वीरित्या प्रेक्षकांनी स्वीकारवी म्हणून दिग्दर्शक अब्बास खान यांनी खास मेहनत घेतली आहे. एका दृश्यात जोधा फर्मान करते की सलीमच्या मनावरती युद्धाची दृश्ये मिटावी म्हणून राज नर्तकी ने उत्कृष्ट नृत्य सादर करावे. दिग्दर्शकाने स्वतःलाच दिलेल्या challengeसाठी त्याला सलाम! त्यावर 14 कलाकारांनी सादर केलेले कथक म्हणजे splendid च! प्रेक्षकांना देखील ते नृत्य आपल्या  तालावर थिरकवते. तसेच बहार आणि अनारकली मधिल जुगलबंदी की तितकीच छान रंगलिये. या masterpiece मध्ये नृत्य, दिग्दर्शन, नेपथ्य यासोबतच प्रकाश योजनादेखील भन्नाट! एका दृश्यात स्क्रीनवर दाखवलेल्या राजवाड्याच्या भिंतीतील खिडकी मधुन येणारा चांद्प्रकाश जमिनीवर बिनचूकरित्या टिपला आहे. या सर्वांना साजेशी वेशभुशा मनिश मल्होत्राने खासच पेलली आहे.
         उत्कृष्ट नाटकाच्या सादरीकरणाला सांभाळेल अशा सर्व कलागुणांचा सुतोल समेळ मुघल-ए-आझम मध्ये पाहता येतो.  दोन तास तीस मिनिटांच्या या पर्वणीला माझा सलाम! खरंच याचे वर्णन प्रवीण म्हणतो तसं करता येईल- "आरा..रा..रा...खतरनाक!"

-अमित भोळे


Review: Gully Boy


Its absolutely not fair to compare a hot pot popping corns with a movie like Gully Boy. But Zoya Akhtar, the director compels me to do so. She evolves the storyline let alone characters in a way that is exciting to watch despite traditional predictable climax. The movie starts on the streets of dream city, Mumbai where countless dreams get birth and equally drained in the pot holes every second, reminding the Hollywood cult Taxi Driver.

Comparison is the curse of human kind. Be it with self-past or others. Zoya scores at all fronts. She has made the story evolve  through dialogues, cinematography and mentionably the songs. As she effectively used lines by Javed Akhtar in Zindagi Na Milegi Dobara, she here uses rap songs making comments on various aspects of life like Sanskrit verses. However, none of these prove to be hindrance during entire movie experience.

Any solid foundation of story line is a waste without same solid performances by actors. Here the Gully Boy Ranveer Singh is unbelievably superb.  He delivers perfection in each frame. Notably during two scenes where in one he gets in fight with his father and another when his father visits his place. Both intense times, he maintains high temper despite scenes warranting pitches poles apart. He is equally adorable when he is silent yet expressive during scenes with Safeena and Sky. This character Safeena is literally lived by Alia Bhatt on the other hand. The world of two lovers is aptly brought out without making it larger than life.

The success story of a slum boy in the film gets various dimensions depicting the real-life problems with various supporting characters played by Vijay Varma, Vijay Raaz and Amruta Subhash. The punchline आपना टाईम आयेगा hence seems possible for every viewer.

Simply put, the Gully Boy is much more than a pack of popcorn and needless to mention ‘a must watch’.
 ~ amit bhole

I for Eye!

 सध्या माझे भाषेवरील प्रयोगाचे दिवस सुरु आहेत. माझी लहानगी दोन वर्षांची आहे. ती सध्या नवनवीन शब्द, शब्दरचना या अनुषंगाने भाषा शिकते आहे. गमतीदार किस्स्यांसोबतच एक पालक म्हणून मला आणि माझ्या पत्नीसाठी एक learning experience आहे

            चोम्स्की, स्योसूर  सारख्या भाषातज्ञांचा माझा ओझरता परिचय असला तरी अनुभवाअंती असे म्हणता येऊ शकते की भाषा आत्मसात करणे हा दर वेळेस एक Unique  अनुभव असावा. रिद्धी (माझी लहानी) अनेकदा खूप मोठे मोठे वाक्य बडबडत असते. त्यात तिच्या शब्दकोषातले सर्व शब्द धडाधडा एकापाठोपाठ येतात. कशाचा कशाशी संबंध नसतो केवळ व्यक्त करण्याची उत्कट इच्छा असते. भाषा ही केवळ शब्द, व्याकरण यांच्या गुंफणीतील सूत्रबद्ध रचना नसून Emotions (भावना)  यामागे एक मोठा आधार असतो. "चला" या शब्दामागे कोणती भावना आहे हे त्याचे उच्चारातून कळते. रिद्धी ला "चला" म्हटलं  की कसं  कळतं  बाहेर फिरायला जायचयं आहे की अंघोळीला जायचंय? कुणी म्हटलंय की लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला जसा आकार द्याल तसा तो घडतो. त्यांच्या भाषाविष्काराचेही तसेच असते. काहीही कळणाऱ्या बाळाला काय समजणार कोणती भाषा मराठी? कोणती इंग्रजी? आम्हा नवरा-बायकोला पहिलं बाळ झालं तेव्हा कित्येकांनी सांगितले की हिच्याशी लहानपणापासून इंग्रजीत बोला म्हणजे तिचे इंग्रजी "चांगले" होईल पण माझा या वैचारिक अधिष्ठानाला विरोध आहे. आपण एक भाषा चांगली शिकली की दुसरी आपोआप येते. आपण मोठे झालो की कंटाळा करतो एवढचं .  लहानगे  त्यामुळेच  नवनवीन भाषा शिकू शकतात.  एका अभ्यासानुसार वयाच्या पहिल्या 48 महिन्यांपर्यंत आपण जे शब्द जसे शिकतो (किंवा ऐकतो) तेच आपल्या भाषाकोषामध्ये छापले जातात.  म्हणूनच कदाचित काहींमध्ये "" चा "" किंवा " " चा " " होणे, हे पाहता येते. 

माझी पत्नी एकदा काळजीने मला म्हणाली, "रिद्धी आंघोळीच्या वेळी टबातलं पाणी पिते".  तिची काळजी योग्य असली तरी त्याची कारणमीमांसा केली तर लक्षात आले मुलं शब्दाला वस्तुनिष्ठपणे शिकत असतात.  जसं "पाणी पी" म्हटलं की त्यांना कळतं पाणी पिण्यासाठी असते मग आंघोळीसाठी घेतो त्याला पण पाणीच म्हणतात हे त्यांना सांगणे अवघड!  तसंच झोपताना तिला आम्ही म्हणतो, "Eyes closed" आणि असंच कधी अगोदर Eyes म्हणजे डोळे हे तिला शिकवले होते नंतर अगदी शहाणपणा करीत आणि तिची भाषेसोबतची गंमत पाहता मी तिला वेगवेगळे शब्द शिकलो शिकवू लागलो.  घरात भारताचा नकाशा आहे त्याकडे बोट दाखवत म्हटलो, "India....I..N..D...I..A.. काय? I... " असं म्हणतो न म्हणतो तोच तिने डोळ्याला बोट लावलं आणि म्हणाली "Eye " तसंच एकदा मस्ती करताना ओरडलो "बचाव बचाव" तर तिने चक्क चावा घेतला कारण तिला 'चाव' म्हणजे काय हे माहित आहे.

भाषा आत्मसादीकरणाचे दोन पैलू लहान मुलांमध्ये पाहता येतात. एक म्हणजे आपण जे शिकवू ते तसंच्या तसं बोलण्याचा प्रयत्न करतात त्या त्या गोष्टींचा सांगितला तसा अर्थ लावत असतात. Apple ला एप्पल म्हणणे हा त्यातलाच प्रकार. आणि दुसरा म्हणजे आपसूकच मुले जे शिकतात ते. रिद्धी ला जेवताना एकदा म्हटले "खाली बैस मांडी मार" ती चटकन बसली आणि स्वतःच्या मांडीवर एक चापट मारली.  आम्ही नवरा-बायको थक्क झालो. 

लहान मुलांची जडणघडण अर्थात भाषेद्वारा होत असते. त्यांचा 'What 'पासून 'Why' पर्यंत चा प्रवास अत्यंत रोमांचकारी असतो. एक पालक म्हणून म्हणून मग आपला काय role असावा आपण केवळ अक्रिय (निष्क्रिय नव्हे ) बघे न राहता त्यांच्या प्रवासात त्यांचा नेव्हीगेटर म्हणून त्यांचे विमान त्यांनाच उडवू द्यावे. कारण कितीही झाले तरी पालकांच्या हालचाली , क्रिया त्या मातीच्या गोळ्याला प्रेरणादायी असतात आणि त्यांनी पाडलेले ठसे भाषेतून सहजासहजी मिटत नाहीत.  भाषा विकासाची वाट ही एक एका लहानग्या साठी थेट चढण नसून तो खाच-खळगे असणारा एक डोंगर आहे यावर कोणतीच एक ठराविक पाऊलवाट नाही ती लहानीला स्वतःच शोधायची आहे.  आपण निव्वळ हात धरू शकतो हे आम्हा नवरा-बायकोला नीट उमगले आहे. 
-अमित भोळे


Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...