सध्या माझे
भाषेवरील प्रयोगाचे
दिवस सुरु
आहेत. माझी
लहानगी दोन वर्षांची आहे. ती सध्या
नवनवीन शब्द,
शब्दरचना या अनुषंगाने भाषा
शिकते आहे. गमतीदार किस्स्यांसोबतच
एक पालक
म्हणून मला आणि माझ्या
पत्नीसाठी एक learning experience आहे.
चोम्स्की, स्योसूर सारख्या
भाषातज्ञांचा माझा
ओझरता परिचय
असला तरी अनुभवाअंती असे म्हणता येऊ शकते की भाषा आत्मसात
करणे हा दर वेळेस
एक Unique अनुभव
असावा. रिद्धी
(माझी लहानी)
अनेकदा खूप मोठे मोठे
वाक्य बडबडत
असते. त्यात
तिच्या शब्दकोषातले
सर्व शब्द
धडाधडा एकापाठोपाठ
येतात. कशाचा
कशाशी संबंध
नसतो केवळ
व्यक्त करण्याची
उत्कट इच्छा
असते. भाषा
ही केवळ
शब्द, व्याकरण
यांच्या गुंफणीतील
सूत्रबद्ध रचना
नसून Emotions (भावना) यामागे
एक मोठा
आधार असतो.
"चला" या
शब्दामागे कोणती
भावना आहे हे त्याचे
उच्चारातून कळते.
रिद्धी ला "चला" म्हटलं की कसं कळतं बाहेर
फिरायला जायचयं
आहे की अंघोळीला जायचंय?
कुणी म्हटलंय
की लहान
मुलं म्हणजे
मातीचा गोळा
असतो त्याला
जसा आकार
द्याल तसा तो घडतो.
त्यांच्या भाषाविष्काराचेही
तसेच असते.
काहीही न कळणाऱ्या बाळाला
काय समजणार
कोणती भाषा
मराठी? कोणती
इंग्रजी? आम्हा
नवरा-बायकोला
पहिलं बाळ झालं तेव्हा
कित्येकांनी सांगितले
की हिच्याशी
लहानपणापासून इंग्रजीत
बोला म्हणजे
तिचे इंग्रजी
"चांगले" होईल
पण माझा
या वैचारिक
अधिष्ठानाला विरोध
आहे. आपण एक भाषा
चांगली शिकली
की दुसरी
आपोआप येते.
आपण मोठे
झालो की कंटाळा करतो
एवढचं . लहानगे त्यामुळेच नवनवीन
भाषा शिकू
शकतात. एका अभ्यासानुसार वयाच्या
पहिल्या 48 महिन्यांपर्यंत आपण जे शब्द
जसे शिकतो
(किंवा ऐकतो)
तेच आपल्या
भाषाकोषामध्ये छापले
जातात. म्हणूनच
कदाचित काहींमध्ये
"र" चा
"ल" किंवा
"ळ " चा
"ड " होणे,
हे पाहता
येते.
माझी पत्नी एकदा काळजीने मला म्हणाली,
"रिद्धी आंघोळीच्या वेळी टबातलं पाणी पिते". तिची काळजी योग्य असली
तरी त्याची कारणमीमांसा केली तर लक्षात आले मुलं शब्दाला वस्तुनिष्ठपणे शिकत असतात.
जसं "पाणी पी" म्हटलं की त्यांना कळतं पाणी पिण्यासाठी असते मग आंघोळीसाठी
घेतो त्याला पण पाणीच म्हणतात हे त्यांना सांगणे अवघड! तसंच झोपताना तिला आम्ही
म्हणतो, "Eyes closed" आणि असंच कधी अगोदर Eyes म्हणजे डोळे हे
तिला शिकवले होते नंतर अगदी शहाणपणा करीत आणि तिची भाषेसोबतची गंमत पाहता मी तिला
वेगवेगळे शब्द शिकलो शिकवू लागलो. घरात भारताचा नकाशा आहे त्याकडे बोट दाखवत
म्हटलो, "India....I..N..D...I..A.. काय? I... " असं म्हणतो न म्हणतो
तोच तिने डोळ्याला बोट लावलं आणि म्हणाली "Eye " तसंच एकदा मस्ती करताना
ओरडलो "बचाव बचाव" तर तिने चक्क चावा घेतला कारण तिला 'चाव' म्हणजे
काय हे माहित आहे.
भाषा आत्मसादीकरणाचे दोन पैलू लहान मुलांमध्ये
पाहता येतात. एक म्हणजे आपण जे शिकवू ते तसंच्या तसं बोलण्याचा प्रयत्न करतात त्या
त्या गोष्टींचा सांगितला तसा अर्थ लावत असतात. Apple ला एप्पल म्हणणे हा त्यातलाच
प्रकार. आणि दुसरा म्हणजे आपसूकच मुले जे शिकतात ते. रिद्धी ला जेवताना एकदा
म्हटले "खाली बैस मांडी मार" ती चटकन बसली आणि स्वतःच्या मांडीवर
एक चापट मारली. आम्ही नवरा-बायको थक्क झालो.
लहान मुलांची जडणघडण अर्थात भाषेद्वारा होत
असते. त्यांचा 'What 'पासून 'Why' पर्यंत चा प्रवास अत्यंत रोमांचकारी असतो. एक पालक
म्हणून म्हणून मग आपला काय role असावा आपण केवळ अक्रिय (निष्क्रिय नव्हे ) बघे न राहता
त्यांच्या प्रवासात त्यांचा नेव्हीगेटर म्हणून त्यांचे विमान त्यांनाच उडवू द्यावे. कारण
कितीही झाले तरी पालकांच्या हालचाली , क्रिया त्या मातीच्या गोळ्याला प्रेरणादायी असतात
आणि त्यांनी पाडलेले ठसे भाषेतून सहजासहजी मिटत नाहीत. भाषा विकासाची वाट ही
एक एका लहानग्या साठी थेट चढण नसून तो खाच-खळगे असणारा एक डोंगर आहे यावर कोणतीच एक
ठराविक पाऊलवाट नाही ती लहानीला स्वतःच शोधायची आहे. आपण निव्वळ हात धरू
शकतो हे आम्हा नवरा-बायकोला नीट उमगले आहे.
-अमित भोळे
Very true ..children are very good at observations u don't have to teach them for learning ..they learn on their own..they learn words firtst and then learn to give meeting to it with reference to context..it's indeed a beautiful thing
ReplyDeleteExcellent Amit..Agree with your observations..
ReplyDeleteVery well written Amit! Keep it up..
ReplyDeleteChhan sir . Waiting for next episode
ReplyDeleteमित्रा, मी देखील मुलाच्या बालपणाच्या शब्दांची डिक्शनरीच बनवली हाेती... मज्जा लहान मुलांच्या भावना व शब्द यांना जुळवतांना...
ReplyDeleteमम्मी ला मिम्मी बिस्किट ला डिटीट... तिच्या शब्दांना तिच्याच विचारांसाेबत फुलू.द्या... माझा आशीर्वाद.
मित्रा, मी देखील मुलाच्या बालपणाच्या शब्दांची डिक्शनरीच बनवली हाेती... मज्जा लहान मुलांच्या भावना व शब्द यांना जुळवतांना...
ReplyDeleteमम्मी ला मिम्मी बिस्किट ला डिटीट... तिच्या शब्दांना तिच्याच विचारांसाेबत फुलू.द्या... माझा आशीर्वाद.
मित्रा, मी देखील मुलाच्या बालपणाच्या शब्दांची डिक्शनरीच बनवली हाेती... मज्जा लहान मुलांच्या भावना व शब्द यांना जुळवतांना...
ReplyDeleteमम्मी ला मिम्मी बिस्किट ला डिटीट... तिच्या शब्दांना तिच्याच विचारांसाेबत फुलू.द्या... माझा आशीर्वाद.
मराठी भाषेतील लेखणीतील पगल्भता वाचत आसताना भाषेतील बाणेदारपणा अधोरीखीत करे.सुक्ष्म परिक्षण व त्यावर करण्यात आलेल सखोल व दिर्घ वैचारीक विश्लेषन हे वाचत आसताना एक वास्तवता मनावर कोरुन जातं.
ReplyDeleteNeoModern Writing च्या दुनीेत आज हि लिखानाची शैली आज फार पहायला मिळत नाही��
अमित जी, अगदी नेमकं आणि अचूक निरीक्षण !
ReplyDeleteछान लिहिले आहे.
मी सुद्धा ब्लाॅग लेखन सुरू करतोय, लवकरच.
आगे बडोदा...
*आगे बढो...
ReplyDeleteVery minute and keen observations Amit.very good.confident ...Perfect father...After so much busy schedule enjoying your liveliness with family ! Great ! Keep it up ! Proud of you ! Keep habit of writing.
ReplyDeleteVery minute and keen observations Amit.very good.confident ...Perfect father...After so much busy schedule enjoying your liveliness with family ! Great ! Keep it up ! Proud of you ! Keep habit of writing.
ReplyDeleteExcellent observations and study.
ReplyDeleteVery well written. And your observations are right on dot. It was like reliving the memories of my own son's childhood. The way a babies uses their growing treasure of words is
ReplyDeleteabsolutely amazing. They are so instinctive. And you have described this so aptly. Enjoy little Riddhi's toddler years.
छान लेख आहे अमित. मुलांशी विविध भाषिक अंगांनी जे पालक खेळतात, त्या घरातील मुलं इतरांना चुणचुणीत वाटतात. शारीरिक खेळासोबत मुलांशी शाब्दिक खेळही तितकंच महत्वाचं आहे. As sepians, language has played great role in survival among other species , but same is going to be valid for survaial among other humans!
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteKeen Observation.
ReplyDeleteBadhiya...
ReplyDeleteNicely written,go ahead.
ReplyDeleteअनुभवांची मांडणी सुरेख.
ReplyDeleteखुप छान अनुभव असतात हे. खरच. माझ्या मुलीचे पण असे अनेक किस्से आहेत. नुकतेच बोलायला शिकली तेव्हा F ला बुश असं उच्चारायची.
छान लिहिलंय,अशा रिद्धीच्या आणि स्पृहाच्या पण आठवणी लिहून ठेवा,त्या मोठ्या होतील तेव्हा त्यांना ह्या सगळ्याची गम्मत वाटेल,मुलांची भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया आपल्यालालाही पालक म्हणून समृद्ध करत असते, आम्ही एकदा आमच्या मुलीच्या आजीकडे कारने निघालो होतो, मी मुलीला म्हणाले,चला आजीचं घर आलं, तिने तत्परतेने म्हटलं, आजीचं घर यायला,गेलं कुठे होतं
ReplyDeleteसाहेब छान लिहिलय...
ReplyDeleteMast re Amit. Chhan. The ability, skill and intent to articulate the insights from simple every day activities is really commendable.👍👍👍
ReplyDeleteसाहेब कसले जोरात लिहताय ओ लय भारी .........
ReplyDeleteप्रकाश कांबळे
DeleteLayee bhari bhau
ReplyDeleteMast...1 to 4 yrs are called golden years. Curious parents and also an artistic writer like you could pen down those meticulous observation in such great perspective...throughly enjoyed
ReplyDeleteSo true.. :)
ReplyDeleteअतिशय छान. खुप सुंदर लेखन आणि भाषेवर चागली पकड़ हे लेखनातून प्रकट होते. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा। खरच बालपन किती सुंदर असते ते शब्दात समावने कठिन. आयुष्यातील काही अनमोल क्षण आठवण येतात ते आपल्या लहान पाल्याकडून. बालपनिच्या काही आठवणी मनात अजूनही असतात त्याना हलकेच गोजारल की त्याची आठवण अधिकच येते.अतिशय छान. खुप सुंदर लेखन आणि भाषेवर चागली पकड़ हे लेखनातून प्रकट होते. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा। खरच बालपन किती सुंदर असते ते शब्दात समावने कठिन. असेच नवीन नवीन विषयावर ब्लॉग ची पतिक्षा।
ReplyDeleteMast
ReplyDeleteहा अनुभव सर्वांना त्यांच्या त्यांच्या भूतकाळात नेणारा आहे असे मला वाटते...
ReplyDeleteआणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हच्यातला बाबा जागा आहे आणि आता तुमच्यातला लेखक सुद्धा जागा झाला आहे...
असेच शब्द समृद्ध व्हा हीच सदिच्छा.