सावळ्या

सावळ्या ,
ह्या  वर्षीदेखील  तुझ्या भेटीचा  योग  हुकला. तसे मी काही याकरीता नियोजन  वैगेरे  केले होते अशातला  भाग नाही. तुझ्याशी खोटं बोलून काय करणार ? पण दररोजच्या "घर ते ऑफीस  व  परत" अशा वारी करणाऱ्या मला तुझ्या  वारीसाठी वेळ  मिळेल  तर शपथ ! महानगराचा  शाप आणखी काय? पण तुझे रूप मात्र मनापासून  दूर नसते. तू  या ना त्या रूपात तुझी आठवण  मनात सदैव  ताजी ठेवतो. कसं जमतं  रे पंढरीनाथा तुला?
पोटोबावर लक्ष देता  देता आम्ही  विठोबालाच विसरतोय का काय अशी भीती वाटताच तुझ्या नामघोषांत टाळाचा गजर कानांवर पडतो आणि मनाला पंढरीची आस लागते. पण हल्ली हा गजर mobile  ringtone च्या स्वरूपात असतो. आज असाच एका मित्राच्या WhatsApp  profile वर तुझा फोटो पाहिला. तुझी महिमा  अगाध  आहे देवा. भक्त आपल्यापासून दूर गेला तर आपणच त्याच्याजवळ जायचं. कसारे भोळा तू? आणि आम्ही अप्पलपोटे काही हवं असेल तेव्हाच तुझी धाव घेतो. वारीला आलो नाही म्हणून तूच माझ्या लेखणीतून स्वतःला चितारत आहेस नं ?
Social  media  वरची माझी ही post जर कुणी वारीत वाचली, किंवा या post ची आठवण करत जर कुणी तुझ्या चरणी माथा टेकला, नाहीच काही झालं तर ही post वाचली आहे तो mobile तुझ्या  गाभाऱ्यात पोचला तर ज्याप्रमाणे कित्येक वारकऱ्याना तुकोबाचे  बोल ओठी आणि पंढरीचा कळस नजरी असताना जे समाधान आणि पुण्य लाभते तेच पुण्य का नव्हे पण समाधान तरी मला लाभो अशी प्रार्थना तुझिया चरणी करतो!

-वाट चुकलेल्या तुझ्या अनेक वारकऱ्यापैकी एक 

सोहळा प्रेमाचा


"हम लबों से कह ना पाये , उनसे  हाले-ए-दिल कभी,
और वो समझे  नहिं, ये खामोशी  क्या चीज  है"

नुकतेच  निदा  फाझली  यांचे   निधन  झाले  आणि  ज्या  लेखणीने  कित्येक  सुप्त मना  मनात  प्रेमाचा परागकण  पुन्हा  एकदा  रसभरा केला होता  ती कोमळली. प्रेमाला  एक  सातत्य  मुल्य  आहे. पिढ्यान  पिढ्या नी  युगे  युगेच  काय  तर  species to species याची  व्याख्या  समान  नसली  तरी  स्वभाव धर्म  म्हणून प्रेमाने आपली  स्थिती  उत्तरेच्या  ध्रुव  सारखी  अढळ  ठेवली  आहे. मग  या प्रेमाला साजरे  करायला आपल्याला दिवस शोधावा  लागतो? बर  शोधला  तर  शोधला  सगळ्यांचं या बाबत एक मत पण नाही की अमुक केल्यानेच तो साजरा होतो तमुक केल्याने  अधिक भव्य होतो असे लिखित नियम पण नाहीत. गेल्या रविवारी आम्ही आमच्या engagement ची ६ वर्षे  पूर्ण केलीत  (तसा दिवस मी विसरलो होतो कारण प्रेमाला साजरे करायला दिवसाचे बंधन नसावे हे मी आधीच कबूल केलेय तरी) बायकोला ६ वर्षाची ६ रंगाची  गुलाबाची  फुले  द्यावी म्हणून एक गुच्छ बनवून घेतला. तर तो जाम महाग! मी  म्हटलं का रे बुवा? तर फुलवाला  म्हणतो;"सर आज rose day है आज से  सब  गुलाब 14th feb तक  महेंगे  मिलेंगे." म्हटलं  घ्या  सोहळ्याला  पण व्यावसायिकतेचा  शाप लागला. मला गेल्या  आठवड्यात  काही  coupons मिळाली  जे  वापरून  मी  online खरेदीत  discount वैगेरे  मिळवू  शकत होतो. ओळखीची  नसली  तरी  मी  त्या  website ला भेट  दिली  तर पाहतो  तर  काय  सगळी  कडे  लाल  बदाम  आणि  प्रेमाच्या  सोहळ्यात  खरेदीला  उत  यावा म्हणून  इथे discount वर discount दिला जात होता . कशा  वर  तर  महागडे  किचेन्स  भले  मोठे  कार्ड्स  ढेरी  वाले  teddy या  सर्वांवर.

कोणत्याही  सणासुदीच्या  वेळी  बाजारात  गर्दी  व्हावी  आणि खूप  उलाढाल व्हावी हे  साहजिक  आहे. पण ज्या सोहळ्याला काही  नियम नाही ज्याला  त्याची  गरजाही  नाही  तिथे  अनेक  Iinnovative गोष्टींना वाव मिळतो. अलीकडे वाचण्यात  आले की  म्हणे  14th feb साठी  कुण्या  महागड्या  company ने  (नावही लक्षात नाही ) limited editon अंगठ्या घड्याळ वैगेरे goodies काढले आहेत  आणि  early bird discounts पण आहेत. माणूस  खरच creative प्रजातीमध्ये मोडतो . कुठेही  स्वार्थ  शोधतो आणि  तो  साधतोही  प्रेम  म्हणजे किती निस्सीम भावना आणि  तिला  साजरी  करायला  बाजारी करणाची साथ नाही सोडवली गेली त्याच्याने. साजरा करण्यासाठी निरनिराळ्या  मध्यामाना  बळी  पडून  दर  वर्षी  कित्येक   निष्पापांचे  खिसे कापले जातात.  

आपल्या जवळच्या व्यक्तीला साथीची उब द्यावी यातून प्रेम दिसते, महागड्या गाडीतून नाही तर सोबत पायी फेरफटका मारताना गप्पांना उत यावा यातून प्रेम दिसते, गिफ्ट ऐवजी surprise म्हणून एखादं चित्र चितारावं यात प्रेम दिसत, अचानक काहीतरी त्याच्या वा तिच्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालावा त्यात प्रेम दिसत, नाहीच झाला काही तर अगदी सहज मला तू आवडतेस वा आवडतो असं म्हणून / लिहून/ message  करून सांगाव यात प्रेम दिसत. आणि हे सार करायला मुहूर्त लागतो असं नाही. प्रेमाचा सोहळा प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी मानावावा त्याला ठराविक दिवसाची वाट पाहू नये. 

दोस्त

दिल की अंधेरी  गलियोंमे
बहुत ढूंढा तुझे ए दोस्त
तेरा दिदार न कल  हुआ  न आज
कल की उम्मीदपे हम बस नये दोस्त बनाये जा रहे  है ।

कोशीश एक बार फ़िर

उनकी सादगी  का यह असर है
करता  इस  दिल को बेअसर है
वैसे  हुस्न-ए -जंग तो  जीत ही  जाते
बंजारा दिल भटक रहा  इधर उधर है

मासुमियतने मारा हमें
जिंदगीने बख्शा हुआ है
जजबात-ए -सैलाब  से डर नही हमें
कयामततो अपनोने ढाई है 

भंकस

एकला कापला केक
दोनला  लावला फोन
तीनला  बनलो कीन
चारला थकलो फार
पाचला फोडला काच
सहाला  ओरडलो  पहा
सातला टाकली  कात
आठला सुजवली पाठ
नऊला दिसली काऊ
दहाला  पिला चहा 
अकराला कापला बकरा
बाराला खाल्ला चारा
तेराला कागद कोरा
चौदाला मळला मैदा
पंधराला पडला चेहरा
सोळाला झाला चोळामोळा
सतराला वाटला खतरा
अठराला मान ताठरला
एकोणीसला भाजलं कणीस
वीसला केल मिस



Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...