RTI आणि देव


            किती छान झालं असतं जर देवालाही RTI मधे प्रश्न विचारता आले असते? "मीच का","असं माझ्यासोबतचं का होतं?" अशा वैश्विक प्रश्नांना काहीतरी दिशा मिळू शकली असती. हल्ली निव्वळ एका कागदाच्या आधारावर सोबत दहा रुपयाचा धनादेश जोडून सामान्य माणसाला जे हत्यार RTI Act ने दिले आहे त्याची महिमा कही औरच आहे. कोणी सरकारी बाबू जास्त माजला असू देत वा यंत्रणेने स्वप्नांचा चुराडा केला असूदेत किंवा नुसतचं जळखावू का कुत्सित/विक्रुत मनोव्रुत्तीने हतबल होवून कोणीही अगदी कोणीही (किंवा अनेकदा काल्पनिक कोणीही) संपूर्ण कार्यालयाला कामाला लावू शकते. आपण देवाला आणि त्याच्या दैवालाही असे आपल्यासाठी कामाला लावायला पाहिजे.
                     
                खरचं देवादरबारी RTI लागू झाला तर कित्येक रिकामी मने सक्रिय होतील. मग दहा रुपये किंवा त्याहून कमी अगदी रुपयाही चालेल देवळातल्या हुंडीत, चर्चमधल्या वा मस्जिदीतल्या दानपत्रात टाकायचा आणि मनोमन RTIची बेल वाजवायची आणि प्रश्न विचारायचा.  Bruce Almighty मध्ये ज्याप्रमणे Bruceला देवपण प्राप्त झाल्यावर विश्वभरातून प्रार्थना E-mailमध्ये आल्या होत्या अगदी तसही काहीसं चालेल. नाही तर हल्ली नाही का सरकारी कार्यालयात RTI Cell वा पोस्ट ऑफीसात RTI Help वा संकेतस्थळावर RTI  बद्दल मसूदा अशी स्वतंत्र निर्मिती झाली आहे तसं सार्वधर्मिक एखादं 'RTI प्रार्थनालय’ पण उभारणे शक्य आहे.
मग एकदा काही माहीती एखाद्या भक्ताने विचारली तर ठरावीक कालावधी नंतर या RTI केंद्रातून भक्ताला देवदरबाराचे उत्तर कळवावे. हे उत्तर अगदी वैयक्तिक माध्यमातून देण्यात येईल. जसे ’माझ्या बंड्याला बारावीत फेल का केले?’ याचे उत्तर म्हणून बंड्याच्या आईला बंड्याच्या फोनमध्ये त्याच्या गर्लफेंडचा मेसेज वाचण्याचा योग आणायचा असा ताळमेळ या RTI केंद्राकडून करण्यात यावा. मिळालेले उत्तर पाहून समाधानी नसल्यास Appellate Authority कडे अपील करता येते. मात्र देवानेच उत्तर दिल्यावर त्यानंतर कोणाकडे अपील करणार?

                 ज्याप्रमाणे RTI Application लिहिताना लिहिणारा मुद्देसूद नसेल तर जबाबही उडवाउडवीचाच मिळतो. देवदरबारी तर याची विशेष काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणे देवाला काहीही विचारून हैराण केले तर तो अधिक हैराण करणारे उत्तर देईल. Boss holidayला का कामावर बोलवतो असे काही विचारले तर न जाणो देव उत्तर म्हणून  6 days week करायचा!

                      जसे प्रस्थापितांना जबर हादरा देवून त्यांची नशा (काही वेळ नी प्रमाणात) उतरवण्याचे काम RTI करत असेल तर देवालाही आपल्याकडे आता लक्ष द्यायची वेळ आली आहे हे सांगण्याचे काम ते करू शकते. त्याचबरोबर जबाब मागणाऱ्याचेदेखील डोळे उघडून त्याला लाईनीवर आणण्यात देव मागेपुढे पाहणार नाही.
आजही आपण देवाला या ना त्या प्रकारे साकडे घालतो. नमस्कार करून मंदिरात ११ रुपये चढवतोच (अरेच्चा IPOसाठी पण पोस्टात ११ रुपये घेतात म्हणे) तेव्हा RTI ची ही कल्पना केवळ institutionalization म्हणता येईल. एकंदरीत आपल्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या नको नको त्या विचारांना याRTI द्वारा वाट मोकळी करून आपल्याला पुन्:ष्च् हरिओम करण्यासाठी ही देवाला RTI मध्ये ओढण्याची कल्पना जबर आहे. 

(प्रेरणास्थान: आपण RTI मध्ये कोणाकोणाला प्रश्न विचारुन आपल्याइतकेच हैराण करू शकतो असे विचार करण्यास भाग पाडणारे उ.प्र. विद्युत विभागात काम करणारे सर्व कर्मचारी)

(तळटीप: RTI activists आणि विजीगीषू अभ्यासकांना नम्र विनंती की RTI Act मध्ये प्रश्न नाही तर माहीती मागता येते असा  technical अभिप्राय  देण्याचा मोह  आवरला तर जस्तीत जास्त रसिकांपर्यंत ही कल्पना पोहचू शकते)

कोशिश

दो कदम हम चाले तो ऐतराज ना करो
हमसे है यह सफर हमे नाराज ना करो

कश्ती को   किनारे कम नही
किनारोसे कश्ती है कश्तीसे किनारे  नही
ऐसे तो तुम अंजाम न करो

राहीको मिल ही जाती है मंजिले
हर चौराहेको मंजिल बनाते चलो
हर मंजिल से  बने सफर, हर सफर से जिंदगी
मंजिल ही जिंदगी है ऐसे तो तुम  आगाज ना करो



बस यू ही...

कदम मेरे यूही नही डगमगाए
धोखा तो नज़र दे गयी

तीन तिघाडा

मी अंधश्रद्धाळू नाही. मी बुद्धीप्रामाण्यवादीदेखील नाही. म्हणजे अस्सं की मांजर आडवी गेली म्हणून मित्रांना भेटायचं मी टाळत नाही. तसेच त्याच मित्रांसोबत प्यायला बसल्यावर तीन पेग झाले की ’तीन तिघाडा काम बिघाडा’ यावर विश्वास ठेवत चौथा पेग घायचं पण टाळत नाही.

या"तीन" संज्ञेची कमालच आहे बाकी. तीनाला आपण् गॄहितच् धरलेल्ं नाही का? वर्गात पहिला कोण आला हे कळताच दुसरा कोण हे विचारतो. किती  marks चा फरक हे पण विचारतो मात्र तिसरा कोण काय आपल्याला काहीही घेणेदेणे नसते. अगदी पुळका येवून विचारलच आणि समोरच्यालाही ते माहिती असंलच तर ते कळताच विसरूनही जातो.

Career निवडतानाही तसचं. "मी engineering ला admission घेणार, नाही तर मेडिकल","दोघंही नाही झालं तर तिसरा पर्याय?" "मग पाहू BSc, BCom किंवा  BA ही.  म्हणजे पर्यायतला तिसरा पैलू अनिश्चितच. 
आपण एकटे असतो तेव्हा मजा करतो. दुकटे झाल्यावर जोडीने हिंडतो, मज्जा करतो. मात्र दोघांत तिसरा आल्यावर? यचे नाक बापावर, डोळे आईवर,रंगपण आईवर असे तर्क करून मग राजकारण  सुरू होते. तिसर्‍याच्या आगमनानंतर अजुन बरचं काय काय होतं. नकळतपणे तिसरा ठरतो उपरा.

नुकतेच टी.व्ही.वर ’धूम-३’चे ट्रेलर प्रदर्शित झाले. उगाच फुटकळ बॉलीवूड चर्चेतून मग त्यावर  पहिल्या दोन भागांसोबत तुलनात्मक अपेक्षांचे ओझे टाकण्यात आले. इतकेच नाही तर हॉलीवूडमध्ये ज्या ज्या चित्रपटांचे तीन-चार भाग आजपावेतो निघाले त्यांचेही दाखले मिळतात. बिचारा तिसरा धूम ठोकायला तयार!
खरे तर आपल्या अंतर्मनालापण तिसरं काही नकोच असतं. "नाण्याच्या दोन बाजू","दोन दोन हात","दोनाचे चार" असे शब्द आपण कितीतरी वेळा वापरतो. आपल्याला कळत पण नसते की आपण ’तीना’ला चार हात लांब ठेवत आहोत. जर ’तीन’ हा केवळ एक अंक नसून व्यक्ती असला असता तर समजातील उपेक्षित लोकांत गणला गेला असता हे नक्की.

सांत्वनास्पद आपणही या तीनासाठी केले आहेच की ’पळसाला पाने तीनच’,’तीन तिघाडा काम बिघाडा’, ’त्रिकुट’,’प्रेमाचा त्रिकोण’ अशा नकारात्मक बोचणारे दोन चार संधर्भ आपण बाळगले आहे. एवढचं नाही तर ऑलिंपिक सारख्या स्पर्धांत Bronze पदकांवर तिसर्‍याचा हक्क देवून आपण ’तीना’ला गौरविले आहे.

ही झाली एक बाजू,दुसरी बाजू ही की तीनानेही आपल्यावर चांगला सूड उगवला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ते कळतही नाही. कोणत्याही दोन व्यक्ती, गोष्टी आपण सहज compare करू शकतो आणि एकापेक्षा दुसरी श्रेष्ठ वा कनिष्ठ हे ठरवू शकतो. हिच तुलना जर दोन ऎवजी तिघांत केली तर मत्र आपली चांगलीच तारांबळ उडते. सचिन श्रेष्ठ की ब्रडमॅन यांवर चर्चा होवू शकते मात्र सचिन, ब्रडमॅन, लारा यांच्यात तुलना केली तर एकमत  तर होणार नाहीच मात्र चर्चेत इतिहास, भूगोल, तापमान, हवामान, पीच, विकेट अशा अनेक बाजू येतील. तसेच कोणी अंधश्रद्धाळू वा बुद्धीप्रामाण्यवादी हे ठरवणे जितके सोपे तितकेच कठीण या दोहोंव्यतिरिक्त तिसरे कोणी व्यस्ततावादी आहे हे ठरविणे. असे अनेक दाखले देता येवू शकतात.

खरंच, तीन जितका गोंधळ घालू शकतो ते कोण्या एकट्या-दोघांचं काम नाही. 

ती

कधी ती शाळेत होती
कधी कॉलेजात
कधी ती होती सणासूदीत
कधी होती वॉलेटात

कोणाचेही बंधन तिला नसे
ना कोणाची चिंता
तिलI नसे कोण्या दुसर~या जगाची खंत

स्वच्छंदी सायकलीवर रमत असे
छोट्या कपट्यांना जमवून नवीन आकार
साकार करत असे
सरस्वतीने दिलेल्या आशीर्वादाने
तिच्या कलागुणांना अधिकच वाव दिला

आज मात्र ती उरलीये केवळ बातम्यांत
न्यूज चॅनलच्या अंधूक आक्रुतीत
जनतेच्या हळहळीत आणि
उरलीये निव्वळ बिभत्स चर्चेत

एक निर्भया होती
आता काय काय नावं शोधणार
तुम्हीपण?
बघा, कोणी तुमच्या परिचयाचं नाव तर नाही
ठेवलय तिला?

किती दिवस आपण अस्स
हायसं वाटून घेणार आहोत?
बरं झालं ही कोणी दुसरी आहे अस्सं
म्हणत किती दिवस स्वःतला भाग्यवान मानणार आहोत?

विषयाला चघळत राजकारण्यांना
शिव्याशाप देण्यातच धन्यता मानणार आहोत?
मनातल्या विझलेल्या मशालींना
इंधन घालण्याचं कधी पर्यंत टाळणार आहोत?

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...