तीन तिघाडा

मी अंधश्रद्धाळू नाही. मी बुद्धीप्रामाण्यवादीदेखील नाही. म्हणजे अस्सं की मांजर आडवी गेली म्हणून मित्रांना भेटायचं मी टाळत नाही. तसेच त्याच मित्रांसोबत प्यायला बसल्यावर तीन पेग झाले की ’तीन तिघाडा काम बिघाडा’ यावर विश्वास ठेवत चौथा पेग घायचं पण टाळत नाही.

या"तीन" संज्ञेची कमालच आहे बाकी. तीनाला आपण् गॄहितच् धरलेल्ं नाही का? वर्गात पहिला कोण आला हे कळताच दुसरा कोण हे विचारतो. किती  marks चा फरक हे पण विचारतो मात्र तिसरा कोण काय आपल्याला काहीही घेणेदेणे नसते. अगदी पुळका येवून विचारलच आणि समोरच्यालाही ते माहिती असंलच तर ते कळताच विसरूनही जातो.

Career निवडतानाही तसचं. "मी engineering ला admission घेणार, नाही तर मेडिकल","दोघंही नाही झालं तर तिसरा पर्याय?" "मग पाहू BSc, BCom किंवा  BA ही.  म्हणजे पर्यायतला तिसरा पैलू अनिश्चितच. 
आपण एकटे असतो तेव्हा मजा करतो. दुकटे झाल्यावर जोडीने हिंडतो, मज्जा करतो. मात्र दोघांत तिसरा आल्यावर? यचे नाक बापावर, डोळे आईवर,रंगपण आईवर असे तर्क करून मग राजकारण  सुरू होते. तिसर्‍याच्या आगमनानंतर अजुन बरचं काय काय होतं. नकळतपणे तिसरा ठरतो उपरा.

नुकतेच टी.व्ही.वर ’धूम-३’चे ट्रेलर प्रदर्शित झाले. उगाच फुटकळ बॉलीवूड चर्चेतून मग त्यावर  पहिल्या दोन भागांसोबत तुलनात्मक अपेक्षांचे ओझे टाकण्यात आले. इतकेच नाही तर हॉलीवूडमध्ये ज्या ज्या चित्रपटांचे तीन-चार भाग आजपावेतो निघाले त्यांचेही दाखले मिळतात. बिचारा तिसरा धूम ठोकायला तयार!
खरे तर आपल्या अंतर्मनालापण तिसरं काही नकोच असतं. "नाण्याच्या दोन बाजू","दोन दोन हात","दोनाचे चार" असे शब्द आपण कितीतरी वेळा वापरतो. आपल्याला कळत पण नसते की आपण ’तीना’ला चार हात लांब ठेवत आहोत. जर ’तीन’ हा केवळ एक अंक नसून व्यक्ती असला असता तर समजातील उपेक्षित लोकांत गणला गेला असता हे नक्की.

सांत्वनास्पद आपणही या तीनासाठी केले आहेच की ’पळसाला पाने तीनच’,’तीन तिघाडा काम बिघाडा’, ’त्रिकुट’,’प्रेमाचा त्रिकोण’ अशा नकारात्मक बोचणारे दोन चार संधर्भ आपण बाळगले आहे. एवढचं नाही तर ऑलिंपिक सारख्या स्पर्धांत Bronze पदकांवर तिसर्‍याचा हक्क देवून आपण ’तीना’ला गौरविले आहे.

ही झाली एक बाजू,दुसरी बाजू ही की तीनानेही आपल्यावर चांगला सूड उगवला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ते कळतही नाही. कोणत्याही दोन व्यक्ती, गोष्टी आपण सहज compare करू शकतो आणि एकापेक्षा दुसरी श्रेष्ठ वा कनिष्ठ हे ठरवू शकतो. हिच तुलना जर दोन ऎवजी तिघांत केली तर मत्र आपली चांगलीच तारांबळ उडते. सचिन श्रेष्ठ की ब्रडमॅन यांवर चर्चा होवू शकते मात्र सचिन, ब्रडमॅन, लारा यांच्यात तुलना केली तर एकमत  तर होणार नाहीच मात्र चर्चेत इतिहास, भूगोल, तापमान, हवामान, पीच, विकेट अशा अनेक बाजू येतील. तसेच कोणी अंधश्रद्धाळू वा बुद्धीप्रामाण्यवादी हे ठरवणे जितके सोपे तितकेच कठीण या दोहोंव्यतिरिक्त तिसरे कोणी व्यस्ततावादी आहे हे ठरविणे. असे अनेक दाखले देता येवू शकतात.

खरंच, तीन जितका गोंधळ घालू शकतो ते कोण्या एकट्या-दोघांचं काम नाही. 

9 comments:

  1. 3 - yes it is indeed unique a number and the perspectives presented are varied, insightful and outright hillarious at times.
    Pleasant and refreshing read!

    ReplyDelete
  2. Me tar mazya aai wadilancha tisara mulga aahe !!!
    -Swapnil Metkar

    ReplyDelete
  3. Two is a group, three is a crowd.

    The number 3 has many facts, some of which may be considered interesting. For instance, the number 3 is considered a holy number in numerology since three represents the Holy Trinity in Christianity. In fact, the number three appears in many mythologies around the world. Three is also an odd number as well as a prime number. The term 3D is short for three dimensional, which describes objects which have depth. When dealing with colors, there are only 3 colors which make all the colors in the color wheel: red, blue, and yellow.

    In Hinduism:
    The Trimurti: Brahma the Creator, Vishnu the Preserver, and Shiva the Destroyer.
    The three Gunas underlie action, in the Vedic system of knowledge.

    _Sujit Rukari

    ReplyDelete
  4. Wa Saheb

    3 hya ankawar jar tumhi evadhe luhu shakata,kharach tumachya Pratibhela Salam!!!!!!!

    Thanks & Regards

    Mahesh N.Bhole

    ReplyDelete
  5. Upsc made 3rd choice chi post milali tar na ghenare kiti jan asanar ? But U caught the popular psychology! !!!

    Shashi Boralkar

    ReplyDelete
  6. भौ.... एक नंबर!
    तिसरा डोळयाने बघुन चितारलंस....

    लेखन क्षेत्रातील तीनमारखा!

    ReplyDelete
  7. Asa nahi hann jiju, 3 is my lucky number :)
    So I respect 3 number

    ReplyDelete

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...