आरा..रा..रा...

          "आरा..रा..रा..." फेम प्रवीण तरडे ने ज्या "पुरुषार्थ" साठी पुरुषोत्तम जिंकला होता तो प्रयोग पाहिला होता. चमक्दर नवीन कथानक, दमदार एक्टिंग आणि संवाद याच्या जोरावर तो प्रयोग खूप रंगला. आज मात्र मी या प्रयोगाला गेलो त्याचे कथानक सर्वज्ञात होते पण सादरीकरण एक्टिंग आणि उर्दू संवादाने मन जिंकले. 

        'मुघल-ए-आझम' त्याच्या चौदाव्या सीजनमध्ये राजधानीत दाखल झाला. तथाकथित निश ऑडियन्सला लुभवत त्याच्या नेमक्या जाहिरातींनी माझ्यासारख्या कित्येकांना गुगलकडे धाव घेण्यास प्रवृत्त केले असणार यात शंका नाही. नेटवरचे वाचन आणि प्रत्यक्ष अनुभव यात मात्र जमीन-अस्मानाचा फरक! ज.ला.ने.स्टे. च्या ऑडिटोरियममध्ये पोहोचताच प्रेक्षक क्लास वेगळा आहे हे जाणवले. माझ्यासारखे मोजके रसिक वगळता उच्चमध्यमवर्गीय पन्नाशीतली किंवा अगदी जरजर झालेले अगदि व्हीलचेअरवर आलेले अतीव रसिक यांनी प्रशस्त हॉल हाउसफुल केला होता. 
        
नाटकातील उर्दू लहजा अगदी अशर्स च्या अभिवादना पासून जाणवत होता. "आदब" ने प्रेक्षकांचे स्वागत मी तरी पहिल्यांदा अनुभवत होतो. प्रयोग सुरू होण्याआधी एक प्रोजेक्टर स्टेजवरच्या पडद्यावर महालाचे चित्र दाखवत होता, मला एक शंका आली  त्याबद्दल नंतर सविस्तर.

         प्रयोग सुरू होण्याअगोदर नेहमी करतो तसे आकाशवाणी सदृश आवाजाने मोबाईल वीमानी मोडवर टाकण्याचे आवाहन केले. त्याने दिलेले कारण मात्र याखेपेला वेगळे होते एक तर म्हणे येथे प्रेक्षकांचा रसभंग होऊ नये आणि दुसरे असे की सर्व कलाकार लाईव्ह सिंगिंग करतात त्यामुळे फोनच्या फ्रिक्वेन्सी ने डिस्टर्बन्स निर्माण होतो. त्या आवाजाने असे देखील सांगितले की हा परफॉर्मन्स आय पी आर च्या कायद्यांतर्गत संरक्षित आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे चित्रण किंवा छायाचित्रण त्याला मज्जाव आहे. काही वर्षांपूर्वी एनएसडीमध्ये बघितल्याप्रमाणे या प्रयोगासाठी देखील इंग्लिश ट्रान्सलेशन ची (सबटायटल हा शब्दप्रयोग नाटककर्त्यानी टाळला) व्यवस्था पण स्टेज शेजारच्या भिंतीवर करण्यात आली होती.
          प्रयोगाला सुरुवात होते आणि सुरू होतो - एक युनिक दृकश्राव्य अनुभव. इथे स्टेज केवळ सपाट प्रतल नसून त्याला पुढे (म्हणजे प्रेक्षकांकडे) आणि मागे (स्टेजच्या दुसऱ्या टोकाला) स्क्रीन्स बसवल्या आहेत. यांचा सुयोग्य वापर करत नजरेला चकवा देणाऱ्या प्रतिमा दिग्दर्शक- फ़िरोझ अब्बास खान याने वापरले आहेत. स्टेज वर अशा स्क्रीनचा वापर Zangoora मध्ये पाहता येतो. अकबर ची ओळख करून देत narrator टोन सेट करतो आणि प्रेक्षकांच्या अनुभव गाठीत काय मेजवानीची भर पडणार आहे याचा प्रत्यय येतो. टेक्नॉलॉजीचा वापर करत मुघल-ए-आझम ब्लॅक अँड व्हाईट चा कलर मूवी काही वर्षांपूर्वी करण्यात आला होता तसाच टेक्नॉलॉजीचा वापर या नाटकात पाहता येतो. स्टेजवर ब्लॅकआऊट आणि Screen speaking (ही मी शोधलेली संज्ञा) यांचा सजीव संमिश्र वापर फ़ीरोझने नेमका केला आहे. वरून येणारे राजमहलाचे स्तंभ, सरकता जिना, शीश महल मधली काचांची चकाकी यामुळे त्या त्या अंकात जीव ओतला जातो.
      "अक्ल अन्धी हो गई और इश्क नगमों की धून पर इश्क़ बेपनाह हो गया" यासारखे उर्दूमध्ये विणलेले शब्द कानाला सुमधुर आणि मनावर नेमक्या ठिकाणी ठसा पाडतात. एका अंकात अनारकली ने  म्हतलेले "काटो को मुरझाने का खोउफ़ नहि होता" हे वाक्य नाटकाच्या जुन्या असूनही सदाबहार कथानकासाठी म्हणलं आहे असं वाटतं. सर्वांना माहीत असलेली कहाणी सादर करण्यासाठी आणि यशस्वीरित्या प्रेक्षकांनी स्वीकारवी म्हणून दिग्दर्शक अब्बास खान यांनी खास मेहनत घेतली आहे. एका दृश्यात जोधा फर्मान करते की सलीमच्या मनावरती युद्धाची दृश्ये मिटावी म्हणून राज नर्तकी ने उत्कृष्ट नृत्य सादर करावे. दिग्दर्शकाने स्वतःलाच दिलेल्या challengeसाठी त्याला सलाम! त्यावर 14 कलाकारांनी सादर केलेले कथक म्हणजे splendid च! प्रेक्षकांना देखील ते नृत्य आपल्या  तालावर थिरकवते. तसेच बहार आणि अनारकली मधिल जुगलबंदी की तितकीच छान रंगलिये. या masterpiece मध्ये नृत्य, दिग्दर्शन, नेपथ्य यासोबतच प्रकाश योजनादेखील भन्नाट! एका दृश्यात स्क्रीनवर दाखवलेल्या राजवाड्याच्या भिंतीतील खिडकी मधुन येणारा चांद्प्रकाश जमिनीवर बिनचूकरित्या टिपला आहे. या सर्वांना साजेशी वेशभुशा मनिश मल्होत्राने खासच पेलली आहे.
         उत्कृष्ट नाटकाच्या सादरीकरणाला सांभाळेल अशा सर्व कलागुणांचा सुतोल समेळ मुघल-ए-आझम मध्ये पाहता येतो.  दोन तास तीस मिनिटांच्या या पर्वणीला माझा सलाम! खरंच याचे वर्णन प्रवीण म्हणतो तसं करता येईल- "आरा..रा..रा...खतरनाक!"

-अमित भोळे


Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...