I am no claustrophobic

claustrophobic हा किती tongue twisting शब्द आहे. अगदी लक्षात न ठेवण्याजोगा. पण तरीही जेव्हा मी लिफ्ट मध्ये शिरतो त्यावेळी या शब्दाची आठवण होते. मी काही बंद जागांना घाबरणाऱ्यातला नाही. (निदान मला जाणणाऱ्याकरीतातारी) मात्र 'लिफ्ट-एक अद्वितीय अनुभव' याला मी माझा PhD विषय नक्कीच बनवू शकतो.

मला अजूनही आठवते माझ्या बाबांसोबत मी लहान असताना हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा ते मला एका चिंचोळ्या खोलीत घेवून गेले. तेथे आधीच २-४ वार्डबॉय समक्ष लोक उभे होते. मावेल असा एक स्ट्रेचरदेखील होता. माझे बाबा त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते तेव्हा मी त्याना विचारले " हे ऑपरेशन थिअटर आहे का?" त्यांनी नाही सांगितले आणि शिस्तीत त्यासर्वांसोबत मलाही उभे ठाकले. समोरचा जाळीचा दरवाजा बंद झाला आणि गुरुत्वाकर्षणाला डावलत पोटातल्या वारांभाताला धक्का देत आम्ही उचललो गेलो. काही कळण्याआधीच ती सबंध खोली हलायची थांबली आणि जाळी उघडताच आम्ही बाहेर पडलो. मी परत बाबांना विचारले "थिअटर होते का ते?" तर बाबा म्हणाले, "लिफ्ट होती." नंतर मी अनेकदा लिफ्टमध्ये चढलो असेन मात्र काही उल्लेखनीय निरीक्षणांची नोंद न करणे माझ्यातल्या नवख्या Bloggerला शक्य नाही. 

मुंबईतल्या विक्टोरियन बिल्डींगमधल्या लोकलच्या आवाजाला सलाम ठोकणाऱ्या मोडकळलेल्या उघड्या लिफ्ट पासून दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच युरेका टोवेर्सच्या ८८ मजले निव्वळ ३८ सेकंदात सुसाट वेगाने पार करणाऱ्या अत्याधुनिक लिफ्टपर्यंत अनुभवलेला प्रत्येक लिफ्टप्रवास स्वत: एक अनोखा आहे.

लिफ्ट ही एक सुविधा असते. जिन्याचा त्रास वाचवण्यासाठीचा पर्याय असते. आमच्या होस्टेल मधली लिफ्ट मात्र ठराविक वेळेतच चालायची. का तर म्हणे शिस्त. कसली डोम्बाल्याची शिस्त? त्यात अजून भर तर काय, की पहिले दोन माळे लिफ्ट थांबणार नाही. हे म्हणजे अतीच ! नेमकी माझी रूम दुसऱ्या माळ्यावर, कित्येकदा तर मी तिसऱ्या माळ्यावर जायचो लिफ्टसाठी. असो, असे असले तरी काही म्हणणे नाही, पण जर दुसऱ्या मजल्यावरच्या उपऱ्यांना लिफ्टची सुविधा नाही तर मग त्रास पण नको नं? प्रत्येक वेळेस लिफ्टचा दरवाजा उघडला की ती irritating tune सबंध होस्टेलला ऐकू जायची. तेव्हा पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्यांना अधिक त्रास होई.

ह्या लिफ्टच्या ट्यूनची पण गंमतच असते.  एकदा जेव्हा मी नवीन नोकरीच्या ठिकाणी नरीमन पॉइन्टच्या बहुमजली इमारतीत गेलो तेव्हा तो लिफ्टमन आणि मी आम्ही दोघेच लिफ्टमध्ये होतो. लिफ्ट सुरु होताच सुंदर संगीत कानी पडले. मला वाटले ह्या लिफ्टमन कडे मोबाईलपण आहे? त्याकाळी मोबाईल आजइतका सर्रास वापरला जात नसे. मीच स्वत:ला म्हटले होते की पहिल्या पगारात पाहू आणि ह्याच्या जवळ मोबाईल...मग नरीमन पॉइन्ट, आलिशान, Financial Capital of India असे विचार मनात येत होते तितक्यात लिफ्ट थांबली आणि ट्यूनपण थांबली. मला कळले की ती लिफ्ट होती मोबाईल नाही. निदान याची जाणीव झाली की होस्टेलच्या कर्कश भसाड्या आवाजापेक्षा इथली बंदिस्त खोली जास्त संगीतमय आहे.

MBA करताना एक गोष्ट ऐकली होती. म्हणे कुण्या एका businessman ने त्याच्या ऑफिसमध्येएक लिफ्ट लावण्यासाठी Japanese इंजीनीअरला बोलावून सांगितले की मला सर्वात वेगवान लिफ्ट बनवून दे. Japanese तंत्रज्ञानाचा पाऊस पाडत त्याने मग तसे केले देखील पण ह्या पठ्ठ्याचं समाधान काही होईना. अखेर त्या Japanese ने त्या लिफ्ट मध्ये म्हणे आरसा लावला आणि businessman ला लिफ्ट विगावान वाटू लागली. आजही आरशात पाहत असलो तर कळतपण नाही मजला केव्हा आला ते.

लिफ्टमधल्या अशाच अचाट उपकरणांपैकी एक जोडी म्हणजे लाईट नी पंखा. मला अलीकडच्या Automatic लिफ्ट मधल्या या उपकरणांचे नवलच वाटते. म्हणजे यांना कसं कळतं आत लोक आहेत आता आपण सुरु व्हावं? मी तर उगाच दोनेकदा तळमजल्यावरून Top Floorचं बटन दाबलं आणि चटकन बाहेर पडलो. म्हटलं पाहावं काय होतं? काय झालं ते आजपर्यंत समजलं नाहीय. असो.

केवळ वर खाली करण्यापलीकडे लिफ्ट अजून इतरही कार्य करत असते. अलीकडच्या टीवीवरील जाहिराती पहिल्या तर कळते की लिफ्ट मध्ये चित्रित जाहिरात फिटनेस ड्रिंक ते दारूच्या नावाच्या music CDs पासून detergent, perfumeपर्यंत काहीही विकण्याची ताकत या लिफ्ट मध्ये असते. कारण कदाचित लिफ्ट हा खरच एक अद्वितीय अनुभव असतो जो अगदी नकळत पणे व्यक्तिगत बनतो. लिफ्ट चे अनेक प्रकार असतात. mall मधली प्रशस्त, airport वरील modern, हॉटेल्स मधली पारदर्शक दरवाज्याची, Factory वैगेरे मधील दणकट नी अगडबंब असे असले तरीही लिफ्ट एक "leveler" आहे. इथे अबालवृद्ध, श्रीमंत गरीब, पिऊन-साहेब सगळ्यांचे उत्थापन सोबतच होत असते. लिफ्ट कोणताही भेदभाव करत नाही. ही बंदिस्त खोली खरच मनाने मोठी आहे. 


24 comments:

  1. I understood the contents partly, due toy limited Marathi understanding. Claustrophobia is not something that can't be overcome..with a bit of mental toughness its easy! Its important to understand that these days we often have to encounter closed places..so determined effort to overcome ASAP can produce results (without diversion through the ways suggested in kat para)!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for comment Sir. I used google translation and found it be pathetic. Next time i shall bear this in mind while blogging.

      Delete
  2. Very interesting and peculiar points are covered in the blog Amit...and your observations are really thought provoking..keep feeding us with such superb thoughts

    ReplyDelete
  3. लिफ्ट हा विषय खरोखर मोठ्या चर्चेस पात्र ठरतो. मला तर असं वाटतं कि बरीच विविध स्वभावाची माणसं (महिला) काही क्षणा साठी एकत्र येतात आणि या situation चा उपयोग चांगल्या प्रकारे क्रीटीव्ह माईंड करू शकतो. मला लिफ्ट दिसली कि एक दुजे के लिए च मेरे जीवन साथी हे गाणं आठवतं. खूप लिहिण्यासारखं आहे पण पुन्हा केव्हा तरी.

    ReplyDelete
  4. Excellent Amit. Highly impressed.

    ReplyDelete
  5. लिफ्ट।।।।।।।।

    ReplyDelete
  6. Khupach chaan Amit Dada.. lft sarkhya samanya vishayavar asamanya lekh..🙂👍👍

    ReplyDelete
  7. Very keen observation. Excellent.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. Nice experience sharing article with relavent message...keep writing and sharing such blogs....all the very best

    ReplyDelete
  10. "गुरुत्वाकर्षणाला डावलत पोटातल्या वरणभाताला धक्का", "लिफ्टच्या ट्यूनची कहाणी, "लिफ्ट एक "leveler"", अचाट कल्पनाशक्ती आहे बुवा...

    पण तू नवखा ब्लॉगर आहेस हे अमान्य आहे, तू गाठलेल्या टॉप फ्लोअर पर्यंत आम्हाला पोहचायला लिफ्ट लागेल हे मात्र नक्की!

    ReplyDelete
  11. Sheer 'Uplifting'...! Ottis बाबा धन्य झाला असेल!

    ReplyDelete
  12. Good observation, like to read ur blogs specially in Marathi, Ata ya blog madhala ekhad mudda pratekane kadhitari vicharat analach asel lift madhe Pahilyanda basatanna, u elaborate it very well, please keep write frequently, eagerly waiting for next blog

    ReplyDelete
  13. खुपच छान. लिफ्ट सारख्या विषयांवर असे पण विवेचन होऊ शकते हे पाहून (का वाचुन?) आनंद झाला. सर, तुम्ही अजुन लिहावे ही इच्छा.

    ReplyDelete
  14. Well expressed, this blogpost echoes impressions and emotions of many including me,keep writing

    ReplyDelete
  15. Interesting. Very minute observations. लिफ्ट बद्दल एवढे काही लिहिता येईल, cant imagine. You really must write more often.

    ReplyDelete
  16. सुरेख ललित लेखन अमित! कल्पना भन्नाट आहेत ��

    ReplyDelete
  17. खूपच छान। अप्रतीम लेखन ज्याचे कितीही कौतुक केले तरीही कमीच आहे। लेखातुन स्पष्ट होते कि आपण नविन ब्लागर नाही आहोत। विशिष्ट ठिकाणी योग्य शब्दाचा वापर लेखास आणखी सूुंदर बनवितो। पुन पुन लेख वाचला तरीकी तितकाच आंनद येतो । एक सुदर लेख एवं भाषेवर जबरदस्त पकड।

    ReplyDelete
  18. Very nicely expressed. After reading this even i felt like writing something like this (My first experience about something).Keep writing!

    ReplyDelete
  19. Superb written ,Marathi letrature nice...... Keep expressing.

    ReplyDelete

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...