वादळ

मी एक वादळ
संतप्त पाण्याच्या शब्दांना प्रसवणारं
सीमाहीन संकुचित सागराच्या रागाला ऐहिकरूपात बदलणारं

मी वादळ 
सारं सामावून घेणारं
पृष्ठभागावरून स्वत:भोवती 
गिरकी घेत हवेलाही वजन देणारं

मी वादळ सर्व हलवून टाकणारं
मनातल्या समाधानाच्या डोंगरांना पार करणारं
नुकतंच जन्मलेलं पण अगणित 
काळापासून कालचक्राच्या साक्षी असणाऱ्या
सागराला भयंकर रूप देणारं
मी वादळ अहंकारी

मी वादळ पृथ्वीच्या कणांनाही 
स्वत:च्या केंद्राभोवती फिरवणारं
मी वादळ उर्जेच भुकेलं
मिळेल त्याला तुडवून त्यातलं
सारं शोषून घेणारं

स्वत:च्या झंझावातात विध्वंस ओढवणारं
मी वादळ जगाला विसरून
आत्मकेंद्री बनलेलं

मी वादळ मोठाल्या झाडांना
मुळासकट उपटणारं
पण शेवाळ्यासमोर हात टेकलेलं
मी पणाच्या सर्वोच्च आविष्कारापासून
क्षुद्रपणासमोर लोटांगण घालणारं
मी एक वादळ ...
नुकतंच विरलेलं.

11 comments:

  1. खूपच सुंदर !
    त्या पुढे माझे दोन शब्द :)

    मी वादळ
    तो दूर जात असताना तिच्या मनात उठणारं
    ती जवळ येताच त्याच्या डोळ्यावर भुरळ पाडणारं
    मी एक वादळ मिठीत बसलेल्या अश्या अनेक
    'त्या दोघ्यांच्या' प्रेमाचं साक्षी बनलेलं !

    ReplyDelete
    Replies
    1. Not bad. u should write often!

      Delete
    2. Haha Thanks!
      So long as you keep inspiring, I shall give honest try to do so!

      Delete
  2. तुमच्या लेखनात विद्रोह जाणवतो. ह्या रचनेवरुन मला सौमित्रच्या कविता आठविल्या.

    ReplyDelete
  3. तुझ्या शांत स्मित हास्य असलेल्या चेहऱ्यामागे सुप्त वादळ आहे की मित्रा...

    ReplyDelete
  4. तुझ्या शांत स्मित हास्य असलेल्या चेहऱ्यामागे सुप्त वादळ आहे की मित्रा...

    ReplyDelete
  5. अप्रतिम!
    उर्जेचं भुकेलं वादळ असंच घोंगावू दे.

    ReplyDelete
  6. "मारलंस".....
    मराठीत सांगितलेलं कळत नाही.... इंग्लिश मध्ये सांगू..."मार्वलस"

    ReplyDelete

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...