I for Eye!

 सध्या माझे भाषेवरील प्रयोगाचे दिवस सुरु आहेत. माझी लहानगी दोन वर्षांची आहे. ती सध्या नवनवीन शब्द, शब्दरचना या अनुषंगाने भाषा शिकते आहे. गमतीदार किस्स्यांसोबतच एक पालक म्हणून मला आणि माझ्या पत्नीसाठी एक learning experience आहे

            चोम्स्की, स्योसूर  सारख्या भाषातज्ञांचा माझा ओझरता परिचय असला तरी अनुभवाअंती असे म्हणता येऊ शकते की भाषा आत्मसात करणे हा दर वेळेस एक Unique  अनुभव असावा. रिद्धी (माझी लहानी) अनेकदा खूप मोठे मोठे वाक्य बडबडत असते. त्यात तिच्या शब्दकोषातले सर्व शब्द धडाधडा एकापाठोपाठ येतात. कशाचा कशाशी संबंध नसतो केवळ व्यक्त करण्याची उत्कट इच्छा असते. भाषा ही केवळ शब्द, व्याकरण यांच्या गुंफणीतील सूत्रबद्ध रचना नसून Emotions (भावना)  यामागे एक मोठा आधार असतो. "चला" या शब्दामागे कोणती भावना आहे हे त्याचे उच्चारातून कळते. रिद्धी ला "चला" म्हटलं  की कसं  कळतं  बाहेर फिरायला जायचयं आहे की अंघोळीला जायचंय? कुणी म्हटलंय की लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला जसा आकार द्याल तसा तो घडतो. त्यांच्या भाषाविष्काराचेही तसेच असते. काहीही कळणाऱ्या बाळाला काय समजणार कोणती भाषा मराठी? कोणती इंग्रजी? आम्हा नवरा-बायकोला पहिलं बाळ झालं तेव्हा कित्येकांनी सांगितले की हिच्याशी लहानपणापासून इंग्रजीत बोला म्हणजे तिचे इंग्रजी "चांगले" होईल पण माझा या वैचारिक अधिष्ठानाला विरोध आहे. आपण एक भाषा चांगली शिकली की दुसरी आपोआप येते. आपण मोठे झालो की कंटाळा करतो एवढचं .  लहानगे  त्यामुळेच  नवनवीन भाषा शिकू शकतात.  एका अभ्यासानुसार वयाच्या पहिल्या 48 महिन्यांपर्यंत आपण जे शब्द जसे शिकतो (किंवा ऐकतो) तेच आपल्या भाषाकोषामध्ये छापले जातात.  म्हणूनच कदाचित काहींमध्ये "" चा "" किंवा " " चा " " होणे, हे पाहता येते. 

माझी पत्नी एकदा काळजीने मला म्हणाली, "रिद्धी आंघोळीच्या वेळी टबातलं पाणी पिते".  तिची काळजी योग्य असली तरी त्याची कारणमीमांसा केली तर लक्षात आले मुलं शब्दाला वस्तुनिष्ठपणे शिकत असतात.  जसं "पाणी पी" म्हटलं की त्यांना कळतं पाणी पिण्यासाठी असते मग आंघोळीसाठी घेतो त्याला पण पाणीच म्हणतात हे त्यांना सांगणे अवघड!  तसंच झोपताना तिला आम्ही म्हणतो, "Eyes closed" आणि असंच कधी अगोदर Eyes म्हणजे डोळे हे तिला शिकवले होते नंतर अगदी शहाणपणा करीत आणि तिची भाषेसोबतची गंमत पाहता मी तिला वेगवेगळे शब्द शिकलो शिकवू लागलो.  घरात भारताचा नकाशा आहे त्याकडे बोट दाखवत म्हटलो, "India....I..N..D...I..A.. काय? I... " असं म्हणतो न म्हणतो तोच तिने डोळ्याला बोट लावलं आणि म्हणाली "Eye " तसंच एकदा मस्ती करताना ओरडलो "बचाव बचाव" तर तिने चक्क चावा घेतला कारण तिला 'चाव' म्हणजे काय हे माहित आहे.

भाषा आत्मसादीकरणाचे दोन पैलू लहान मुलांमध्ये पाहता येतात. एक म्हणजे आपण जे शिकवू ते तसंच्या तसं बोलण्याचा प्रयत्न करतात त्या त्या गोष्टींचा सांगितला तसा अर्थ लावत असतात. Apple ला एप्पल म्हणणे हा त्यातलाच प्रकार. आणि दुसरा म्हणजे आपसूकच मुले जे शिकतात ते. रिद्धी ला जेवताना एकदा म्हटले "खाली बैस मांडी मार" ती चटकन बसली आणि स्वतःच्या मांडीवर एक चापट मारली.  आम्ही नवरा-बायको थक्क झालो. 

लहान मुलांची जडणघडण अर्थात भाषेद्वारा होत असते. त्यांचा 'What 'पासून 'Why' पर्यंत चा प्रवास अत्यंत रोमांचकारी असतो. एक पालक म्हणून म्हणून मग आपला काय role असावा आपण केवळ अक्रिय (निष्क्रिय नव्हे ) बघे न राहता त्यांच्या प्रवासात त्यांचा नेव्हीगेटर म्हणून त्यांचे विमान त्यांनाच उडवू द्यावे. कारण कितीही झाले तरी पालकांच्या हालचाली , क्रिया त्या मातीच्या गोळ्याला प्रेरणादायी असतात आणि त्यांनी पाडलेले ठसे भाषेतून सहजासहजी मिटत नाहीत.  भाषा विकासाची वाट ही एक एका लहानग्या साठी थेट चढण नसून तो खाच-खळगे असणारा एक डोंगर आहे यावर कोणतीच एक ठराविक पाऊलवाट नाही ती लहानीला स्वतःच शोधायची आहे.  आपण निव्वळ हात धरू शकतो हे आम्हा नवरा-बायकोला नीट उमगले आहे. 
-अमित भोळे


स्वातंत्र्याचं मृगजळ


Published today(14th August, 2018) in Maharashtra Times, Mumbai Edition.

Please give feedback in comments. Thanks.


I am no claustrophobic

claustrophobic हा किती tongue twisting शब्द आहे. अगदी लक्षात न ठेवण्याजोगा. पण तरीही जेव्हा मी लिफ्ट मध्ये शिरतो त्यावेळी या शब्दाची आठवण होते. मी काही बंद जागांना घाबरणाऱ्यातला नाही. (निदान मला जाणणाऱ्याकरीतातारी) मात्र 'लिफ्ट-एक अद्वितीय अनुभव' याला मी माझा PhD विषय नक्कीच बनवू शकतो.

मला अजूनही आठवते माझ्या बाबांसोबत मी लहान असताना हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा ते मला एका चिंचोळ्या खोलीत घेवून गेले. तेथे आधीच २-४ वार्डबॉय समक्ष लोक उभे होते. मावेल असा एक स्ट्रेचरदेखील होता. माझे बाबा त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते तेव्हा मी त्याना विचारले " हे ऑपरेशन थिअटर आहे का?" त्यांनी नाही सांगितले आणि शिस्तीत त्यासर्वांसोबत मलाही उभे ठाकले. समोरचा जाळीचा दरवाजा बंद झाला आणि गुरुत्वाकर्षणाला डावलत पोटातल्या वारांभाताला धक्का देत आम्ही उचललो गेलो. काही कळण्याआधीच ती सबंध खोली हलायची थांबली आणि जाळी उघडताच आम्ही बाहेर पडलो. मी परत बाबांना विचारले "थिअटर होते का ते?" तर बाबा म्हणाले, "लिफ्ट होती." नंतर मी अनेकदा लिफ्टमध्ये चढलो असेन मात्र काही उल्लेखनीय निरीक्षणांची नोंद न करणे माझ्यातल्या नवख्या Bloggerला शक्य नाही. 

मुंबईतल्या विक्टोरियन बिल्डींगमधल्या लोकलच्या आवाजाला सलाम ठोकणाऱ्या मोडकळलेल्या उघड्या लिफ्ट पासून दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच युरेका टोवेर्सच्या ८८ मजले निव्वळ ३८ सेकंदात सुसाट वेगाने पार करणाऱ्या अत्याधुनिक लिफ्टपर्यंत अनुभवलेला प्रत्येक लिफ्टप्रवास स्वत: एक अनोखा आहे.

लिफ्ट ही एक सुविधा असते. जिन्याचा त्रास वाचवण्यासाठीचा पर्याय असते. आमच्या होस्टेल मधली लिफ्ट मात्र ठराविक वेळेतच चालायची. का तर म्हणे शिस्त. कसली डोम्बाल्याची शिस्त? त्यात अजून भर तर काय, की पहिले दोन माळे लिफ्ट थांबणार नाही. हे म्हणजे अतीच ! नेमकी माझी रूम दुसऱ्या माळ्यावर, कित्येकदा तर मी तिसऱ्या माळ्यावर जायचो लिफ्टसाठी. असो, असे असले तरी काही म्हणणे नाही, पण जर दुसऱ्या मजल्यावरच्या उपऱ्यांना लिफ्टची सुविधा नाही तर मग त्रास पण नको नं? प्रत्येक वेळेस लिफ्टचा दरवाजा उघडला की ती irritating tune सबंध होस्टेलला ऐकू जायची. तेव्हा पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्यांना अधिक त्रास होई.

ह्या लिफ्टच्या ट्यूनची पण गंमतच असते.  एकदा जेव्हा मी नवीन नोकरीच्या ठिकाणी नरीमन पॉइन्टच्या बहुमजली इमारतीत गेलो तेव्हा तो लिफ्टमन आणि मी आम्ही दोघेच लिफ्टमध्ये होतो. लिफ्ट सुरु होताच सुंदर संगीत कानी पडले. मला वाटले ह्या लिफ्टमन कडे मोबाईलपण आहे? त्याकाळी मोबाईल आजइतका सर्रास वापरला जात नसे. मीच स्वत:ला म्हटले होते की पहिल्या पगारात पाहू आणि ह्याच्या जवळ मोबाईल...मग नरीमन पॉइन्ट, आलिशान, Financial Capital of India असे विचार मनात येत होते तितक्यात लिफ्ट थांबली आणि ट्यूनपण थांबली. मला कळले की ती लिफ्ट होती मोबाईल नाही. निदान याची जाणीव झाली की होस्टेलच्या कर्कश भसाड्या आवाजापेक्षा इथली बंदिस्त खोली जास्त संगीतमय आहे.

MBA करताना एक गोष्ट ऐकली होती. म्हणे कुण्या एका businessman ने त्याच्या ऑफिसमध्येएक लिफ्ट लावण्यासाठी Japanese इंजीनीअरला बोलावून सांगितले की मला सर्वात वेगवान लिफ्ट बनवून दे. Japanese तंत्रज्ञानाचा पाऊस पाडत त्याने मग तसे केले देखील पण ह्या पठ्ठ्याचं समाधान काही होईना. अखेर त्या Japanese ने त्या लिफ्ट मध्ये म्हणे आरसा लावला आणि businessman ला लिफ्ट विगावान वाटू लागली. आजही आरशात पाहत असलो तर कळतपण नाही मजला केव्हा आला ते.

लिफ्टमधल्या अशाच अचाट उपकरणांपैकी एक जोडी म्हणजे लाईट नी पंखा. मला अलीकडच्या Automatic लिफ्ट मधल्या या उपकरणांचे नवलच वाटते. म्हणजे यांना कसं कळतं आत लोक आहेत आता आपण सुरु व्हावं? मी तर उगाच दोनेकदा तळमजल्यावरून Top Floorचं बटन दाबलं आणि चटकन बाहेर पडलो. म्हटलं पाहावं काय होतं? काय झालं ते आजपर्यंत समजलं नाहीय. असो.

केवळ वर खाली करण्यापलीकडे लिफ्ट अजून इतरही कार्य करत असते. अलीकडच्या टीवीवरील जाहिराती पहिल्या तर कळते की लिफ्ट मध्ये चित्रित जाहिरात फिटनेस ड्रिंक ते दारूच्या नावाच्या music CDs पासून detergent, perfumeपर्यंत काहीही विकण्याची ताकत या लिफ्ट मध्ये असते. कारण कदाचित लिफ्ट हा खरच एक अद्वितीय अनुभव असतो जो अगदी नकळत पणे व्यक्तिगत बनतो. लिफ्ट चे अनेक प्रकार असतात. mall मधली प्रशस्त, airport वरील modern, हॉटेल्स मधली पारदर्शक दरवाज्याची, Factory वैगेरे मधील दणकट नी अगडबंब असे असले तरीही लिफ्ट एक "leveler" आहे. इथे अबालवृद्ध, श्रीमंत गरीब, पिऊन-साहेब सगळ्यांचे उत्थापन सोबतच होत असते. लिफ्ट कोणताही भेदभाव करत नाही. ही बंदिस्त खोली खरच मनाने मोठी आहे. 


Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...