तीन तिघाडा

मी अंधश्रद्धाळू नाही. मी बुद्धीप्रामाण्यवादीदेखील नाही. म्हणजे अस्सं की मांजर आडवी गेली म्हणून मित्रांना भेटायचं मी टाळत नाही. तसेच त्याच मित्रांसोबत प्यायला बसल्यावर तीन पेग झाले की ’तीन तिघाडा काम बिघाडा’ यावर विश्वास ठेवत चौथा पेग घायचं पण टाळत नाही.

या"तीन" संज्ञेची कमालच आहे बाकी. तीनाला आपण् गॄहितच् धरलेल्ं नाही का? वर्गात पहिला कोण आला हे कळताच दुसरा कोण हे विचारतो. किती  marks चा फरक हे पण विचारतो मात्र तिसरा कोण काय आपल्याला काहीही घेणेदेणे नसते. अगदी पुळका येवून विचारलच आणि समोरच्यालाही ते माहिती असंलच तर ते कळताच विसरूनही जातो.

Career निवडतानाही तसचं. "मी engineering ला admission घेणार, नाही तर मेडिकल","दोघंही नाही झालं तर तिसरा पर्याय?" "मग पाहू BSc, BCom किंवा  BA ही.  म्हणजे पर्यायतला तिसरा पैलू अनिश्चितच. 
आपण एकटे असतो तेव्हा मजा करतो. दुकटे झाल्यावर जोडीने हिंडतो, मज्जा करतो. मात्र दोघांत तिसरा आल्यावर? यचे नाक बापावर, डोळे आईवर,रंगपण आईवर असे तर्क करून मग राजकारण  सुरू होते. तिसर्‍याच्या आगमनानंतर अजुन बरचं काय काय होतं. नकळतपणे तिसरा ठरतो उपरा.

नुकतेच टी.व्ही.वर ’धूम-३’चे ट्रेलर प्रदर्शित झाले. उगाच फुटकळ बॉलीवूड चर्चेतून मग त्यावर  पहिल्या दोन भागांसोबत तुलनात्मक अपेक्षांचे ओझे टाकण्यात आले. इतकेच नाही तर हॉलीवूडमध्ये ज्या ज्या चित्रपटांचे तीन-चार भाग आजपावेतो निघाले त्यांचेही दाखले मिळतात. बिचारा तिसरा धूम ठोकायला तयार!
खरे तर आपल्या अंतर्मनालापण तिसरं काही नकोच असतं. "नाण्याच्या दोन बाजू","दोन दोन हात","दोनाचे चार" असे शब्द आपण कितीतरी वेळा वापरतो. आपल्याला कळत पण नसते की आपण ’तीना’ला चार हात लांब ठेवत आहोत. जर ’तीन’ हा केवळ एक अंक नसून व्यक्ती असला असता तर समजातील उपेक्षित लोकांत गणला गेला असता हे नक्की.

सांत्वनास्पद आपणही या तीनासाठी केले आहेच की ’पळसाला पाने तीनच’,’तीन तिघाडा काम बिघाडा’, ’त्रिकुट’,’प्रेमाचा त्रिकोण’ अशा नकारात्मक बोचणारे दोन चार संधर्भ आपण बाळगले आहे. एवढचं नाही तर ऑलिंपिक सारख्या स्पर्धांत Bronze पदकांवर तिसर्‍याचा हक्क देवून आपण ’तीना’ला गौरविले आहे.

ही झाली एक बाजू,दुसरी बाजू ही की तीनानेही आपल्यावर चांगला सूड उगवला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ते कळतही नाही. कोणत्याही दोन व्यक्ती, गोष्टी आपण सहज compare करू शकतो आणि एकापेक्षा दुसरी श्रेष्ठ वा कनिष्ठ हे ठरवू शकतो. हिच तुलना जर दोन ऎवजी तिघांत केली तर मत्र आपली चांगलीच तारांबळ उडते. सचिन श्रेष्ठ की ब्रडमॅन यांवर चर्चा होवू शकते मात्र सचिन, ब्रडमॅन, लारा यांच्यात तुलना केली तर एकमत  तर होणार नाहीच मात्र चर्चेत इतिहास, भूगोल, तापमान, हवामान, पीच, विकेट अशा अनेक बाजू येतील. तसेच कोणी अंधश्रद्धाळू वा बुद्धीप्रामाण्यवादी हे ठरवणे जितके सोपे तितकेच कठीण या दोहोंव्यतिरिक्त तिसरे कोणी व्यस्ततावादी आहे हे ठरविणे. असे अनेक दाखले देता येवू शकतात.

खरंच, तीन जितका गोंधळ घालू शकतो ते कोण्या एकट्या-दोघांचं काम नाही. 

ती

कधी ती शाळेत होती
कधी कॉलेजात
कधी ती होती सणासूदीत
कधी होती वॉलेटात

कोणाचेही बंधन तिला नसे
ना कोणाची चिंता
तिलI नसे कोण्या दुसर~या जगाची खंत

स्वच्छंदी सायकलीवर रमत असे
छोट्या कपट्यांना जमवून नवीन आकार
साकार करत असे
सरस्वतीने दिलेल्या आशीर्वादाने
तिच्या कलागुणांना अधिकच वाव दिला

आज मात्र ती उरलीये केवळ बातम्यांत
न्यूज चॅनलच्या अंधूक आक्रुतीत
जनतेच्या हळहळीत आणि
उरलीये निव्वळ बिभत्स चर्चेत

एक निर्भया होती
आता काय काय नावं शोधणार
तुम्हीपण?
बघा, कोणी तुमच्या परिचयाचं नाव तर नाही
ठेवलय तिला?

किती दिवस आपण अस्स
हायसं वाटून घेणार आहोत?
बरं झालं ही कोणी दुसरी आहे अस्सं
म्हणत किती दिवस स्वःतला भाग्यवान मानणार आहोत?

विषयाला चघळत राजकारण्यांना
शिव्याशाप देण्यातच धन्यता मानणार आहोत?
मनातल्या विझलेल्या मशालींना
इंधन घालण्याचं कधी पर्यंत टाळणार आहोत?

रात्रीचे अभंग-

मिकी डॉनी विमी। थकुनि गेले सारे ॥
दोस्त असुनि माझे। बपुनि गेले सारे ॥

मम्मी पप्पा कसे। यांना कळेना थोडेसे ॥
ओठी माझीया हसू। येतसे जरासे ॥

रात्र झाली तरी । सुरु मझी चळवळ॥
म्हणे संत स्प्रुहाबाई । मी अवखळ ॥

संम्मेलनास गेलेल्या नवोदित साहित्यिकास


साहित्य संम्मेलनास गेलेल्या नवोदित साहित्यिकास खुले पत्र:

मित्रा, सर्व प्रथम तुझे अभिनंदन. अनेक उदयोन्मुख लेखक ज्याचा केवळ विचारच करत राहतात ते तु प्रत्यक्षात केलस. ही काही साधी गोष्ट नाही मित्रा. अनेक संकटांना तोंड द्यावं लागत. एक तर साहित्य संम्मेलन जिथे कुठे असेल तिथे पोहचायला म्हणजे एक कठीण काम. एक तर स्वतंत्र गाडी परवडणारी नसते दुसरे महामंडळाच्या प्रवासाबद्दल न बोललेलेच बरे. ऐकलय की संम्मेलनास्थळी राहण्याची पण धड व्यवस्था नसते. असो. साहित्यिक प्रेरणा जेथुन घ्यायच्या असतात तिथे या सर्व गोष्टी खुज्या वाटतात. पत्र यासाठी लिहिण्याचे कारण असे की, तू ज्यासाठी तिथे गेलायेस ते तु नक्की मिळव. साहित्याचा हा उत्सव वर्षातून एकदाच येतो दोस्ता. यामुळे याचा पूरेपूर फायदा उचल. परिसंवादास हजर रहा. आवडत्या लेखकाच्या, कवीच्या भाषणातील एकेक शब्द अधाशासारखा वेच आणि त्यातुनच तुझ्या सर्जनशीलतेला नवी पालवी फुटू दे. हे सोपं नाही हं मित्रा, या एकाच वेळेस तुला इतर गोष्टी भूरळ पाडतील अशी पूरी तरतूद तिथे असणारच. जसे, पर्यटनासाठी नजीकची स्थळे, प्रादेशिक खाद्य, या सर्वाला बळी पडलेला संम्मेलनस्थळी आलेला लहान थोरांचा लोंढा आणि अजुन बरेच काही...पण आन्तर्मनातुन प्रेरित झालेल्या तुला मी काय बोध देणार?

अजुन एक मह्त्वाची गोष्ट, साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षीय भाषणाला आवर्जून हजर रहा. अरे, मी तर ह्या अनेक भाषणांच संकलित एक पुस्तक देखील विकत घेतलय ते (कधी कधी) वाचताना मी विचार करतो की, मी प्रत्यक्ष ह्या भाषणाच्या वेळी हजर असायला हवं होतं. हा मौका तुला लाभलाय त्याचं सोनं कर मित्रा. त्या भाषणामुले तुझा एक साहित्यिक द्रुष्टिकोण तयार होण्यास मदतच मिळेल. पण एक सुचना, ह्या भाषणाला समकालीन राजनैतिक रंग तर नाही न ते तपासुन घे आणि राजहंसाप्रमाणे हवं तेच निवड. या वरुन आठवल, प्रत्येक साहित्य संम्मेलनास राजकारण्याची मोठी हजेरी असते म्हणे, अरे दोन वर्षापूर्वी तर वाचल होत की उद्घाटना प्रसंगी सर्व नेतेच व्यासपीठावर होते आणि त्यामुळे कित्येक नामवंत साहित्यिक दुखावले गेले होते. पण तु तुझे द्येय ध्यानात ठेव. प्रत्येक साहित्यिकाची प्रेरणा निरनिराळ्या स्थानात असते. तु तुझे स्थान शोध. वरिष्ठ साहित्यिकांशी या वर चर्चा करता आलिसच तर सोन्याहुन पिवळं. ते (निदान सम्मेलानाच्या दिवसांत तरी) वेळ देतील ही अपेक्षा.

अजुन एक, तिथे पुस्तकांचं एक दालन असेल तिथे विक्रीस अनेक कलाक्रुती असतील. त्यातुन दुर्मिळच तेवढ्या वेच. बहुतेक वेळी ह्या दालनात बाजारीकरणाच्या नवनवीन क्लुप्त्या तुला पाहवयास मिळतील. सवलत दर, सभासद वर्गणी आणि बरेच काही.
अरे तुला कळणार पण नाही संम्मेलनाचे दिवस कसे भुर्र कन उडून जातिल. सोबत राहत्तील त्या केवळ आठवणी आणि मनात सहित्यिक ऊर्जेची ठिणगी. ह्या ठीणगी ला विझू देवू नकोस. त्यावर आपल्या लिखाणातून साहित्याच पेट्रोल शिंपडत रहा. पुढल्या वर्षाची वाट नको पाहूस. तोवर तुझे ही द्रुष्टिकोण तयार होतील तु पन कोण्या एका प्रवाहात मिसळून जाशील. कोण जाणो, तू येत्या वर्षात व्यासपीठाच्या अधिक नजदिक जाशील आणि नवनवोन्मेषशाली लेखकास तुही प्रेरणा देशिल.....

-तुझा एक अनोळखी दोस्त.

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...