दिल्लीतील दिवाळी (महाराष्ट्र टाइम्स 7 नोव्हेंबर, 2020, मुंबई )

दिल्लीतील दिवाळी

दिवाळी हा वर्षातला महत्त्वाचा सण. काही वर्षांपूर्वी दिवाळी च्या आसपासच नोकरीनिमित्त दिल्लीला स्थायिक झालो. हवा, पाण्याबरोबरच शहरातील रीतीरिवाजही सांस्कृतिक धक्का (culture shock) देणारे होते. माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला दिल्लीतील प्रत्येक गोष्ट अजब भासायला लागली होती.

 

दिवाळी म्हटले म्हणजे नोकरदार माणसाला सुट्ट्यांचा विशेष अप्रूप असतं.  मग ती ऑफिसला सुट्टी असो अथवा मुलांच्या शाळेला.  आम्हाला असायची अशी काही इकडे उत्तरेला दिवाळी ची म्हणून सुट्टी नसते.  मला आठवते आमच्या कडे सहामाही संपून लगेच दिवाळी ची सुट्टी लागे.  ती पण चांगले पंधरा-वीस दिवस.  इकडे मात्र दिवाळी ला फार फार तर दोन-चार  दिवस सुट्टी असते. कारण थंडीचा मुहूर्त साधून नाताळची तशी लांबलचक सुट्टी मिळते.  त्यात गेल्या दोनेक वर्षांपासून प्रदूषण सुट्टीची देखील भर पडली आहे.

 

आपल्याकडे दिवाळी चे स्टार अट्रॅक्शन (Star Attraction ) असते ते म्हणजे फराळ! चिवडा, चकल्या, लाडू यांची खमंग चव दिवाळी चे चार दिवसच नाही तर चांगले पंधरा एक दिवस जिभेवर असते. अनेक घरी तर दिवाळी झाल्यावर सकाळचा नाश्ता म्हणून दिवाळी चा फराळसंपवला जातो. दिल्लीमध्ये ही संकल्पना नसल्यातच जमा आहे. इकडे भर असतो तो रेडिमेट मिठाईचा.  आणि (कदाचित त्यामुळेच) तो जास्त रोचक, लोभस वाटत नाही. अलीकडच्या टीव्हीवरच्या जाहिरातीपहा. मराठी चॅनल्सवर दिवाळी च्या चिवड्याची जाहिरात दिसेल पण हिंदी चॅनलवर अशी एकही जाहिरात नाही. असलीच तर दिवाळी साठी तयार मिठाची जाहिरात दिसेल.

 

दुसरा महत्वाचा फरक म्हणजे आपल्याकडे आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दिवाळी निमित्त फराळाला बोलवतो. दिल्लीला दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्याकडे कल दिसतो. यांत तयार मिठाई सोबतच येऊ घातलेल्या थंडीला अनुकुल सुकामेवा भेट देण्यातच शुभेच्छुक धन्यता मानतात.  बाजारात जर चक्कर मारली तर दुकाने यानेच भरभरून असतात. इतके की अगदी स्टेशनरी विकणारा दुकानदारही दिवाळी त सुक्‍या मेव्याचे पाकिटे विकताना दिसतो. ही पाकिटे देखील विविध प्रकारची आकर्षक रीत्या बनवलेली असतात.  यासोबतच फळे, कोल्ड ड्रिंक्स, चीप्स यांचे विविध प्रकार घेऊन यांना एकत्र करून लाकडी खोक्यात गिफ्ट स्वरूपात विकले जातात.

 


दिवाळीतील दिल्लीचा बाजारही एकदम निराळा असतो.  रोषणाईच्या नानाविध चायनीज ते लोकल चित्रविचित्र दिव्यां सोबतच ते विकणार्‍यांची ही तोबा गर्दी असते. रवी बाजारात रस्त्यात आपल्याला थांबवून मोजे विकणारा बाळू या दिवसात गळ्याभोवती रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा विकताना दिसतो. आपल्याकडच्या बाजारपेठे सोबत इकडच्या बाजारपेठेची एकरूपता शोधायची झाली तर ती दिसते नवीन कपड्यांमध्ये. दुकानांत दिवाळी निमित्त नवीन माला सोबतच नवनवीन सेल पण लागलेले असतात.

 

दुसरी समानता म्हणजे दिवाळी च्या सणाची सुरुवात. जी धनतेरस पासून होत भाई दूज पर्यंत चालते. कडे धनतेरस ला ‘छोटी दिवाली’ असे देखील म्हणतात. आपल्याकडे छोटी-मोठी दिवाळी हा कन्सेप्ट नाही. तसेही इकडे नरक चतुर्दशी विशेष मनवत नाहीत. मी एकदा नरकचतुर्दशीला माझ्या दिल्लीतल्या शेजारच्या मित्राला विचारले कि तू किती वाजता उठलास? त्याने नऊ सांगितल्यावर मी गमतीत म्हणालो “अरे हम दोनो नरक मे भी पडोसी रहेंगे” त्याचा कन्फ्युज्ड चेहरा पाहून माझा हा विनोद सपशेल आपटला ही कळले.

 

लक्ष्मीपूजनाला पत्ते खेळायची प्रथा पण उत्तरेकडची! आपल्याकडे हिंदी सिनेमा व सिरियल मुळे तिला ही उचल मिळाली आहे म्हणे!! आपल्याकडे पावा म्हणजे बलिप्रतिपदा हा सण सौभाग्यवतीसाठी महत्त्वाचा मानला जातो.  सांस्कृतिक महत्वासोबतच प्रमुख आकर्षण असते ते नवऱ्याकडून मिळणारे गिफ्ट. या प्रथेबद्दल एकदा आमच्या सौ ने एका हिंदी भाषिक मित्राच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर ही गोड प्रथा त्या घरातही आनंदाने मानली जाऊ लागली. भाऊबीज ही उत्तरेत तितक्याच उत्साहात नवली जाते आणि दिवाळी ची सांगता होते. मला आठवते लहानपणी आम्ही दिवाळी तील काही फटाके तुळशी विवाहासाठी राखून ठेवत. पण इकडे ती संकल्पना नाही.

 

फटाक्यांचं विषय घेतला तर दिल्लीत गल्ली गल्ली सोबतच सारे जमून राजपथ,इंडिया गेट, कॉनॉट प्लेस इथे फटाके फोडत. अगदी मुंबईत मरीन ड्राइव्हवर करतात तसे. मात्र गेल्या दोनेक वर्षांपासून प्रदूषणावर बंदी म्हणून हे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला आकाशातली आतिषबाजीला मुकावे लागले आहे. यंदा तर दिवाळी अधिकच निराळी होणार आहे. मुळातच कोरोनाने बंधने घातली आहेत. त्यात कोणाकडे येणे-जाणे पण होणार नाही. त्यामुळे दिवाळी नेहमीसारखे नसेल- अगदी महाराष्ट्रात आणि दिल्लीत देखील. तरीही हा सण सर्वांसाठी इतका आनंदाचा असतो की यंदाचे अपवादात्मक वर्ष विसरून पुढच्या वर्षीचे कॅलेंडर आले की आपण दरवर्षी प्रमाणे दिवाळी कधी येणार हे सर्वप्रथम पाहू आणि आपले प्लॅन्स बनवू ही नक्की !

(सदर लेख महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत 7 नोव्हेंबर 2020 ला प्रकाशित झाला )

 


An impressive watch


    Harshad Mehta was no hero. Once he was. For many. He did everything one could do to the stock market. SCAM 1992 THE HARSHAD MEHTA STORY is all the same. It does everything to viewers, makes one financial literate, introduces a new no nonsense actor to Hindi arena, brings wholistic performances together and importantly stuns the audience.

    When I started or rather decided to watch this web series I wasn't very upbeat. I absolutely had no expectations whatsoever. More so, its adapted from a book, I had my doubts. Anyhow, I had to watch to kill time so I took a chance. And boy, the way I got hooked!

    Mr. Mehta (here the Director) doesn't rush to to take a dive in the financial markets. Instead he chooses a very subtle way of introducing common man to the story as it begins. The use of flashbacks supported by narration puts the story in context.

    Screenplay is major pillar of this OTT presentation. रीस्क है तो इस्क है comes as punchline more appropriately so. The dialogues and one liners of the less character are thoughtfully crafted. The blend of Gujarati, Marathi and English never keeps you off the Dalal street. The ensemble of supporting cast carves out individual niches in the entire series. Pratik Gandhi paying Mehta will soon need to see the lawyer to change his surname. He speaks the life of HARSHAD MEHTA through every single move.

    Overall, the series doesn't only portray the life of HARSHAD MEHTA but also brings out the loopholes those existed in the financial market. It doesn't give answers of why, and how. I always say that a good piece of art never answers but makes us face many questions. That's what it does.


बाप्पाचा प्रसाद

 

नुकतेच सरकारने गणेशोत्सव विषयी भरमसाठ नियमांची जंत्री जाहीर केली. यामध्ये मंगलमूर्तीची उंची, एकावेळी एकत्र येणाऱ्या भाविकांची संख्या या विषयी बंधने सांगितली आहेत. हे नियम केवळ सार्वजनिक गणेशोत्सवासाठीच नाही तर घरगुती गणपतीसाठी सुद्धा लागू आहेत. कदाचित आजच्या वाचक पिढीच्या आयुष्यातील हा असा पहिलाच गणेशोत्सव असावा. खरंतर गणेश चतुर्थी हा सण मराठी मनाच्या जिव्हाळ्याचा आहे. त्याला कोणी अशी बंधने घालून देणे मुळातच न पटण्यासारखे आहे. यंदाचे वर्ष मात्र सर्वपरिने निराळे आहे. जणू बाप्पा ने ही बंधने आपल्यावर घालून दिलेली आहेत



साधारणतः वीसेक वर्षांपूर्वी पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना गणपती उत्सवात आम्ही धमाल करायचो. हॉस्टेल मधली आम्ही कार्टी दर रात्री अगदी न चुकता कंपू कंपूत गणेशाची आरास बघायला जात असू. अगदी शिस्तीत प्रत्येक गल्लीबोळात जाऊन वेगवेगळ्या गणेश मंडळांना आम्ही भेट द्यायचो. मग या गणपतीची प्रकाशयोजना भन्नाट, त्याची संकल्पना अचाट यावर जोरदार चर्चा चाले. यंदा मात्र असे अनुभव कुणाला येणार नाहीत. गणपती हे असे दैवत आहे ज्याला आपण आपल्या जवळचे मानतो. त्यामुळे आपला हा आपलेपणा आपण गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये सजवून साजरा करत असतो.  `

गणेशोत्सवात मंगलमूर्ती आणि त्यासोबतचा देखावा या दोन गोष्टी भिन्न भिन्न नसतात.  त्यांची एकरूपता प्रत्ययास येते. मला आठवते लहान असताना गावी एक गणेश मंडळ अत्यंत प्रसिद्ध होते. त्याचे कारण म्हणजे येथे गणेश मूर्ती स्वयंचलित रुळांवर बसून पडद्यामागे जाई आणि दुसरीकडून बाहेर आल्यावर मूर्तीच्या हाती भाविकासाठी मोदकांचा प्रसाद असे.  हा गणराय असो अथवा अगदी गेल्यावर्षी पाहिलेला PUB-G च्या सोल्जर च्या रूपातला गणपती असो, बाप्पा नेहमीच भक्ताच्या मनातले ओळखून असतो. हे या गणेशोत्सवाच्या सादरीकरणातून नेहमी प्रकट होत आले आहे.  त्यामुळे यंदाच्या वर्षी जर कोणी मंडळाने आपल्या देखाव्यात परदेशी मोबाईल ॲप्सवर घातलेली बंदी दाखवून देशभक्ती साजरी केली असती तर नवल वाटायला नको.

गणेशोत्सवा मधील आरास नेहमीच राजकीय, सामाजिक प्रश्नांपासून अगदी वैयक्तिक द्वंद्वा पर्यंत सर्व दाखवते. येत्या वर्षी गणपतीची आरास काय करायची त्याची तयारी दोनेक महिने आगाऊ चालते. मंडळ असो वा घरचा गणपती - तो बसणार कुठे, देखाव्याला किती जागा, पार्श्वभूमी काय अशा अनेक पैलू मधून याचे नियोजन चालत असते. त्याअन्वये मूर्तीची किती उंचीची, कशी असावी यावर देखील विचार होतो सुशोभीकरण आत लुक झुक करणाऱ्या दिव्यांची देखील ध्रुवाची जागा असते. अगदी घरातील जपून ठेवलेली वा नव्याने आणलेली दिव्यांची माळ पण बाहेर निघते. 1962 किंवा कारगिल अशा युद्धांची कथा आणि ध्वनि वर्णने पुण्यात गाजलेली स्मरतात. एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवनातील सुरस कथा देखील इतक्या चपखल रितिने अनेक गणेश मंडळ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा मात्र हे असं होईल असं वाटत नाही.

 

कोरोना महामारीने आपले उलटसुलट करून टाकले आहे. सणासुदीचे दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत. एकंदर सामान्य मान्यताच या सावटात खाली डोके वर पाय अशा झाल्या आहेत. एरवी बाजारात कोणी मास्क लावलेला दिसला तर तो परदेशी असे नाही तर कोणी रोगी वाटे. आपल्याशी बोलताना जर कोणी मास्क लावले तर ते गुर्मीष्ठपणाचे भासे मात्र आज कोणी मास्क लावला नसेल तर आपण त्याच्या जव जाण्याचेही टाळतो, सोशल डिस्टंसिंग ही पाळण्याची काळजी घेतो. एकंदर या संकटाने आपण काळजी घ्यायचे शिकलो असे म्हणता येईल मग ती स्वतःची असो,प्तांची असो व पर्यावरणाची असो! लॉकडाऊन नंतर पर्यावरणात सर्वत्र सकारात्मक बदल पाहायला मिळाला. दिल्लीवासीयांनी पहिल्यांदाच इतकी स्वच्छ हवा आणि यमुनेचे स्वच्छ पाणी पाहिले. अशा परिस्थितीत विचार केला तर वाटते सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्याला बाप्पा ने कोरोना नावाचा धडा दिला असावा.

 

आपण संकटात सापडलो म्हणजे देवाची धाव घेतो आणि यासाठी किंबहुना कोणाचा कोणता देव हे पण ठरलेले असते. मात्र गणेश एकच असा देव असा आहे जो लहान थोरांना समान जवळचा वाटतो. बाप्पा गणराया गजानन अशा अनेक नावांनी श्रद्धाळू परमेश्वराची आराधना करतात. याच उत्साहात गणेश उत्सव देखील थाटात साजरा होते ज्यामध्ये आबालवृद्धांचा सक्रिय सहभाग असतो मग तो गणपती मंडळातला असो अथवा घरातला. घरी कोणी आले तर तो मास्क लावून येतो याचे निरीक्षण केल्यावर माझ्या लहानगीने मला विचारले, आपल्याकडे बाप्पा पण मास्क लावून येणार का यावर्षी?”

तिचा प्रश्‍न निरागस असला तरी सहजच मनात विचार आला की आपण सर्वच ह्या संकटामध्ये योग्य गोष्टी करण्याचे शिकलो आहोत. यामध्ये वर म्हटल्याप्रमाणे काळजी घेणे तर आहे पण त्यासोबतच जुजबी संसाधनात आपल्या जीवनाचा सं बसवणे, वायफळ खर्चांना फाटा देणे अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो, खरंतर ही यादी खूप लांबलचक होईल. येत्या गणेशोत्सवामध्ये आपण बाप्पाला त्याने दिलेल्या ह्या प्रसादा करिता धन्यवाद देऊयात.

अमित भोळे

(सदर लेख आज गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला. )

Two sisters – Quantity & quality

Two sisters – Quantity & quality

We are in the crisis of lifetime. COVID-19 has gripped the entire world and has brought it to a halt, literally. Human lives are lost every minute. Nations once compared for the economic might are today being compared against the total deaths. The ranking has a new meaning. The death toll in countries are ranked based on their quantity, not quality. Of course, any human loss is grave in itself. But don't you think, if 1000 US citizens die due to COVID must have got better medical care for them to fight the disease than those let say 500 from a country like Chile.

 

It's human nature to compare and the mind tends to get inclined to real numbers or quantity for comparison. This is so routine for us that we don't even realize what has it been doing to us. We attach importance to ranking in any exams and assume it to be correct for the knowledge aspect too. Current pandemic (read lock-down) has thrown an opportunity to introspect.

 

Quantifying things are many times simple. For example, success in any examination is quantified in terms of ranks, percentage or marks. It also gives easy chance for comparison. The numerical system supports the quantification. On the contrary, quality- as must have come to your mind too- is non-quantifiable. After all, how can you quantify the pleasure of spending time with family during lock-down? In any case the quality cannot be expressed in numbers for it is very personal in nature. The terms we often use like quality time, quality education are illustrations of the abstract nature of quality.

 

Hence, can it be said that these two terms - quality and quantity - are opposite in nature? are exclusive? Well, not! In fact, these are two sides of the same coin. If a consumer goods company wants to achieve higher sales (quantity) it must ensure higher quality.  If as a consumer I experience that quality of spices from company has not been up to the mark, those shall be avoided during shopping. Quality affecting quantity! Recently, few medical equipment manufacturing companies had to increase production of face mask due to high demand. Now if these companies do not maintain the quality of the products as per the government norms/standards they would have huge inventory and suffer loss. Quantity affecting quality.

While quantity draws boundaries and offers targets to look at, quality gives surety for blissfulness. The current pandemic has to be looked from both perspectives. The quantity to be checked while quality to be ensured. The government administration has a challenge to limit the number of infections while it also has to ensure quality medical facilities. The contradiction of quality and quantity has to be balanced not only during this crisis but post crisis too.


Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...