'हे असंही असतं?'

हे असंही असतं?'

  केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा नुकतीच पार पडली. देशाच्या कानाकोपºयाातून  अनेक उमेदवारांनी मुख्य परीक्षेच्या तयारी साठी अथवा पुढल्या वर्षीच्या परीक्षेसाठी दिल्लीकडे कूच केली.  यूपीएससीची पंढरी मानल्या जाणाºया दिल्लीते असे अनेक डेरे आहेत जेथे हे उमेदवार वास्तव्य करण्यात धन्यता मानतात. या ठराविक परिसरांत यूपीएससीे अनेक क्लासेस चालतात. अशाच राजेंद्र नगरात परवा जाण्याचा योग आला. महाराष्ट्रातल्या एका नातेवाईकास घेऊन मी तेथे गेलो.    हा नातेवाईक बायकोचा भाऊ असल्याने मी अधिक जिज्ञासूवृत्तीने त्याच्यासाठी विचारपूस करू लागलो. 

पंधरा वर्षांपूर्वी मी देखील असाच दिल्लीत धडकलो होतो. आज राजेंद्र नगर वेगळेच वाटत होते. जेथे पाहतो तेथे क्लासेसच्या जाहिरातीच जाहिराती. ( असं म्हणण्याची पद्धत खास दिल्लीचीच) गल्ली बोळाचा आणि प्रत्येक स्केअर फूट जागेचा सुयोग्य उपयोग येथे केलेला आढळतो. जाहिरातींचे नानाविध प्रकार सापडतात. भिंतीवरील, फलकावरील, इमारतीच्या माळ्यावरून लटकलेली सुरकुत्या पडलेले पोस्टर, पॉम्फलेट वरील रंगबेरिंगी, यशस्वी उमेदवारांचे नीटनेटके फोटो असलेल्या अनेक जाहिराती.  यात एलईडीवरील जाहिरात लक्ष वेधते. सहजच मनात आले, कागदावरच्या जाहिरातींचा प्रवास आता प्रगल्भ झाला आहे. सनदी सेवेकडे कल असलेला कोणीही इथे आला तर तो तावडीतून निसटता नये- याची खबरदारी चहावाल्यापासून मोठ्या दुकानापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण घेत असतो. असाच अनुभव आला. 
आम्ही एका चहा वाल्याकडे गेलो. पंधरा वर्षांपूवीचा ५ रुपये स्पेशल आता १० रुपये 'चालू' चहा झाला होता. त्याला सहजच विचारले कि अमूक-तमूक विषयासाठी असणारा क्लास कुठे आहे? त्याने केवळ पत्ताच नाही सांगितला तर त्यासाठी नोट्स कुठे मिळतील, कुठे राहावे, असे सगळे ताळेबंदच सांगायला सुरुवात केली. आम्ही लगेच पळ काढला.
राजेंद्र नगर आणि तत्सम परिसराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी छायाचित्रणाची (फोटोकॉपी) दुकाने. मला वाटते फोटोकॉपीपेक्षा अधिक संक्रमण कोणत्याही नवीन संकल्पनेने शिक्षणक्षेत्रात केले नसावे. इथे त्याचा जास्तच प्रसार आहे. राजेंद्र नगरात एखाद्या मध्यम आकाराच्या पुस्तकांच्या दुकानाला लाजवेल अशी मोठ्ठाली फोटोकॉपीची दुकाने आहेत. विदेशी न परवडणाºया पुस्तकापासून क्लासेसच्या लिखित नोटसपर्यंत  सर्व काही येथे मिळते. एखादे मासिक खर्चिक वाटले तर या 'छापखान्या'त हवे त्या मासिकातल्या हव्या त्या लेखांची छायाचित्रित प्रत उपलब्ध होऊ शकते. हे म्हणजे अचाटच! आमचा मोर्चा मग क्लास कडे वळला. 
एका प्रसिध्द क्लासचे आॅफिस गाठले. पाहतो तर काय तिथे तोबा गर्दी! मोठ्ठी रांग! विचारल्यावर कळले की नवीन बॅचसाठी टोकन मिळत आहेत. बँंकेनंतर टोकनचा (आणि ते घेऊनही रांगेचाही) होणारा इतका कार्यक्षम वापर इथलाच. क्लासेसची फी चौपट वाढलेली. लाख दीड लाखांमध्ये क्लासवाले एक बॅच दहा महिन्यात उरकावातात. आणि एका वर्गात पाचशे विद्यार्थी ! 'हे असंही असतं?', माझ्या शालकाला भोवळच आली. सनदी सेवेत प्रवेशुच्छुकांचा जणू हा विकतचा कारखानाच वाटावा!



अशा कोण्या एका कारखान्यात प्रवेश मिळाला की मग उमेदवारासाठी पुढचे आव्हान म्हणजे राहण्याच्या जागेचे! ये-जा करण्याचा वेळ वाचावा, अभ्यासाचे वातावरण मिळावे म्हणून इथे हे राहतात. पण काय किंमत मोजावी लागते? इथे बºयाचदा खोलीनुसार नाही तर बेड नुसार पैसे आकारले जातात आणि ते देखील अव्वाच्या सव्वा! स्केअर फूटचा विचार केला तर याची तुलना नरीमन पॉईन्टशी व्हावी. बरं, इतके असूनही खोलीत सोयींच्या नावाने शंख! खेळती हवा आणि सूर्यप्रकाश दुर्मिळ. इतर सोयी विचारायलाच नकोत. बिनचूक निरीक्षण केल्यावर कळले की घर भाड्याने देणे हेच मुख्य उपजिवीकेचे साधन झाले आहे.  त्या अनुषंगाने, येथील अर्थकारण विनाकारण महागडे झाले आहे.  त्याची झळ कित्येक होतकरु विद्यार्थ्यांना बसते आहे याची जाणीव नाही त्यांना.   तरी उमेदवारांची उमेद काही कमी होत नाही. आधीही उमेद होतीच पुढेही राहिल.

'आउटलायर्स' या पुस्तकात '१०,००० अवर रूल'   सांगितला आहे, त्यानुसार प्रत्येक कामात यशस्वी होण्यास १०००० तास देणे , मेहनत करणे गरजेचे असते. राजेंद्र नगर मध्ये आले आणि इथल्या परीक्षार्थींकडे पहिले कि कळते त्याना हे दहा हजार तास वर्षभरातच पूर्ण करण्याची घाई असते . त्यासाठी ते काहीही किंमत मोजायला मागे पुढे पाहत नाहीत.  आणि गम्मत म्हणजे पूर्व परीक्षेच्या अधिसूचने पासून मुलाखती पर्यंत साधारण १४ महिने लोटतात- म्हणजे १०००० तास!
-अमित भोळे 
(लेखक केंद्र शासनात सनदी अधिकारी आहेत)

30 comments:

  1. आदरणीय सर,
    आपला लेख वाचला.. सनदी परिक्षेचेच नाही तर अगदी पहिल्या वर्गाचे शिक्षणही व्यावसायिक झालेले आहे..महागडे क्लासेस सर्वांना परवडणारे नाहीच. ह्या अशा महागड्या आणि व्यावसायिक शिक्षणामुळे ह्या संस्थांमधून यशस्वी झालेले उमेदवारसुद्धा व्यवसायिक दृष्टिकोन ठेवूनच सेवेत प्रवेश करतात. त्यामुळे त्यांच्या सेवाकाळावधीत ते जाणिवेतून प्रशासन करताना दिसून येत नाहीत आणि हीच आजच्या सनदी अधिकाऱ्यांच्याबाबतीत दुर्दैवाची गोष्ट आहे.
    अर्थात, ह्याला अपवाद ग्रामीण भागातील उमेदवार असतात.कारण ते जाणिवेतेतून शिक्षण घेऊन आलेले असतात आणि सेवेत आल्यावरही ती जाणीव त्यांच्यात कायम राहाते..
    आपल्या लेखात आपण शेवटी काय केलेत ते नाही सांगितलेत सर, आपल्या साळ्याला आपण ऍडमिशन घेऊन दिलीत की नाही?...😜😜😜

    ReplyDelete
  2. Mast. Readymade karkhana ahe. Nusate 10000 jari pakadale per year tari minimum 10000*45000=450,000,000 INR. Mhanaje 450 million income per year cha business ahe ha

    ReplyDelete
  3. Good article.
    It shows tireless efforts of students to become government officers.
    10000 Hrs study makes them enough capable to understand various issues quickly.
    This article will increase respect towards government officers in our mind and also it gives encouragement to those who wish to participate in competitive exams.

    ReplyDelete
  4. Superb article sir..nice memories... rajender nagar is a big business hub where thousands of upsc aspirants from all parts of country throng into to test their luck, but only a few able to taste the sweetness of success.

    ReplyDelete
  5. Superb Amit,
    So much of madness that nourishes this business of coaching classes.
    Eye opener to aspirants in general and upsc aspirants in particular.
    Fantastic Amit. 👍👍👍👌👌👌👌

    ReplyDelete
  6. Well said Amit, this actually is a realization for our Country about the scale of unemployment, population explosion and stability plus attractiveness of govt jobs , good of you to reflect on the issue, keep thinking and keep writing

    ReplyDelete
  7. Nice article and really article will increase respect towards officers

    ReplyDelete
  8. अमित जी....
    मृगजळाच्या मागे धावणाऱ्या हौशा-नौशांसह ऊपजत बुध्दीमत्ता आणि आत्मविश्वास असणाऱ्या प्रामाणिक होतकरू तरूणांना गिर्‍हाईक समजुन त्यांच्या आशावाद व ईच्छा शक्ती ला emotional black mail करणारे सौदागर दील्लीच्या गल्लीत बाजार मांडून कसा धंदा करत आहेत हे आपण चपखल शब्दात मांडले आहे.
    अमित जी...
    मी प्राध्यापक म्हणून 27 वर्षापासून ऊच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या मताशी मी सहमत आहे. आपला लेख सर्वसाधारण विशी ओलंडलेल्या तरूणांचा struggle आणि private class mentality to encash it दर्शविते. Unfortunately society in that location also take undue benifit of this situation in form of lodging , boarding and providing basic needs to this students.
    दिल्ली प्रमाणेच तेजीतला शिक्षण बाजार राजस्थान मध्ये कोटा, महाराष्ट्रात लातुरात, तेलंगणा मध्ये हैदराबाद आणि ईतर छोट्यामोठ्या शहरात जोरात चालु आहे. फक्त Target group वेगळा आहे. तेथे 11 वी , 12 वी चे class चा धंदा जोरात आहे.
    हे का घडत आहे याचा गांभीर्य पुर्वक विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याच्या नावाखाली आपली शिक्षण पध्दती सपशेल अपयशी ठरली आहे हे मान्य करावे लागेल. गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे म्हणून सामाजिक लढा ऊभारण्याची वेळ आली आहे. पालकांनी सुद्धा दुराग्रह सोडुन आपल्या पाल्याची कुवत ओळखुण त्याच्या आवडी नुसार शिक्षण घेण्याची मोकळीक दिली पाहिजे.
    आपला लेख आवडला...लिहीत चला...

    ReplyDelete
  9. Excellent observations Sir,
    The point that the fees of coaching class is increased by times in 15 years is an indicator of indiacator commercialisation of education,this trend is taking education and opportunities away from poor n vulnerable.
    Keep writing sir.

    ReplyDelete
  10. प्रिय अमित जी,
    आपण देशाच्या राजधानीतील विशिष्ठ ठिकाणी स्पर्धा परीक्षा व त्याच्या भोवतीची व्यावसायिकता स्वानुभव व निरीक्षणातून उत्तमरीत्या मांडलीये.'जे खपत त्याची उत्तम मांडणी करून त्याच अधीक महत्व वाढवण्याच तंत्र व त्याला बळी पडणारे ग्राहक' हे साधं व्यवसायीक तत्व यामागे आहे. आपण प्रातिनिधीक उदाहरण मांडलंय हे चित्र पुण्यातही आहे व थोड्याफार फरकाने देशातील अन्य राज्यातही असेल हे नाकारता येत नाही.आपल्या सारख्या व्यक्ती ज्यांचा या क्षेत्रात अधिकार आहे(स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व त्यातील यश या विषयक अधिकार)त्यांनी या विषयी जागरूकता करण्याची गरज आहे.या लेखाच्या सुरुवातीला आपण उल्लेख केल्या प्रमाणे बायकोचा भाऊ त्याला योग्य मार्गदर्शन करून या व्यावसायिक जंजाळातून बाहेर काढता आले तर ती उत्तम सुरुवात ठरेल असे वाटते.बाकी एका उत्तम कार्याची सुरुवात प्रत्येकाने केली की मग 'ज्योत से ज्योत जलाते चलो' किंवा 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्ती प्रमाणे निश्चितच सुपरिणाम दृष्टीपथास पडतील यावर माझा विश्वास आहे.

    ReplyDelete
  11. अमित छान लेख...
    तू पण या परिस्थिती मधून गेला असल्यामुळे या लेखाला एक वेगळीच सत्याची धार आली आहे.
    स्वप्ना पेक्षा वास्तव हे भयानक असतं आणि ते कधी कधी अंगावर येतं.
    अगदी मोजकीच लोक ही परीक्षा उत्तीर्ण होऊन यशाची चव चाखतात आणि सनदी सेवेत प्रवेश करतात.
    पण जी लोक ही परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत ती लोक काय करतात आणि जीवनात पुढे कसे यशस्वी होतात हा पण एक माझ्या औत्सुक्याचा विषय आहे.
    कधीतरी यावर पण लिही कारण तुला पण ही लोक माहिती असणार.
    उत्तम आणि अभ्यासू लेखाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन

    आनंद कऱ्हे

    ReplyDelete
  12. Good article and very well articulation..Amit keep writing..

    ReplyDelete
  13. अमित - सत्य परिस्थिती. पण आपण यात परिवर्तन कसं करणार? आपण दिल्लीतले अधिकारी मिळून यात काही बदल घडवूयात

    ReplyDelete
  14. पुण्यात पण असे कारखाने आहेत, CA चा एक 3 मजली क्लास आहे, एका मजल्यावरlive क्लास चालतो इतर 2 वर त्याचे webcast होते, एका batch ला 600 , 2 महिन्याचा क्लास, प्रत्येकी 20000, jaudya कैल्कुलेशन नको करू,आपण tevhadech करू शकतो,
    पुण्यात औद्योगिक कारखाना पेक्षा शैक्षणिक जास्त आहेत, दिल्ली पेक्षा

    ReplyDelete
  15. Reality nice article but some points missing

    Like Brokers

    Landlords and their charges

    Economy flourished by these classes in that area

    Swanand

    ReplyDelete
  16. You have explained very true fact.Everywhere there same senario .not only in classes,in colleges, schools same senario is observed.

    ReplyDelete
  17. Very true. Captures the current scenario very aptly.
    I believe that even after all this struggle , what one gets after clearing the exams - is even more struggle! It forms a vicious cycle and somewhere one tends to accept a sub optimal level of satisfaction.
    It would be interesting to know what is the scenario in other countries - with respect to level of competition, resources and other kind of adminstrative support that is being extended to aspirants from various sources. Maybe, we can draw inspiration from some of them :)

    ReplyDelete
  18. Very true..now a days education has become business only and Delhi hub for UPSC and Kota for IIT. Student spent important years of their life in these places but very few get success and others end up waisting money and important years of their life. Your article has come out very well...Hope people learn something from it and plan differently... Keep writting abd best wishes...

    ReplyDelete
  19. Superb description...your article made me nostalgic...and recollected almost similar experience in 1993....It was a Mad,Crazy ,commercial Business then..and the situation has worsened over the years..Thanks for highlighting the immense efforts by the youth in becoming the Steel Frame of Administrative machinery..Candid and simple style of writing..Keep writing

    ReplyDelete
  20. Nice article amitrao...and will also request you to show the other side...the lacks of candidates not clear the exam...what happen to them

    ReplyDelete
  21. The IIT JEE preparation factories are even more scary. Nowadays students are targeted right from Class 5.

    ReplyDelete
  22. बहुत बढ़िया सर।

    ReplyDelete
  23. Sir, this one has nostalgic effect. I remembered my own days there in ORN, how i started there and how I lived there. You have wonderfully wrote about the recent changes there.
    But, I also wanted to read more about it. If possible do write next part. May be that will fulfill my hunger. :)

    ReplyDelete
  24. So well written..marketization of every thing..upsc classes are no exceptions...wonder what happens if one can't afford...shud thr be some seats for such talented students but can't afford class

    ReplyDelete
  25. This is the reality, very well written.

    ReplyDelete

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...